Lokrakshanay
Sunday, June 14, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ठाणे

ठाण्यात परप्रांतीय रिक्षा-टॅक्सी चालकांना आता गिरवावे लागणार मराठीचे धडे!

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
April 29, 2026
in ठाणे, ताज्या बातम्या
ठाण्यात परप्रांतीय रिक्षा-टॅक्सी चालकांना आता गिरवावे लागणार मराठीचे धडे!
Share on FacebookShare on Whatsapp

ठाणे : राज्यात रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतल्यानंतर ठाण्यातील युवासेनेच्या वतीने व्यावहारिक मराठी भाषा मोफत शिकवणी वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. हे वर्ग सोमवार ४ मे पासून दर सोमवार ते शनिवार दुपारी १२ ते १ यावेळेत विद्या प्रसारक संस्थेचे विद्यालय व महाविद्यालय बाळकुम रोड, माजिवडा, ठाणे(प) येथे असणार आहेत. परवानाधारक रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी १ मे पासून मराठी भाषा अनिवार्य करण्यात येत आहे. मराठी लिहीता आणि वाचता न येणाऱ्यांचे तसेच मराठी भाषेचे ज्ञान नसलेल्यांचे वाहन परवाने रद्द करण्यात येतील असा इशारा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतला आहे. या निर्णयानंतर ज्या परप्रांतिय रिक्षा चालक किंवा टॅक्सी चालकांना मराठी भाषा येत नाही, त्यांच्या अडचणी वाढणार आहे.

परंतु युवासेना कार्याध्यक्ष ‘पूर्वेश सरनाईक’ यांच्या मार्गदर्शनाखाली आणि युवासेना ठाणे शहर विधानसभा उपाध्यक्ष ‘विकेश संजय भोईर’ यांच्या संकल्पनेतून व्यावहारिक मराठी भाषा मोफत शिकवणी वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. ठाणे शहरातील विविध भागात सध्या मराठी शिकण्याचे हे बॅनर झळकत आहे. हे बॅनर ठाणेकरांचे लक्ष वेधून घेत आहेत. भाजपाच्या वतीने देखील परप्रांतीय रिक्षाचालक आणि फेरीवाल्यांसाठी सात दिवसांचे विशेष मराठी शिकवणी वर्ग सुरू करण्यात आले आहेत. सध्या ठाण्यातील कोपरी, कळवा आणि वर्तकनगर भागात हा उपक्रम सुरु झाला असून यात १०० जणांनी सहभाग घेतल्याची माहिती आहे. ज्या राज्यात आपण राहतो, तेथील भाषा आलीच पाहिजे, तसेच या उपक्रमास चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे भाजपचे ठाणे शहर चिटणीस ॲड. दिनानाथ पांडे यांनी सांगितले होते. तसेच कोकण मराठी साहित्य परिषद (कोमसाप) आपल्या ७२ शाखांमध्ये आणि मुंबई मराठी साहित्य संघ ऑनलाइन माध्यमातून अमराठी वाहनचालकांना जुजबी व्यावहारिक मराठी शिकवणार आहेत. चालकांना प्रवाशांशी संवाद साधता यावा यासाठी ‘कुठे जायचे’, ‘बसा’, ‘चला सोडतो’ अशा दैनंदिन वापरातील सोप्या मराठी वाक्यांचा सराव या वर्गांमध्ये घेतला जात आहे.

Previous Post

जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे येथे ‘सेवा हक्क दिन’ उत्साहात साजरा; उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींचा गौरव

Next Post

संजय दत्तला ‘त्या’ अश्लील गाण्याबद्दल पश्चात्ताप; स्वीकारली ५० मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी!

Next Post
संजय दत्तला ‘त्या’ अश्लील गाण्याबद्दल पश्चात्ताप; स्वीकारली ५० मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी!

संजय दत्तला 'त्या' अश्लील गाण्याबद्दल पश्चात्ताप; स्वीकारली ५० मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी!

BreakingNews

दूधात भेसळ कराल तर गाठ माझ्याशी! तुकाराम मुंढेंचा डेअरी चालकांना सज्जड दम

एलटीटीचे तिकीट काढले तरी ठाण्यातच उतरावे लागणार; ४८ तासांचा महाब्लॉक!

नाशिककरांना कारवाईचा धसका! भेसळविरोधी कारवाईनंतर हॉटेलमधून पनीर गायब?

अवैध गुटखा विक्री करणाऱ्यांवर ‘मकोका’ लावणार; तुकाराम मुंढेंचे कडक आदेश!

तुकाराम मुंढेंच्या धसक्याने भेसळखोरांचे धाबे दणाणले; बाजारात खवा आणि पनीर थेट १०० रुपयांनी महागले!

सोशल मीडियावर आक्षेपार्ह वक्तव्ये भोवली! प्रणित मोरेविरोधात सायबर पोलिसांत गुन्हा

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.