Lokrakshanay
Tuesday, January 20, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

‘आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी’ उपक्रमातून १३ लाखांहून अधिक वारकऱ्यांना आरोग्य सेवा

आषाढी वारीनिमित्त विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरीच्या दिशेने निघालेल्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी आरोग्य विभाग ‘आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी’ हा उपक्रम राबवीत आहे.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
July 19, 2024
in ताज्या बातम्या, मुंबई
‘आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी’ उपक्रमातून १३ लाखांहून अधिक वारकऱ्यांना आरोग्य सेवा
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : आषाढी वारीनिमित्त विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरीच्या दिशेने निघालेल्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी आरोग्य विभाग ‘आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी’ हा उपक्रम राबवीत आहे. या वारीमध्ये १७ जुलैपर्यंत १३ लाख ९६ हजार ७२ वारकऱ्यांवर मोफत उपचार करण्यात आले आहेत. आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांची संकल्पना आणि मार्गदर्शनाखाली हा विशेष उपक्रम सार्वजनिक आरोग्य विभागाच्यावतीने राबविण्यात आला.   संत श्री ज्ञानेश्वर महाराज, श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखीसह राज्यातील विविध जिल्ह्यांतून पंढरपूरला निघालेल्या संतांच्या पालख्या आणि राज्यातील सुमारे १ हजार दिंड्यांमध्ये सहभागी झालेले लाखो वारकरी आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनासाठी आले. त्यांना रस्त्यात काही त्रास जाणवला तर लगेच उपचार मिळावेत, यासाठी आरोग्य विभागाने सलग दुसऱ्या वर्षी ‘आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी’ हा उपक्रम हाती घेतला होता. प्रत्येक ५ किलोमीटरवर एक ‘आपला दवाखाना’ तयार करण्यात आला होता. वारी दरम्यान ६ हजार ३६८ आरोग्य अधिकारी, कर्मचारी यांनी वारकऱ्यांना आरोग्य सेवा पुरविल्या. तात्पुरत्या रुग्णालयात दाखल करून २,३२७ रुग्णांवर उपचार करण्यात आले. पालखी आणि दिंडी मुक्कामी असणाऱ्या ठिकाणी ५ खाटांचे तात्पुरते अतिदक्षता विभाग (आयसीयू) सज्ज ठेवण्यात आले होते. येथे ऑक्सिजन, मॉनिटर, औषधे यांच्यासह तज्ज्ञ डॉक्टरांची सुविधा उपलब्ध करण्यात आली होती.

या आषाढी वारीमध्ये डॉक्टर, नर्स, आरोग्य सहाय्यक, आशा, आरोग्य सेवक, शिपाई, सफाई कामगार अशा सर्व कर्मचाऱ्यांनी सेवा दिली. पालखी मार्गावर ताप, सर्दी, खोकला, ड्रेसिंग, जुलाबचा त्रास झाल्यास सेवेसाठी दुचाकी रुग्णवाहिका तैनात ठेवण्यात आली होती. आषाढी वारीमध्ये पालखी मार्गावर गर्दी जास्त असल्याने प्रत्येक ठिकाणी मोठी रुग्णवाहिका फिरू शकत नाही. त्यासाठी दुचाकी रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. फिरत्या रुग्णवाहिकेबरोबरच १०२ व १०८ या रुग्णवाहिकाही पालखी मार्गावर सेवा देत होत्या. तसेच पालखीमध्ये दिंडी प्रमुखांना आरोग्य कीट देण्यात आली होती. रुग्णवाहिकेबरोबरच महिलांसाठी प्रत्येक ठिकाणी हिरकणी कक्षाची सोयही करण्यात आली होती.

  • प्रत्येक ५ किमी अंतरावर ‘आपला दवाखाना’- २५८
  • वारी दरम्यान १०२ व १०८ रुग्णवाहिका २४ बाय ७ उपलब्ध – ७०७
  • दिंडी प्रमुखांसाठी औषधी कीट – ५८८५
  • महिला वारकऱ्यांसाठी स्त्री रोग तज्ज्ञ – १३६
  • पालखी मुक्कामाच्या ठिकाणी हिरकणी कक्षाची स्थापना –१३६
  • पालखी मार्गावर आरोग्य दूत –२१२
  • पालखी सोबत माहिती, शिक्षण व संदेशवहन चित्ररथ – ९
  • पालखी मुक्कामाच्या ठिकाणी ५ खाटांची क्षमता असलेले अतिदक्षता कक्ष – ८७
  • आरोग्य शिक्षण संवाद आरोग्य ज्ञानेश्वरी उपक्रम.
Previous Post

डोंबिवली, कल्याण येथील सैन्यात भरतीचे आमिष दाखवून भामट्यांकडून ४६ लाख रुपयांचा गंडा घातला

Next Post

सीएसएमटीहून १२:१४ ला शेवटची लोकल; मध्य, हार्बर रेल्वेवर उद्या मध्यरात्री ‘ब्लॉक’

Next Post
मोबाइल चोरीसाठी तरूणावर हल्ला; मध्य रेल्वेत फटका गँग पुन्हा सक्रीय, धावत्या लोकलमधून पडून प्रवाशाने गमावले दोन्ही पाय

सीएसएमटीहून १२:१४ ला शेवटची लोकल; मध्य, हार्बर रेल्वेवर उद्या मध्यरात्री 'ब्लॉक'

BreakingNews

ज्येष्ठ संगीतकार इलयाराजा यांना पद्मपाणी पुरस्कार जाहीर

स्मार्टफोन युजर्ससाठी येणार ‘हे’ ९ नवीन इमोजी

पुण्यातील डेक्कन जिमखाना परिसरातील चंदनाच्या झाडांची चोरी

प्रजासत्ताक दिन संचलनात महाराष्ट्राचा ‘गणेशोत्सव’

मुंबई पोलिसांच्या ‘हाऊसिंग टाऊनशिप’ प्रकल्पाला मंजूरी!

प्रजासत्ताक दिनापासून विरार चर्चगेट मार्गावर वाढणार एसी लोकल फेऱ्या

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.