Lokrakshanay
Sunday, April 12, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

मुंबई महानगरपालिकेचे भटक्या श्वानांच्या रेबीज प्रतिबंधक लसीकरणासाठी अभियान

मुंबई महानगरातील किमान ७० टक्के श्वानांचे रेबीज प्रतिबंधक लसीकरण मार्च २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
February 17, 2024
in ताज्या बातम्या, मुंबई
कृत्रिम पावसासाठी पालिका आता निविदा मागवणार; पाच देशी कंपन्या स्पर्धेत
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : भटक्या श्वानांच्या चाव्यामुळे माणसांना होणाऱ्या संक्रमणाचा धोका कमी करणे, तसेच श्वानांना आवश्यक आरोग्य सुविधा पुरवण्याच्या उद्देशाने मुंबई महानगरपालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाच्या वतीने मुंबई रेबीज निर्मूलन प्रकल्प हाती घेतला आहे. याअंतर्गत विविध संस्थांच्या साहाय्याने मुंबई महानगरातील किमान ७० टक्के श्वानांचे रेबीज प्रतिबंधक लसीकरण मार्च २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. यापैकी आतापर्यंत २५ हजार श्वानांचे लसीकरण करण्यात आले आहे. रेबीजची लागण झाल्यामुळे होणारे मानवी मृत्यू टाळण्यासाठी मुंबई महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाने मुंबई रेबीज निर्मूलन प्रकल्प हाती घेतला आहे. यात भटक्या श्वानांच्या लसीकरणाच्या माध्यमातून वेगवेगळी उद्दिष्टे साध्य करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. विशेषतः रेबीजची लागण टाळून मानवी मृत्यू रोखणे, रेबीज विषाणूच्या प्रसाराचे चक्र तोडणे व त्याद्वारे भटक्या श्वानांच्या चाव्यामार्फत होणाऱ्या रेबीजच्या मानवी संक्रमणाचा धोका कमी करणे, प्राणी कल्याण संरक्षण करणे, रेबीजचा प्रसार कमी करून नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करणे आदी उद्दिष्टे महत्त्वाची आहेत.

याबाबत पशुवैद्यकीय विभाग आणि देवनार पशुवधगृहाचे महाव्यवस्थापक डॉ. कलीमपाशा पठाण यांनी सांगितले की, सप्टेंबर २०२३ पासून मुंबई महानगरपालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाच्या वतीने मुंबई रेबीज निर्मूलन प्रकल्पाअंर्तगत भटक्या श्वानांच्या रेबीज प्रतिबंधक लसीकरणासाठी निरंतर अभियान हाती घेण्यात आले आहे. हे अभियान अविरतपणे सुरू आहे. रेबीज प्रतिबंधक लसीकरणासाठी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने जॅनीसी स्मिथ ॲनिमल वेल्फेअर ट्रस्ट, यूथ ऑर्गनायझेशन इन डिफेन्स ऑफ ॲनिमल्स, युनिव्हर्सल ॲनिमल वेल्फेअर सोसायटी आणि उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशन या संस्थांची नेमणूक करण्यात आली आहे. या संस्थांतील प्रशिक्षित पशुवैद्यकीय तज्ञांच्या साहाय्याने हे लसीकरण करण्यात येईल, अशी माहिती डॉ. कलीमपाशा पठाण यांनी दिली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या या निरंतर अभियानामध्ये नागरिकांचे सहकार्य अतिशय महत्त्वाचे ठरणार आहे. नागरिकांनी आपल्या भागातील भटक्या श्वानांची माहिती द्यावी, तसेच लसीकरण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. २०१४ च्या गणनेनुसार मुंबई महानगरात भटक्या श्वानांची संख्या सुमारे ९५ हजार इतकी आहे. त्यापैकी सुमारे २५ हजार भटक्या श्वानांचे सप्टेंबर २०२३ पासून आतापर्यंत लसीकरण करण्यात आले आहेत. तर, मार्च २०२४ च्या अखेरपर्यंत सुमारे ७० टक्के श्वानांचे लसीकरण करण्यात येणार आहे.

Previous Post

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी दोन दिवस राखीव – मंत्री हसन मुश्रीफ

Next Post

५ लाख ५० हजार किमतीचे अमली पदार्थासह नायजेरियन नागरिकाला अटक

Next Post
५ लाख ५० हजार किमतीचे अमली पदार्थासह नायजेरियन नागरिकाला अटक

५ लाख ५० हजार किमतीचे अमली पदार्थासह नायजेरियन नागरिकाला अटक

BreakingNews

कॉलेजमधील ‘ती’ भेट अन् १५ वर्षांचा विरह; ईशा-अभिषेकच्या फिल्मी लव्हस्टोरीचा गोड शेवट!

जिल्ह्यातील तरुणाईला बजेटचे धडे! ‘माय भारत’ उपक्रमांतर्गत थेट पंतप्रधानांशी संवाद साधण्याची संधी

शाळेतच भरली ‘विद्यार्थी बँक’! महापालिकेच्या उपक्रमातून चिमुरडे गिरवतायत बचतीचे धडे

बोरिवलीतील बीएसएनएल, एमटीएनएलच्या आरक्षित जागेवर आता परवडणाऱ्या ८००० घरांची गृहयोजना; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निर्णय

“इराण असो वा नसो, होर्मुझची सामुद्रधुनी खुली करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा

राज्यात आता लग्नपत्रिकेवर वधू-वराची जन्मतारीख अनिवार्य!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.