Lokrakshanay
Sunday, April 19, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

भारत-फ्रान्स संबंधांना ‘स्पेशल ग्लोबल स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप’चा दर्जा – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची घोषणा

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
February 18, 2026
in ताज्या बातम्या, देश -विदेश, मुंबई
भारत-फ्रान्स संबंधांना ‘स्पेशल ग्लोबल स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप’चा दर्जा – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची घोषणा
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : बदलत्या जागतिक परिस्थितीत भारत आणि फ्रान्स या दोन्ही देशांनी जागतिक स्थैर्य, समृद्धी आणि नियमाधिष्ठीत व्यवस्थेला बळकटी देण्याचा संकल्प करत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भारत-फ्रान्स संबंधांना ‘स्पेशल ग्लोबल स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप’चा नवा दर्जा देण्यात येत असल्याची घोषणा केली. फ्रान्स प्रजासत्ताकचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या मुंबई भेटीदरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मॅक्रॉन यांच्यात लोकभवन येथे बैठक झाली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना दोन्ही नेत्यांनी या द्विपक्षीय सहकार्याला नव्या उंचीवर नेण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी त्यांच्या हस्ते भारतामध्ये एअरबस एच१२५ हेलिकॉप्टरसाठी टाटा अ‍ॅडव्हान्स्ड सिस्टिम्सच्या असेंब्ली लाईनचे दूरदृष्यप्रणालीद्वारे उद्घाटन करण्यात आले. यावेळी परराष्ट्र व्यवहार मंत्री एस.जयशंकर यांच्यासह दोन्ही देशांचे शिष्टमंडळ उपस्थित होते.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले की, भारत आणि फ्रान्सचे संबंध विश्वासावर आधारित आहेत. फ्रान्स हा भारताच्या सर्वात जुन्या धोरणात्मक भागीदारांपैकी एक असून राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्या नेतृत्वाखाली या भागीदारीला अभूतपूर्व गती आणि ऊर्जा मिळाली आहे. आजच्या अस्थिर जागतिक परिस्थितीत ही भागीदारी केवळ धोरणात्मक नसून जागतिक स्थैर्य आणि प्रगतीसाठीची भागीदारी ठरेल, असे त्यांनी यावेळी नमूद केले. हेलिकॉप्टर असेंब्ली लाईनचे उद्घाटन हे परस्पर विश्वासाचे प्रतीक असल्याचे प्रधानमंत्री मोदी यांनी सांगितले. फ्रान्सच्या सहकाऱ्याने माउंट एव्हरेस्टच्या उंचीपर्यंत उड्डाण करू शकणारे एकमेव हेलिकॉप्टर भारतात तयार होणार असून ते जागतिक बाजारपेठेत निर्यातही केले जाणार आहे. त्यामुळे दोन्ही देशांच्या भागीदारीमध्ये खोल समुद्रापासून पासून उंच पर्वतापर्यंत पोहोचण्याची क्षमता असल्याचे ते म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी २०२६ हे वर्ष भारत-युरोप संबंधांसाठी निर्णायक ठरणार असल्याचे सांगितले. अलीकडेच यूरोपियन यूनियनसोबत झालेल्या मुक्त व्यापार करारामुळे भारत-फ्रान्स व्यापार संबंधांनाही मोठी चालना मिळणार आहे. ‘इंडिया फ्रान्स इयर्स ऑफ इनोव्हेशन’ उपक्रमांतर्गत  संरक्षण, स्वच्छ ऊर्जा, अवकाश आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान क्षेत्रात उद्योग, स्टार्टअप्स, एमएसएमई, विद्यार्थी आणि संशोधक यांच्यासाठी संयुक्त इनोव्हेशन सेंटर्स स्थापन करण्याचाही निर्णय घेण्यात आला असल्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितले. क्रिटिकल मिनरल्स, बायोटेक्नॉलॉजी आणि अ‍ॅडव्हान्स मटेरियल्समध्ये सहकार्य वाढवले जाणार असून ‘इंडो-फ्रेंच सेंटर फॉर एआय इन हेल्थ’, ‘इंडो-फ्रेंच सेंटर फॉर डिजिटल सायन्स अँड टेक्नॉलॉजी’ आणि एरोनॉटिक्स कौशल्य विकासासाठी राष्ट्रीय केंद्राची स्थापना करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, भारत आणि फ्रान्स दोन्ही देश लोकशाही मूल्ये, कायद्याचे राज्य आणि बहुपक्षीय व्यवस्थेवर विश्वास ठेवतात. जागतिक संस्थांमध्ये सुधारणा करूनच जागतिक आव्हानांवर मात करता येईल, अशी दोन्ही देशांची भूमिका असल्याचे सांगून युक्रेन, पश्चिम आशिया किंवा इंडो-पॅसिफिक परिसरात शांततेसाठी सर्व प्रयत्नांना समर्थन देण्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली. सर्व प्रकारचा दहशतवाद संपविण्याचीही दोन्ही देशांची सामायिक बांधिलकी असल्याचे त्यांनी सांगितले. भारत आणि फ्रान्स दरम्यान सांस्कृतिक देवाणघेवाण अधिक दृढ करण्यावर भर दिल्याचे सांगून फ्रान्समध्ये लवकरच ‘स्वामी विवेकानंद सांस्कृतिक केंद्र’ सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली. दोन्ही देश मिळून जागतिक स्थैर्य आणि समृद्धीसाठी कार्य करूया, असे आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मॅक्रॉन यांना केले.

Previous Post

आता एसटीच्या सुरक्षेला मिळणार डिजिटल कवच! प्रवाशांना‘नवीन सीसीटीव्ही प्रकल्पा’तून अभेद्य संरक्षण

Next Post

शिमगोत्सवासाठी चाकरमान्यांसाठी ‘लालपरी’ सज्ज! कोकणाच्या दिशेला १९८ जादा फेऱ्या

Next Post
शिमगोत्सवासाठी चाकरमान्यांसाठी ‘लालपरी’ सज्ज! कोकणाच्या दिशेला १९८ जादा फेऱ्या

शिमगोत्सवासाठी चाकरमान्यांसाठी ‘लालपरी’ सज्ज! कोकणाच्या दिशेला १९८ जादा फेऱ्या

BreakingNews

“हेरा फेरी ३ हा चित्रपट होणार नाही..” – अक्षय कुमारने दिली स्पष्ट प्रतिक्रिया

स्ट्रीट नंबर : आता पुण्यात अरुंद रस्त्यांना व्यक्तींची नावे नाहीत!; नामकरणावर महापालिकेचा नवा निर्णय

मुंबईत २० एप्रिलला ‘महिला लोकशाही दिन’; तक्रार निवारणासाठी महिलांना थेट व्यासपीठ

धाराशिवमध्ये भीमगीतांचा जल्लोष; आदर्श शिंदे यांच्या कार्यक्रमाने निर्माण केला प्रेरणेचा माहोल

परिचारिका होण्याचे स्वप्न आता सुकर! वांद्र्यात मुंबई महापालिका उभारणार ‘नर्सिंग कॉलेज’

नागपूरमध्ये उष्णतेचा कहर! १८ एप्रिलला सर्व शाळा बंद

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.