Lokrakshanay
Monday, August 17, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

न्यूरोइम्युनोलॉजी च्या वाढत्या रुग्णसंख्येला लाभलं वरदान : नायर रुग्णालयात सुरू झालं बाह्यरुग्ण विभाग

न्यूरोइम्युनोलॉजीने ग्रस्त जवळपास ३५० हून अधिक रुग्णांवर वर्षभरात उपचार करण्यात येत आहेत. न्यूरोइम्युनोलॉजी आजारासाठी बाह्यरुग्ण विभाग सुरू करणारे नायर हे मुंबईतील पहिले रुग्णालय आहे.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
August 9, 2024
in ताज्या बातम्या, मुंबई
न्यूरोइम्युनोलॉजी च्या वाढत्या रुग्णसंख्येला लाभलं वरदान : नायर रुग्णालयात सुरू झालं बाह्यरुग्ण विभाग
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : आजारांपासून संरक्षण करणारी रोगप्रतिकारशक्तीच जेव्हा शरीराविरोधातच काम करण्यास सुरुवात करते, त्यावेळी सर्वात प्रथम ती मेंदू आणि मज्जासंस्थेवर आघात करते. अशा या न्यूरोइम्युनोलॉजीचा आजाराच्या रुग्णांवर उपचारासाठी नायर रुग्णालयात सुरू केलेल्या बाह्यरुग्ण विभागात मोठ्या संख्येने रुग्ण येऊ लागले आहेत. न्यूरोइम्युनोलॉजीने ग्रस्त जवळपास ३५० हून अधिक रुग्णांवर वर्षभरात उपचार करण्यात येत आहेत. न्यूरोइम्युनोलॉजी आजारासाठी बाह्यरुग्ण विभाग सुरू करणारे नायर हे मुंबईतील पहिले रुग्णालय आहे. वातावरणातील जीवाणू व विषाणूंपासून शरीराचे संरक्षण करण्याचे काम रोगप्रतिकारशक्ती करते. मात्र अनेक विषाणू व जीवाणूंमधील काही घटक हे शरीरातील मज्जासंस्थांशी साध्यर्म दाखविणारे असतात. त्यामुळे जीवाणू व विषाणूंपासून शरीराचे संरक्षण करण्याऐवजी रोगप्रतिकारक प्रणाली शरीरातील घटकांवर हल्ला करते. हा हल्ला प्रामुख्याने मेंदू, मज्जासंस्था आणि त्याच्याशी जोडलेल्या रक्तवाहिन्यांवर होतो. रोग प्रतिकारशक्तीच्या प्रणालीचा हा हल्ला जेव्हा मेंदूवर होतो, त्यावेळी चक्कर येणे, उलटी येणे व आकडी येणे अशी लक्षणे दिसून येतात. लक्षणे त्वरित लक्षात येत नसल्याने रुग्णांना आपला जीवही गमवावा लागतो.

करोनानंतर या रुग्णांमध्ये वाढ झाली. ही बाब लक्षात घेता नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर मेढेकर यांच्या मार्गदर्शनाखाली नायर रुग्णालयामध्ये प्रथमच न्यूरोइम्युनोलॉजी बाह्यरुग्ण विभाग सुरू करण्यात आला. आठवड्यातून एक दिवस बाह्यरुग्ण विभाग सुरू असतो. या दिवशी जवळपास १० ते १२ रुग्ण येत असतात. सीटी स्कॅन आणि अन्य तपासण्या केल्यानंतर हा आजार झाल्याचे लक्षात येते. या रुग्णांवर सातत्याने उपचार सुरू ठेवावे लागतात. शरीरावर होणारा करोनाचा प्रतिहल्ला रोखण्यासाठी शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती अधिक प्रमाणात काम करत होती. यावेळी बऱ्याच व्यक्तींमध्ये रोगप्रतिकारक शक्ती ही करोनाच्या विषाणूंऐवजी मज्जातंतूवर आघात करू लागली. त्यामुळे करोनानंतर या रुग्णांमध्ये वाढ दिसून येत आहे. – डॉ. राहुल चकोर, न्यूरोलॉजी विभागप्रमुख.

रोगप्रतिकारशक्तीच्या आघाताची कारणे

-मेंदूज्वर झाल्यास मज्जातंतू प्रणालीवर परिणाम करतात.

-पाठीच्या कण्याला गंभीर इजा झाल्यास

-मज्जातंतूला संसर्ग झाल्यास

-आहार पद्धत, पचनसंस्था, रोगप्रतिकार शक्ती आणि मज्जातंतू यामध्ये परस्पर संबंध आहे. त्यामुळे मागील काही वर्षांमध्ये आहार पद्धतीमध्ये झालेला बदलही यासाठी कारणीभूत असण्याची शक्यता

Previous Post

कल्याणमध्ये बेकायदेशीररीत्या बांधलेल्या इमारतीतील घरं विकून १० जणांची फसवणूक

Next Post

मुख्य मार्गांवर खड्डे, नागरिकांचा जन आंदोलनाचा निर्णय ‘जस्टीस फॉर घोडबंदर रोड’

Next Post
मुख्य मार्गांवर खड्डे, नागरिकांचा जन आंदोलनाचा निर्णय ‘जस्टीस फॉर घोडबंदर रोड’

मुख्य मार्गांवर खड्डे, नागरिकांचा जन आंदोलनाचा निर्णय ‘जस्टीस फॉर घोडबंदर रोड’

BreakingNews

सातारा जिल्‍ह्यात येणार नवे ९७ उद्योग

महसुली प्रकरणांच्या तडजोडीसाठी १ सप्टेंबरपासून ‘महात्मा फुले महसूल लोक अदालत’ अभियान

स्वयंपाकाच्या गॅसबाबत केंद्र सरकारचा नवा नियम; ग्राहकांना मोठा दिलासा! गॅस कंपन्यांना दणका

पुण्यात ‘बर्गर किंग’सह १६ आस्थापनांना FDAचा दणका; किचनमधील अस्वच्छतेमुळे कारवाई

ठाण्यातील शतकमहोत्सवी ‘ऑफिसर्स क्लब’ला आधुनिकतेची झळाळी; स्वातंत्र्यदिनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन!

रेल्वे प्रवाशांच्या जीवाशी खेळ! CSMT सह कल्याण, लोणावळा स्थानकांवरील पिण्याच्या पाण्यात ‘ई-कोलाय’ बॅक्टेरिया

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.