मुंबई : मुंबईमध्ये अनेक ठिकाणी नागरिक बसने वाहतूक करतात. आता वाहतूकीचा खर्च आणखी वाढणार असून सामान्यांच्या खिशाला मोठी कात्री लागणार आहे. बेस्ट बसच्या तिकीट दरांत येत्या काही दिवसांत आणखी वाढ होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, किमान तिकीट दर आता ५ रुपयांवरुन ७ रुपये होणार आहेत. एसी बसचेही तिकीट दर वाढणार आहेत. एसी बससाठी १० किमीमागे ३ रुपयांनी तिकीटांचे दर महागणार आहेत. त्यामुळे वाढत्या महागाईत आता बसच्या तिकीट दरवाढीची भर पडणार आहे.
मुंबई महापालिका प्रशासनाने बेस्टला दरवाढीचे निर्देश दिलेत. बेस्टची आर्थिक स्थिती सुधारण्याासाठी हे निर्देश देण्यात आलेत. दिवसाला तब्बल 35 लाख प्रवासी बेस्टमधून प्रवास करतात. त्यामुळे बेस्टची आर्थिक स्थिती सुधारावी यासाठी मुंबई महापालिका प्रशासनाने तिकीट दरवाढीचा निर्णय घेतला आहे.