Lokrakshanay
Wednesday, October 21, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

नाशिकच्या खैर तस्करीचे धागेदाेरे थेट चिपळूणपर्यंत; नाशिक वन विभागाकडून चौघांना अटक

कंपनीतून तब्बल ८० लाखाचा अवैध मुद्देमाल जप्त तर सावर्डेतील कातभट्टी फॅक्टरीला सील ठाेकण्यात आला आहे.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
November 27, 2024
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, रत्नागिरी
नाशिकच्या खैर तस्करीचे धागेदाेरे थेट चिपळूणपर्यंत; नाशिक वन विभागाकडून चौघांना अटक
Share on FacebookShare on Whatsapp

रत्नागिरी : नाशिकच्या खैर तस्करी प्रकरणाचे धागेदाेरे थेट चिपळूणपर्यंत पाेहाेचल्याने मंगळवारी नाशिकच्या वन विभागाने तालुक्यातील तीन कातभट्ट्यांवर छापा टाकला. यातील एका कंपनीतून तब्बल ८० लाखाचा अवैध मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या छाप्यात सावर्डेतील कातभट्टी फॅक्टरीला सील ठाेकले असून, फॅक्टरींच्या मालकाला नाेटीस बजावली आहे.

नाशिक मधून अन्य कोण कोणत्या फॅक्टरीमध्ये खैराची तस्करी झाली आहे, याचा नाशिक वनविभागाकडून शोध सुरू आहे. जिल्ह्यातील काही कात फॅक्टरी त्यांच्या रडारवर आहेत.  याबाबत नाशिकचे विभागीय वन अधिकारी विशाल माळी यांनी माहिती देताना सांगितले की, खैर तस्करीप्रकरणी नाशिक वन विभागाने चाैघांना अटक केली आहे. त्यातील दाेघे उत्तर प्रदेशमधील तर उर्वरित दाेघे गुजरातचे आहेत. या चौघांनी नाशिक मधून खैराची तस्करी करून ती चिपळूण मधल्या काही कात फॅक्टरींना विकल्याचे समोर आले आहे. त्यानंतर अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक ऋषिकेश रंजन  व मुख्य वनसंरक्षक रामानुजन कोल्हापूर यांच्या मार्गदर्शनाखाली चिपळूणची माहिती घेऊन आम्ही चिपळूणला आलो. मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांनी स्थानिक पातळीवर सहकार्य केले. वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश गवारी, वनपरिक्षेत्र अधिकारी सविता पाटील वनपाल दुसाने, सूर्यवंशी, गायकवाड व इतर वनाधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पथकाने सावर्डे-कुंभारवाडी येथील सिंडिकेट फूड्स फॅक्टरीवर धाड टाकली. या धाडीत मोठ्या प्रमाणात अवैध खैरसाठा आढळला. या कारवाईदरम्यान फॅक्टरीचे मालक विक्रांत तेटांबे तिथून पळून गेल्याचे लक्षात आले. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना समन्स बजावला आहे. या फॅक्टरीमधील कागदपत्रे व पुस्तके, वाहतूक पासेस, टॅबलेट पुढील चौकशीसाठी जप्त केले आहे. या फॅक्टरीमध्ये मोठ्या प्रमाणात कात ज्यूस व रेडिमेड कात आढळला आहे. हा कात नाशिकच्या जंगलातील खैर लाकडापासून बनवल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आल्याने फॅक्टरीला सील ठोकण्यात आले आहे. या कंपनीतून एकूण ८० लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Previous Post

माहिती नाकारल्याने राज्य माहिती आयोगाच्या कोकण खंडपीठाने विरारच्या निवृत्त तलाठ्याला सुनावला २५ हजारांचा दंड

Next Post

सुट्टीच्या दिवशीही कल्याण डोंबिवली पालिकेची नागरी सुविधा केंद्रे सुरू

Next Post
सुट्टीच्या दिवशीही कल्याण डोंबिवली पालिकेची नागरी सुविधा केंद्रे सुरू

सुट्टीच्या दिवशीही कल्याण डोंबिवली पालिकेची नागरी सुविधा केंद्रे सुरू

BreakingNews

आंबा उत्पादक शेतकऱ्यांनो लक्ष द्या! फळपिक विम्यासाठी ३० नोव्हेंबर शेवटची मुदत

५० वर्षांचा संघर्ष संपला; हनुमाननगर-चंद्रनगरच्या ग्रामस्थांना मिळणार जमिनीचा मालकी हक्क – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पाणीटंचाईत टँकर बुकिंगसाठी फोन करण्याचे टेन्शन मिटले; आता ॲपवरून करा वॉटर टँकर बुक!

महाराष्ट्रातील मच्छिमारांचे उत्पन्न वाढवण्यासाठी नवा प्रयोग; आंध्रच्या कोळंबी प्रकल्पांची मंत्री नितेश राणेंकडून पाहणी

ऑस्करच्या शर्यतीतील मराठी चित्रपट ‘गोंधळ’ आता जगभरात गाजणार; होम्बळे फिल्म्स करणार ओव्हरसीज रिलीज!

‘मिशन भरारी’ अंतर्गत शिष्यवृत्ती सराव चाचणी उत्साहात; ठाणे जिल्ह्यात १० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.