अभिनेत्री मानसी नाईक : मागच्या काही दिवसांपासून मराठमोळी अभिनेत्री मानसी नाईक तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे बरीच चर्चेत आली होती. मानसी प्रेक्षकांच्या भेटीला कधी येणार याचीही उत्सुकता अनेकांना होती. त्यातच आता मानसीचं नवं गाणं नुकतच प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. ‘नाकात नथ’ या गाण्याच्या माध्यमातून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. तसेच या गाण्याच्या माध्यमातून एक नवी कोरी जोडी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.
साऱ्यांना भुरळ घालणाऱ्या या गाण्यातून एक नवी कोरी जोडीही प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. अभिनेत्री मानसी नाईक आणि अभिनेता आदित्य घरत या गाण्यातून प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. या बेधुंद आणि धमाकेदार गाण्यातून मानसी नाईकाचा नखरेल अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. गायक रोहित राऊत आणि गायिका सोनाली सोनावणे यांनी त्यांच्या सुमधुर आवाजात हे गाणं स्वरबद्ध झालं आहे. या गाण्याच्या दिग्दर्शनाची व स्क्रीनप्लेची दुहेरी धुरा मनीष महाजन यांनी सांभाळली आहे. आर.तिरुमल यांनी या गाण्याला संगीत दिले आहे.