Lokrakshanay
Thursday, October 16, 2025
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home कोकण

आता गेटवे ऑफ इंडिया फक्त पाहायचं, इथून बोटीत बसता येणार नाही

महाराष्ट्र सागरी मंडळाकडून इथं नव्या जेट्टीचं बांधकाम करण्यात येणार आहे. तर, गेटवे ऑफ इंडियामध्ये आता मनसोक्त पर्यटन करता येईल. ही वास्तू फक्त पर्यटकांसाठीच असेल.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
October 24, 2024
in कोकण, ताज्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई, राष्ट्रीय
आता गेटवे ऑफ इंडिया फक्त पाहायचं, इथून बोटीत बसता येणार नाही
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई  : गेटवे ऑफ इंडिया ही ऐतिहासिक वास्तू पाहण्यासाठी दररोज हजारो पर्यटक येतात. तसंच समुद्राची थंडगार हवा अनुभवण्यासाठीही दिवसभर शेकडो लोक याठिकाणी गर्दी करतात. त्यामुळे हा परिसर कायम वर्दळीचा असतो. गेटवे वरून बोटीत बसायचं म्हटलं तर फार वाट पाहावी लागते. शिवाय बोटीत बसण्यासाठी समुद्रात पायऱ्या उतराव्या लागत असल्यानं अनेकजण घाबतात. म्हणूनच आता नवी जेट्टी सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबईहून जेएनपीटी, मांडवा, एलिफंटाला बोटीनं जायचं असेल तर आता गेटवे ऑफ इंडियाला नाही तर रेडिओ क्लबला जावं लागणार आहे. महाराष्ट्र सागरी मंडळाकडून इथं नव्या जेट्टीचं बांधकाम करण्यात येणार आहे. तर, गेटवे ऑफ इंडियामध्ये आता मनसोक्त पर्यटन करता येईल. ही वास्तू फक्त पर्यटकांसाठीच असेल.

मिळालेल्या माहितीनुसार, येत्या अडीच वर्षात नव्या जेट्टीचं बांधकाम केलं जाणार आहे. त्यासाठीच्या परवानग्या मिळाल्या असून कंत्राटदाराची नियुक्तीही करण्यात आली आहे. तब्बल 229 कोटी 28 लाख रुपये खर्च करून महाराष्ट्र सागरी मंडळ नवी जेट्टी उभारणार आहे.

25 हजार 148 चौ. किमी. एवढ्या क्षेत्रफळात नवी जेट्टी असेल. इथं एकाच वेळी 20 बोटी उभी करण्याची व्यवस्था असेल. टर्मिनल प्लॅटफॉर्मची रुंदी 80 बाय 80 मीटर एवढी, तर, 114 मीटर लांब आणि 12 मीटर रुंद जागेत जेट्टी असेल. संरक्षण भिंतीपासून जेट्टीची पूर्ण लांबी 650 मीटर असेल. याठिकाणी सुरक्षा तपासणी क्षेत्र, वेटिंग एरिया, टॉयलेट, पाणपोई, अग्नी सुरक्षा प्रणाली, सीसीटीव्ही, इत्यादी व्यवस्था असणार आहे. सागरमाला योजनेअंतर्गत या प्रकल्पाचं बांधकाम केलं जाणार असून यात क्रेंद आणि राज्य शासनाची भागीदारी 50-50 टक्के असेल, असं कळतं आहे.

Previous Post

जम्मू आणि काश्मीरला लवकरच मिळणार राज्याचा दर्जा; केंद्रात हालचालींना वेग

Next Post

पोलिस हवालदाराचा कर्तव्य बजावत असताना हृदयविकाराच्या झटक्याने दुर्देवी मृत्यू

Next Post
पोलिस हवालदाराचा कर्तव्य बजावत असताना हृदयविकाराच्या झटक्याने दुर्देवी मृत्यू

पोलिस हवालदाराचा कर्तव्य बजावत असताना हृदयविकाराच्या झटक्याने दुर्देवी मृत्यू

BreakingNews

‘महाभारत’मध्ये कर्णाची भूमिका साकारणारे अभिनेते पंकज धीर यांचे निधन

सिग्नलवर गजरे, वस्तू विकणाऱ्या मुलांसाठी ठाण्यात पहिली सिग्नल शाळा!

शेतकऱ्यांनी आंबा, काजू व केळी या फळपिकांचा विमा उतरवावा – विभागीय कृषी सहसंचालक शिवाजी आमले

पुणेकरांची दिवाळी धूमधडाक्यात! २४ तास खुली राहणार फटाक्यांची दुकानं

चित्रपटसृष्टीत शोककळा; प्रसिद्ध कॉमेडी अभिनेता राजू तालिकोटे यांचे निधन

फुकट्या रेल्वेप्रवाशांच्या संख्येत वाढ, कारवाईसाठी भरारी पथके स्थापन

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.