Lokrakshanay
Monday, May 19, 2025
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ठाणे

शिवसेना शिंदे गटाची बेकायदा कंटेनर शाखा, अन्य पक्षांनी महापालिका आयुक्तांची भेट घेतली; कारवाई करण्याची मागणी

मिरा-भाईंदरमधील शिवसेना शिंदे गटाच्या बेकायदा कंटेनर शाखेला विरोध होत आहे. या प्रकरणी अन्य पक्षांनी महापालिका आयुक्तांची भेट घेतली आहे. तसेच यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
November 21, 2023
in ठाणे, ताज्या बातम्या
शिवसेना शिंदे गटाची बेकायदा कंटेनर शाखा, अन्य पक्षांनी महापालिका आयुक्तांची भेट घेतली; कारवाई करण्याची मागणी
Share on FacebookShare on Whatsapp

मिरा-भाईंदर : मिरा-भाईंदरमधील शिवसेना शिंदे गटाच्या कंटेनरमध्ये सुरू केलेल्या बेकायदा शाखेला विरोध दर्शवत त्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी अन्य राजकीय पक्षांनी महापालिका आयुक्तांची भेट घेतली. बेकायदा राजकीय कार्यालयांवरील कारवाई संदर्भातील जुन्या ठरावानुसार योग्य ती कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन आयुक्तांनी दिले. अन्य राजकीय पक्षांचीही शहरात अनेक बेकायदा कार्यालये असल्याने त्यांच्यावरही कारवाईची शक्यता आहे. मिरा-भाईंदर शहराच्या विविध भागांत रस्त्यालगतच्या मोकळ्या जागेत शिवसेनेच्या शिंदे गटाने कंटेनरमध्ये शाखा उभारल्या आहेत. या कंटेनर शाखा बेकायदा असल्याचे सांगत काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट), मनसे इत्यादी राजकीय पक्षांनी त्यांना तीव्र विरोध दर्शवला आहे. या मुद्द्यावर आंदोलनेही झाली. सोमवारी सर्वपक्षीय विरोधकांनी एकत्र येत महापालिका आयुक्त संजय काटकर यांची भेट घेतली. शिंदे गटाच्या बेकायदा शाखांवर कारवाईची मागणी त्यांनी यावेळी केली. त्यावर, राजकीय पक्षांच्या बेकायदा कार्यालयांवरील कारवाई संदर्भात याआधी महासभेत मंजूर केलेल्या ठरावानुसार योग्य ती कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन आयुक्त काटकर यांनी त्यांना दिले.

मात्र महापालिकेने यानुसार कारवाई केल्यास, शिंदे गटासह विविध राजकीय पक्षांच्या सुमारे ५५ कार्यालयांवर कारवाई होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिंदे गटाच्या कार्यालयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या अन्य राजकीय पक्षांपुढेच अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे आगामी काळात त्यांची भूमिका मवाळ होण्याची शक्यता वर्तवण्यात येते. सामान्य नागरिकांनी बेकायदा बांधकाम केल्यास महापालिका प्रशासनाकडून तात्काळ त्यावर कारवाई केली जाते. विविध राजकीय पक्षांनी उभारलेल्या बेकायदा कार्यालयांवर मात्र मागील अनेक वर्षांपासून दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे महापालिकेची भूमिका राजकीय पक्षांसाठी वेगळी आणि सर्वसामान्यांसाठी वेगळी असल्याची टीका नागरिक करत आहेत. त्यामुळे राजकीय पक्षांच्या शहरातील सर्वच बेकायदा कार्यालयांवर कारवाई व्हायला हवी, असे मत जागरूक नागरिकांकडून व्यक्त केले जात आहे.

Previous Post

दोन पोलीस कर्मचारी अमली पदार्थ तस्करी प्रकरणात बडतर्फ

Next Post

‘गेट वे ऑफ इंडिया’ येथे समुद्रात कचरा टाकणाऱ्यावर पोलीसांची कारवाई

Next Post
‘गेट वे ऑफ इंडिया’ येथे समुद्रात कचरा टाकणाऱ्यावर पोलीसांची कारवाई

‘गेट वे ऑफ इंडिया’ येथे समुद्रात कचरा टाकणाऱ्यावर पोलीसांची कारवाई

BreakingNews

विधानसभा प्रचारात एकही शब्द नाही, पण शिर्डीत मात्र काढलं सर्व काही : अमित शाह यांचा ठाकरे – पवारांवर जोरदार हल्लाबोल

मोठ्या जनक्षोभानंतर खेलरत्न पुरस्काराच्या अंतिम यादीत मनु भाकरचे नाव समाविष्ट होणार का ?

सुमतीताईंनी संघर्षातून निर्माण केलेल्या विश्वासार्हतेच्या पायावर यशाचा कळस – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शाहपूरमधील भयानक घटना, ज्वेलर्सच्या सेल्समनवर गोळीबार; हल्ल्यात एकाचा मृत्यू

हिवाळी अधिवेशनात १७ विधेयके मंजूर

बोट दुर्घटनेमध्ये नौदलाच्या स्पीडबोट चालकाविरोधात गुन्हा दाखल, नौदलाने चौकशीचे दिले आदेश

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.