Lokrakshanay
Monday, May 19, 2025
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

१२ लाखांचे विदेशी मद्य जप्त; आंब्याच्या पेट्यांमधून गोव्यातील मद्याची तस्करी

गोव्यात विक्रीची परवानगी असलेल्या विदेशी मद्याची आंब्यांच्या पेट्यांमधून तस्करी करण्यात येत असल्याचा प्रकार राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने उघडकीस आणला.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
June 17, 2024
in ताज्या बातम्या, पुणे
१२ लाखांचे विदेशी मद्य जप्त; आंब्याच्या पेट्यांमधून गोव्यातील मद्याची तस्करी
Share on FacebookShare on Whatsapp

पुणे : गोव्यात विक्रीची परवानगी असलेल्या विदेशी मद्याची आंब्यांच्या पेट्यांमधून तस्करी करण्यात येत असल्याचा प्रकार राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने उघडकीस आणला. बारामतीतील मोरगाव – सुपा रस्त्यावर करण्यात आलेल्या कारवाईत गोव्यातील १२ लाख ६१ हजारांच्या मद्याच्या बाटल्या, तसेच मालवाहू वाहन (पिकअप) असा ३० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी चाैघांना अटक करण्यात आली.

नामदेव हरीभाऊ खैरे, संदीप बबन सानप, गोरख भगवान पालवे, महेश गुलाबराव औताडे अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. आरोपींनी संशय न येण्यासाठी गोव्यातील मद्याच्या बाटल्या पिकअप वाहनात ठेवलेल्या आंब्याच्या पेटीत लपवल्याचे उघडकीस आले. गोव्याहून नगरकडे पिकअप वाहन निघाले होते. उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक चरणसिंह रजपूत, उपअधीक्षक उत्तम शिंदे, सुजित पाटील, संतोष जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक माेरगाव – सुपा रस्त्यावर गस्त घालत होते. गाेव्यातील मद्याची तस्करी एका वाहनातून करण्यात येत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क कार्यालयातील दौंड विभागाच्या पथकाला मिळाली. त्यानंतर मुर्टी गावाजवळ पथकाने एका मोटारीसह पिकअप वाहनाची तपासणी केली. चौकशीत चालकाने उडवाउडवीची उत्तरे दिली. पथकाने पाहणी केली. तेव्हा पिकअप वाहनात मद्याच्या बाटल्या सापडल्या. आरोपींनी संशय येऊ नये म्हणून आंब्याच्या पेट्या ठेवल्या होत्या. पथकाने वाहनातील पेट्या बाहेर काढल्यानंतर मद्याची खोकी सापडली. याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. निरीक्षक विजय रोकडे, दुय्यम निरीक्षक प्रदीप झुंजरूक, जवान शुभम भोईटे, केशव वामने यांनी ही कारवाई केली.

Previous Post

गोवंडीत बनावट नोटा बाळगल्याप्रकरणी एकाला अटक

Next Post

सिक्कीमच्या लॅच्युन्ग व्हॅलीत अडकलेल्या राज्यातील पर्यटकांना सरकारकडून तातडीची मदत

Next Post
सिक्कीमच्या लॅच्युन्ग व्हॅलीत अडकलेल्या राज्यातील पर्यटकांना सरकारकडून तातडीची मदत

सिक्कीमच्या लॅच्युन्ग व्हॅलीत अडकलेल्या राज्यातील पर्यटकांना सरकारकडून तातडीची मदत

BreakingNews

विधानसभा प्रचारात एकही शब्द नाही, पण शिर्डीत मात्र काढलं सर्व काही : अमित शाह यांचा ठाकरे – पवारांवर जोरदार हल्लाबोल

मोठ्या जनक्षोभानंतर खेलरत्न पुरस्काराच्या अंतिम यादीत मनु भाकरचे नाव समाविष्ट होणार का ?

सुमतीताईंनी संघर्षातून निर्माण केलेल्या विश्वासार्हतेच्या पायावर यशाचा कळस – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शाहपूरमधील भयानक घटना, ज्वेलर्सच्या सेल्समनवर गोळीबार; हल्ल्यात एकाचा मृत्यू

हिवाळी अधिवेशनात १७ विधेयके मंजूर

बोट दुर्घटनेमध्ये नौदलाच्या स्पीडबोट चालकाविरोधात गुन्हा दाखल, नौदलाने चौकशीचे दिले आदेश

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.