Lokrakshanay
Friday, April 24, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home गुन्हेगारी

सायबर गुन्हेगारांचा नवा डाव; बनावट पोलीस, बनावट न्यायालय, डिजिटल अरेस्टच्या भीतीने वृद्ध महिलेची पावणेचार कोटींची लूट

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
October 20, 2025
in गुन्हेगारी, मुंबई
सायबर गुन्हेगारांचा नवा डाव; बनावट पोलीस, बनावट न्यायालय, डिजिटल अरेस्टच्या भीतीने वृद्ध महिलेची पावणेचार कोटींची लूट
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : सायबर भामट्यांनी केंद्रीय अन्वेषण (सीबीआय) विभागाचे अधिकारी असल्याचे भासवून एका महिलेची पावणे चार कोटींची फसवणूक केली आहे. या महिलेला घाबरविण्यासाठी त्यांनी दुरदृश्यप्रणालीलाद्वारे (व्हिडियो कॉन्फरन्स) पोलीस ठाणे आणि न्यायालयाचा देखावा उभा केला. त्यात तोतया न्यायाधीश उभे करून बनावट सुनावणी देखील घेण्यात आली होती. या फसवणुकीप्रकऱणी पश्चिम प्रादेशिक सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार महिला ६८ वर्षांच्या असून अंधेरी येथे राहतात. १८ ऑगस्ट २०२५ रोजी त्यांना विजय पॉल नावाच्या व्यक्तीचा फोन आला. त्याने कुलाबा पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी असल्याचे सांगितले. त्यानंतर लगेच व्हॉट्सॲपद्वारे व्हिडिओ कॉल करण्यात आला. तिथे दुसऱ्या एका व्यक्तीने आपली ओळख कुलाबा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी एस.के. जयस्वाल अशी करून दिली.

कॉल करणाऱ्या व्यक्तीने तक्रारदार महिलेवर मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात सहभागी असल्याचा आरोप केला. त्यांच्या आधार कार्डाच्या तपशीलांचा वापर करून कॅनरा बँकेत खाते उघडून त्यातून ६ कोटींचा बेकायदेशीर व्यवहार केल्याचा दावा या भामट्यांनी केला. या महिलेवर आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायदा(प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ॲक्ट) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना कधीही अटक होऊ शकते, असे सांगून घाबरवले. तक्रारदार महिलेने असे कोणतेही खाते उघडले नसल्याचे वारंवार सांगितले. तरीही सायबर भामट्यांनी त्यांना ‘नरेश गोयल’ नावाच्या एका उच्चभ्रू व्यावसायिकाबरोबर त्याही पोलिसांच्या रडारवर आहेत असे सांगितले. पूर्ण सहकार्य केले तरच अटक टाळता येईल, असे पटवून दिले. याशिवाय ही बाब कोणालाही सांगू नये असे बजावले आणि तपासणीसाठी त्यांच्या सर्व बँक खात्यांचे तपशील देण्याची मागणी केली. महिला जाळ्यात फसल्यावर सायबर भामट्यांनी एक बनावट ‘ऑनलाइन सुनावणी’ आयोजित केली, जिथे ‘चंद्रचूड’ नावाचा न्यायाधीश समोर बसला होता. त्या न्यायाधीशाने त्यांचा जामीन फेटाळल्याचे सांगितले. त्यामुळे तक्रारदार महिला अधिकार घाबरली. सायबर भामट्यांनी मग त्यांना या प्रकऱणातून सोडविण्यासाठी पैशांची मागणी केली. तक्रारदार महिलेने आपल्या विविध बॅंक खात्यातून ३ कोटी ७१ लाख रुपये हस्तांतरीत केले. जवळपास पावणे चार कोटी दिल्यानंतर आपली सुटका झाली असे या महिलेला वाटले होते. मात्र पैसे मिळाल्यानंतर काही काळाने सायबर भामट्यांनी पुन्हा संपर्क साधून आणखी पैशांची मागणी केली, अन्यथा अटक केली जाईल धमकी दिली. यावेळी आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी पश्चिम प्रादेशिक सायबर पोलीस गाठले. या अज्ञात व्यक्तींविरुद्ध फसवणूक आणि धमकी दिल्याबद्दल भारतीय न्याय संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Previous Post

“मी स्वत:ला भाग्यवान समजतो…”, घरवापसी केल्यानंतर ओंकार भोजनेची प्रतिक्रिया

Next Post

१ नोव्हेंबरपासून मोठा बदल! एकाच बँक खात्यावर आता चार नॉमिनी

Next Post
१ नोव्हेंबरपासून मोठा बदल! एकाच बँक खात्यावर आता चार नॉमिनी

१ नोव्हेंबरपासून मोठा बदल! एकाच बँक खात्यावर आता चार नॉमिनी

BreakingNews

BESTची डिजिटल झेप; Google Pay, PhonePe सह २८ ॲप्सवरून तिकीट खरेदीची सुविधा

ठाणे पोलिसांचा ‘खाकी’ला शिस्तीचा डोस; विनाहेल्मेट दुचाकी चालवणे पोलिसांना पडणार महागात

१ मेपासून रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी अनिवार्य; निर्णयाविरोधात आंदोलनाचा इशारा

पनवेलच्या खाडीशेजारी बांधणार ‘खारघर कोस्टल रोड’, ४५ मिनिटांचा प्रवास १० मिनिटांत

फॉरेन्सिक ऑडिटमध्ये २० कोटींचा घोटाळा उघड; वरिष्ठ अधिकारी गोत्यात

कळंबोलीतील कॉन्सर्टला सिडकोची ‘नकारघंटा; स्थानिकांच्या विरोधामुळे प्रशासन नमले

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.