Lokrakshanay
Thursday, October 1, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

“पुन्हा एकदा १० पैकी १०!’’ मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीत युवासेनेने मारली बाजी

हा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला मोठा धक्‍का आहे.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
September 28, 2024
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
“पुन्हा एकदा १० पैकी १०!’’ मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीत युवासेनेने  मारली बाजी
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : काही दिवसांपासून सर्वांचे लक्ष असलेल्या मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचा निकाल समोर आला आहे. या निकालात उद्धव ठाकरे पक्षाच्या युवासेनेचा बोलबाला असल्याचे पाहायला मिळत आहे. युवासेनेने 10 पैकी 8 जागांवर विजय मिळवला आहे. सुरुवातीला राखीव पाच जागांचे निकाल लागले. ज्यामध्ये पाचही जागांवर युवासेनेचे पाचही उमेदवार निवडून आले. त्यामुळे सिनेट निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाने बाजी मारली, तर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला मोठा धक्‍का बसला आहे.

युवासेनेने सिनेट निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर प्रतिक्रिया देत सर्वांचे आभार व्यक्त केले आहेत. तसेच “इथूनच निवडणुकीच्या विजयाचा सिलसिला सुरू होतो”, असा सूचक इशारा आदित्य ठाकरे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधाऱ्यांना दिला आहे

नेमका काय म्हणाले आदित्य ठाकरे
“पुन्हा एकदा १० पैकी १०!’’ ज्यांनी आम्हाला मतदान केले, त्या सर्वांचे आणि शिवसेना (ठाकरे गट) युवासेना सहकाऱ्यांचे, तुमच्या विश्वासासाठी, पाठिंब्याबद्दल, प्रयत्नांसाठी आणि आशीर्वादाबद्दल मनःपूर्वक आभार. मुंबई विद्यापीठ पदवीधर सिनेट निवडणुकीत आम्ही आमची कामगिरी केवळ पुनरावृत्ती केली नाही तर सुधारली आहे. १०० टक्के स्ट्राइक रेट. इथूनच निवडणुकीच्या विजयाचा सिलसिला सुरू होतो”, असं आदित्य ठाकरेंनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, राखीव गटातील युवासेनेचे 5 उमेदवार विजयी ठरले. युवासेनेच्या शीतल देवरुखकर-शेठ यांनी अनुसूचित जाती प्रवर्गातून 5,498 मते खेचून आणली. तर त्यांच्या विरोधातील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे उमेदवार राजेंद्र सायगावकर यांना 1,014 मते पडली. तर अनुसूचित जमाती प्रवर्गात युवासेनेचे धनराज कोहचाडे यांना 5,247 मते मिळाली. तर अभाविपच्या उमेदवार निशा सावरा यांना 918 मते पडली. तसेच, युवासेनेचे मयूर पांचाळ हे ओबीसी प्रवर्गातून विजयी झाले. त्यांना 5,350 मते पडली. तर, महिला प्रवर्गातून विजयी झालेल्या स्नेहा गवळी यांना 5,914 मते पडली. तसेच, डॉ. धनराज कोहचाडे यांचा एसटी प्रवर्गातून विजय झाला असून त्यांना 5,247 मते मिळाली. तर, एनटी प्रवर्गातून शशिकांत झोरे हे विजयी झाले असून त्यांना 5,170 मते पडली. तसेच, खुल्या वर्गातही युवसेनेने बाजी मारली असून पाच पैकी दोन जागांवर विजय मिळवला. खुल्या गटामधून युवासेनेचे प्रदीप सावंत, मिलिंद साटम आणि अल्पशे भोईर हे विजयी झाले.

Previous Post

गुप्ताचर विभागाच्या इशाऱ्यावरून मुंबईतील धार्मिक स्थळांवर पोलिसांची असणार करडी नजर

Next Post

कोंढवा परिसरात दोघांकडून १४ लाख रुपयांचे ६३ ग्रॅम मेफेड्रोनअमली पदार्थ विरोधी पथकाने केले जप्त

Next Post
कोंढवा परिसरात  दोघांकडून १४ लाख रुपयांचे ६३ ग्रॅम मेफेड्रोनअमली पदार्थ विरोधी पथकाने केले जप्त

कोंढवा परिसरात दोघांकडून १४ लाख रुपयांचे ६३ ग्रॅम मेफेड्रोनअमली पदार्थ विरोधी पथकाने केले जप्त

BreakingNews

२६/११च्या दहशतवादी हल्ल्याच्या न्यायलढ्याची कहाणी आता चित्रपटातून; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ‘प्रहार’चा ट्रेलर प्रदर्शित

दुबईहून इस्रायलला जाणाऱ्या विमानाचे अपहरण? ‘त्या’ कोडने अख्खे जग हादरले!

१ ऑक्टोबरला ठाणे जिल्ह्यात ‘एक दिवस, एक तास, एक साथ’ स्वच्छता अभियान; श्रमदानातून स्वच्छ, सुंदर आणि निरोगी गावांचा संकल्प

रायगडमध्ये पहिले ‘स्टार गेजिंग सेंटर’ मारळ येथे होणार; हरिहरेश्वर पर्यटन विकासाचा मास्टरप्लॅन निश्चित!

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचा सुवर्णधडाका; महिला कंपाउंड तिरंदाजी संघाने चीनला हरवत पटकावले सातवे सुवर्ण

दुष्काळावर मात करण्यासाठी रोजगार हमी योजनेतून ६,७२८ कोटींचा निधी; मंत्री भरत गोगावले यांची माहिती

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.