मुंबई : भारतीय पर्यटनाला नवी दिशा देणारे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रूझ टर्मिनल सुरू झाले असून सिंगापूर मलेशिया थायलंड दुबई, मालदिव, श्रीलंका, लक्षद्वीप, कोची आणि गोवा अशा नऊ पर्यटन स्थळांची सफर या क्रूझ सेवेतून होणार आहे. एकूण पाच क्रूझ मुंबईच्या टर्मिनलवर एकाचवेळी पार्क होऊ शकणार आहेत. या सेवेमुळे देशांतर्गत आणि परदेशी पर्यटनालाही मोठी चालना मिळू शकेल. देशातील सर्वात मोठ्या आंतरराष्ट्रीय कुझ टर्मिनल मुंबई येथे सुरू झाला आहे. या टर्मिनलवर एकाचवेळी ५ क्रूझ पार्क होण्याची क्षमता आहे. या आंतरराष्ट्रीय कूझ टर्मिनलमधून मुंबईतून गोवा, कोची, लक्षद्वीप, श्रीलंका, मालदीव, दुबई, सिंगापूर, मलेशिया, थायलंड अशा ठिकाणी क्रूझेसने पर्यटनाला जाता येईल. या क्रूझमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पर्यटनाच्या सुविधा देण्यात आल्या असून या क्रूझ टर्मिनलचे पहिले दोन मजले २ लाख ७ हजार स्क्वेअर फूट असणार आहेत. त्यामुळे पर्यटकांना सर्व प्रकारच्या सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत.
मुंबई आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनल असे या टर्मिनलचे नाव आहे. यासाठी ५५६ कोटी खर्च करण्यात आले आहेत. समुद्राच्या लाटांना सामना करण्यासाठी क्रूझची रचना छतासारखी करण्यात आली आहे. भारताच्या क्रूझ पर्यटन क्षेत्राला मोठी चालना देणारा असा हा प्रकल्प आहे. एमआयसीटी हे भारतातील सर्वात मोठे जागतिक दर्जाचे क्रूझ टर्मिनल आहे. या क्रूज टर्मिनलचे पहिले दोन मजले २०७,००० चौरस फूट क्षेत्रात पसरलेले आहेत. येथे ७२ चेक-इन आणि इमिग्रेशन काउंटर आहेत. नव्याने बांधलेले एमआयसीटी दरवर्षी अंदाजे १० लाख प्रवाशांना हाताळण्याची क्षमता बाळगून आहे. तशा पद्धतीची संपूर्ण रचना या क्रूझची आहे. याला भारतीय क्रूझ पर्यटनाचे प्रवेशद्वार म्हटले जाते. सरकारने क्रूझ इंडिया मिशन अंतर्गत हे टर्मिनल जागतिक मानकांनुसार विकसित केले आहे. ४,१५,००० चौरस फूट क्षेत्रफळ असलेले, हे टर्मिनल दरवर्षी १० लाख प्रवाशांना हाताळण्यास सक्षम आहे. एकाच दिवशी १५ हजार पर्यटक या क्रूझमधून प्रवास करू शकणार आहेत. या प्रकल्पांचे उद्दिष्ट सांस्कृतिक पर्यटनाला चालना देणे आणि प्रदेशात पर्यावरणीय शाश्वतता मजबूत करणे असल्याने एमआयसीटी भारताच्या क्रूझ पर्यटन क्षेत्राला मोठी चालना देईल अशी अपेक्षा आहे.