Lokrakshanay
Monday, March 16, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

आता विठ्ठलाच्या पूजेसाठी १ ऑक्टोबरपासून ‘ऑनलाईन’ नोंदणीची सोय

याबाबतची अधिक माहिती, अटी व शर्ती मंदिर समितीच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
September 28, 2024
in ताज्या बातम्या, पुणे, महाराष्ट्र
आता विठ्ठलाच्या पूजेसाठी १ ऑक्टोबरपासून ‘ऑनलाईन’ नोंदणीची सोय
Share on FacebookShare on Whatsapp

पंढरपूर : पंढरीचा विठूराया जरी गरिबांचा देव म्हणून परिचित असला तरी आता नवतंत्रज्ञानामुळे ‘हायटेक’ बनत आहे. विठ्ठल-रखुमाईची नित्यपूजा, पाद्यपूजा, तुळशी पूजा, चंदन उटी पूजा इत्यादी पूजा मंदिर समितीकडून उपलब्ध करून देण्यात येत आहेत. मात्र काही देश विदेशातील भाविकांसाठी मंदिर समितीने देवाच्या पूजेबाबत ‘ऑनलाईन बुकिंग’ची सोय उपलब्ध करून दिली आहे. येत्या १ ऑक्टोबरपासून या पूजेसाठी संबंधित संकेतस्थळावरून नोंद करता येणार असल्याची माहिती श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली आहे.

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री विठ्ठल रखुमाईचे दर्शन आता सुलभ झाले आहे. त्याच बरोबरीने आता देवाची विविध होणारी पूजा देखील आता घरबसल्या आपल्याल्या पाहिजे त्या दिवशी करता येऊ शकते. यासाठी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने एक संगणकीय प्रणाली विकसित केली आहे. पूजेच्या नोंदणीसाठी https://www.vitthalrukminimandir.org या मंदिर समितीच्या अधिकृत संकेतस्थळावरून नोंदणी करता येणार आहे. या संकेतस्थळावर तारीख वार, तिथी दिसणार आहे. ज्यांना पूजा नोंदणी करायची आहे. त्यानुसार नोंदणी करता येणार आहे. नोंदणी १ ऑक्टोबरपासून सुरु केली जाणार मात्र लगेच भाविकांना पूजेसाठी येता येणार नाही म्हणून ७ ऑक्टोबरपासूनच्या पूजेची नोंदणी करता येणार आहे. तसेच गर्दीच्यादिवशी या ऑनलाइन पूजा बंद राहतील, अशी माहिती शेळके यांनी दिली आहे.

या ऑनलाइन नोंदणीसाठी काही अडचणी आल्यास मंदिर समितीच्या नित्योपचार कार्यालयातून नोंदणी करून देण्यास मदत व आवश्यक ते मार्गदर्शन करण्यात येईल. याबाबतची अधिक माहिती, अटी व शर्ती मंदिर समितीच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. तसेच अधिक माहितीसाठी मंदिर समितीच्या ०२१८६-२९९२९९ या दूरध्वनी क्रमांकावर भाविकांनी संपर्क साधावा असे आवाहनही कार्यकारी अधिकारी शेळके यांनी केले आहे. एकंदरीत भाविकांना सावळ्या विठुरायाचे दर्शन आणि पूजेसाठी मंदिर समितीने पारदर्शक उपक्रम आणि सध्याच्या काळातील सहज करता येणारी पद्धत अवलंब केल्याने भाविकांना फायदा होईल.

Previous Post

कोंढवा परिसरात दोघांकडून १४ लाख रुपयांचे ६३ ग्रॅम मेफेड्रोनअमली पदार्थ विरोधी पथकाने केले जप्त

Next Post

नवी मुंबईतील क्रीडा संकुलाची जागा बिल्डरना देण्यावर सर्वोच्च न्यायालय राज्यसरकारच्या निर्णयावर नाराज

Next Post
नवी मुंबईतील क्रीडा संकुलाची जागा बिल्डरना देण्यावर सर्वोच्च न्यायालय राज्यसरकारच्या निर्णयावर नाराज

नवी मुंबईतील क्रीडा संकुलाची जागा बिल्डरना देण्यावर सर्वोच्च न्यायालय राज्यसरकारच्या निर्णयावर नाराज

BreakingNews

माहिती अधिकाराचा गैरवापर करत गौरव स्वीट्सला लुटण्याचा प्रयत्न; पोलिसांकडून दोघांना बेड्या

बुलाती है मगर जाने का नहीं… ‘टिंडर’चा भयानक कांड

वरळीत गॅस सिलिंडरचा काळाबाजार उघड! विशेष मोहिमेअंतर्गत १७२ एलपीजी सिलिंडर जप्त

दिसायला पिवळं, चवीला गोड! वसई-विरारच्या बाजारपेठेत नवीन फळाची एन्ट्री

मराठी नाही तर मान्यता नाही! शिक्षणमंत्र्यांचा शाळांना कठोर कारवाईचा इशारा

गॅस सिलिंडरची लूट थांबणार! तक्रारीसाठी ठाणे प्रशासनाकडून हेल्पलाईन नंबर जारी

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.