कल्याण : कल्याण होम बाबा टेकडी परिसरात दर्ग्यावर दर्शनासाठी गेलेल्या महिलेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करत तिचे मंगळसूत्र हिसकावून एकजण पसार झाला. ऑक्टोबर महिन्यात ही घटना घडली होती. महिलेने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी संबंधितांचा शोध सुरु दिला होता. यानंतर आरोपीला टिळक नगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अमीर शेख असं या आरोपीचे नाव असून तो सराईत गुन्हेगार आहे. कल्याणच्या होमबाबा टेकडीवरील दर्गा दर्शनासाठी जात असताना एका महिलेवर अतिप्रसंग करण्याच्या प्रयत्न करण्यात आला. महिलेने आरडाओरड करत प्रतिकार केल्याने नराधम तिचे मंगळसूत्र घेऊन पसार झाला. ऑक्टोबर महिन्यात ही घटना घडली. या प्रकरणी टिळकनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीचा शोध सुरु केला होता. डीसीपी सचिन गुंजाळ, एसीपी सुनील कुराडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गीते यांच्या मार्गदर्शनाखाली टिळक नगर पोलिसांच्या पथकाने या आरोपीचा शोध सुरू केला. आरोपीची ओळख पटवली असता आरोपी अमीर शेख असल्याचे समजले.
अमीरच्या शोधासाठी पथके तयार करण्यात आली. तब्बल दोन महिने आरोपी आमिर शेख हा पोलिसांना चकवा देत होता. अमीर हा काही दिवस अजमेरला लपुन बसला होता. टिळकनगर पोलिसांचे पथक अजेमरला गेले. मात्र तेथून अमीर निसटला. त्यानंतर पोलीस त्याच्या मागावर होते. अखेर अमीर बदलापूर येथे येणार असल्याची माहिती टिळक नगर पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे टिळकनगर पोलिसांच्या पथकाने बदलापूर परिसरात सापळा रचत आमिरला अटक केली.