Lokrakshanay
Thursday, October 16, 2025
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

आता तिरुपतीच्या लाडू प्रसादाचा वाद पोहोचला सर्वोच्च न्यायालयात

भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी आणि तिरुमला तिरुपती देवस्थान(TTD) चे माजी अध्यक्ष वायव्ही सुब्बा रेड्डी यांनी या या चिका दाखल केल्या आहेत.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
September 28, 2024
in ताज्या बातम्या, देश -विदेश
आता तिरुपतीच्या लाडू प्रसादाचा वाद पोहोचला सर्वोच्च न्यायालयात
Share on FacebookShare on Whatsapp

नवी दिल्ली : तिरुपतीच्या प्रसिद्ध लाडूंमध्ये प्राण्यांच्या चरबीच्या कथित वापराचा वाद सर्वोच्च न्यायालयात (SC) पोहोचला आहे. सोमवारी या प्रकरणावर देशातील सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी आणि तिरुमला तिरुपती देवस्थानम (TTD) चे माजी अध्यक्ष वायव्ही सुब्बा रेड्डी यांनी या या चिका दाखल केल्या आहेत. सुब्बा रेड्डी हे वायएसआर काँग्रेस पक्षाचे राज्यसभेचे खासदार आहेत.

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी काही दिवसांपुवरी आरोप केला होता की राज्यातील मागील युवाजन श्रमिका रायथू काँग्रेस पार्टी (YSRCP) सरकारने श्री वेंकटेश्वर मंदिरातील प्रसदाचा लाडू लाडू बनवण्यासाठी निकृष्ट साहित्य व प्राण्यांच्या चरबीचा वापर केला. या आरोपांमुळे देशात मोठा वाद निर्माण झाला आणि करोडो हिंदूं धर्मीयांच्या भावना दुखावल्या गेल्या.

आता सुब्रमण्यम स्वामी आणि वायवी सुब्बा रेड्डी या दोघांनीही या प्रकरणाची न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी करण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाकडे केली आहे. भाजप नेत्याने या आठवड्याच्या सुरुवातीला दाखल केलेल्या जनहित याचिकेत (पीआयएल) सर्वोच्च न्यायालयाने आंध्र प्रदेश सरकारला लाडू बनवताना वापरल्या जाणाऱ्या तुपाचा तपशीलवार फॉरेन्सिक अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

गुजरातमधील प्रयोगशाळेच्या अहवालाचा हवाला देत राज्य सरकारने असा दावा केला होता की लाडू बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या तुपात प्राण्यांच्या चरबीचा वापर, फिश ऑइलचे अंश सापडले आहेत. “मंदिरातील अर्पण करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विविध वस्तूंचा पुरवठा करणाऱ्या पुरवठादारांच्या साहित्याच्या गुणवत्तेची तपासणी आणि पडताळणी करण्यासाठी देखरेख ठेवणे गरजेचे होते असे देखील याचिकेत म्हटले आहे.

दरम्यान, तिरुपती येथील भगवान व्यंकटेश्वर मंदिरात अर्पण केलेल्या लाडूंमध्ये प्राण्यांची चरबी मिसळल्याच्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आंध्र प्रदेश सरकारने नऊ सदस्यीय विशेष तपास पथक (एसआयटी) नियुक्त केले आहे. “तिरुमला तिरुपती देवस्थानम (TTD) च्या पावित्र्याचे रक्षण करण्यासाठी आंध्र प्रदेश सरकारने संपूर्ण प्रकरणाचा तपशीलवार आणि सर्वसमावेशक तपास करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे,” असे मुख्य सचिव नीरभ कुमार प्रसाद यांनी सांगितले.

TTD हे तिरुपती येथील भगवान व्यंकटेश्वर ट्रस्टी आहेत. लाडूंमध्ये भेसळ केल्याच्या आरोपांची एसआयटी चौकशी करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी २२ सप्टेंबर रोजी केली होती. एसआयटीचे नेतृत्व गुंटूर रेंजचे पोलिस महानिरीक्षक (IGP) सर्वेश त्रिपाठी आणि इतर पोलिस अधिकारी करत आहेत.

Previous Post

स्वच्छता पंधरवडा मोहिमेत नागरिकांनी हिरीरीने सहभाग घ्यावा : खासदार नरेश म्हस्के

Next Post

गूळ आणि ओवा एकत्र खाण्याचे फायदे जाणून घेऊया

Next Post
गूळ आणि ओवा एकत्र खाण्याचे फायदे जाणून  घेऊया

गूळ आणि ओवा एकत्र खाण्याचे फायदे जाणून घेऊया

BreakingNews

‘महाभारत’मध्ये कर्णाची भूमिका साकारणारे अभिनेते पंकज धीर यांचे निधन

सिग्नलवर गजरे, वस्तू विकणाऱ्या मुलांसाठी ठाण्यात पहिली सिग्नल शाळा!

शेतकऱ्यांनी आंबा, काजू व केळी या फळपिकांचा विमा उतरवावा – विभागीय कृषी सहसंचालक शिवाजी आमले

पुणेकरांची दिवाळी धूमधडाक्यात! २४ तास खुली राहणार फटाक्यांची दुकानं

चित्रपटसृष्टीत शोककळा; प्रसिद्ध कॉमेडी अभिनेता राजू तालिकोटे यांचे निधन

फुकट्या रेल्वेप्रवाशांच्या संख्येत वाढ, कारवाईसाठी भरारी पथके स्थापन

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.