Lokrakshanay
Monday, March 16, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home गुन्हेगारी

डोंबिवली, कल्याण येथील सैन्यात भरतीचे आमिष दाखवून भामट्यांकडून ४६ लाख रुपयांचा गंडा घातला

बेरोजगार तरूणांकडून एकूण ४६ लाख ५० हजार रूपये उकळून त्यांना नोकरी न देता ते पैसे स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी वापरणाऱ्या डोंबिवली, कल्याणमधील तीन भामट्यांच्या विरुध्द मानपाडा पोलीस ठाण्यात गु्न्हा दाखल करण्यात आला आहे.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
July 18, 2024
in गुन्हेगारी, ताज्या बातम्या
कल्याणमध्ये शेअर व्यवहारातून वृद्धांची १९ लाखांची फसवणूक
Share on FacebookShare on Whatsapp

कल्याण : आपली सैन्य दलात ओळख आहे. आपण तुम्हाला त्या ठिकाणी नोकरीला लावून देतो. या बदल्यात रायगड, ठाणे, कल्याण, डोंबिवली परिसरातील नऊ बेरोजगार तरूणांकडून एकूण ४६ लाख ५० हजार रूपये उकळून त्यांना नोकरी न देता ते पैसे स्वताच्या आर्थिक फायद्यासाठी वापरणाऱ्या डोंबिवली, कल्याणमधील तीन भामट्यांच्या विरुध्द मानपाडा पोलीस ठाण्यात गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. हरिश्चंद्र गणपत जाधव (रा. दर्शन इमारत, चिंचपाडा रस्ता, ज्योतीनगर,कल्याण पूर्व), बाळकृष्ण गावडे (रा. संत ज्ञानेश्वर मार्ग, पंतनगर, घाटकोपर), नवनाथ पोपलेकर (रा. देसलेपाडा, डोंबिवली) अशी फसवणूक करणाऱ्या आरोपींची नावे आहेत. ज्ञानेश्वर वासुदेव भिलारे (५९) असे फसवणूक झालेल्या नागरिकाचे नाव आहे. ते सेवानिवृत्त आहेत. ते रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील दिवील गावचे रहिवासी आहेत. जानेवारी २०२० पासून हा फसवणुकीचा प्रकार सुरू होता. पोलिसांनी सांगितले, आरोपी हरिश्चंद्र, बाळकृष्ण आणि नवनाथ यांनी संगनमत करून तक्रारदार ज्ञानेश्वर भिलारे यांच्यासह नऊ जणांना जानेवारी २०२० मध्ये संपर्क केला. त्यांनी आपली सैन्य दलात उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची चांगली ओळख आहे. आपण सैन्य दलातील नोकरीचे काम या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून करून देतो. यापूर्वी अशी कामे आपण केली आहेत, अशी थाप या तीन जणांनी फसवणूक झालेल्या तरूणांना मारली.

ही नोकरी मिळविण्यासाठी प्रत्येकी चार ते पाच लाख रूपये द्यावे लागतील, असे भामट्यांनी तरूणांना सांगितले. सरकारी आणि सैन्य दलात नोकरी मिळते म्हणून तरूणांनी पैशांची जमवाजमव करून पैसे टप्प्याने भामट्यांच्या स्वाधीन केले. हे पैसे भामट्यांनी डोंबिवली पूर्वेतील उंबर्ली रस्त्यावरील विद्यानिकेतन शाळा परिसरातील ओशन हाईट्स इमारतीत आणि महाड येथे स्वीकारले. पैसे स्वीकारल्यानंतर वेगवेगळी कारणे देऊन भामटे तरूणांची दिशाभूल करत होते. मुलाखत, वैद्यकीय चाचण्या न करता तरूणांना सैन्य दलातील नेमणुकीची पत्रे मिळणार होती. भामट्यांनी तरूणांना सैन्य दलात नोकरी देण्याची बनावट नेमणूक पत्रे सैन्य दलाच्या शीर्षक पत्रावर तयार केली. ही पत्रे तरूणांना दिली. आपणास कोणतेही कष्ट न घेता सैन्य दलात नोकरी मिळाली या आनंदात तरूण होते. त्यांनी नेमणूक पत्रांची नंतर खात्री केली. त्यावेळी त्यांना ही पत्रे बनावट असल्याचे सांगण्यात आले. तरूणांनी या भामट्यांना संपर्क केला तर त्यांनी त्यांना प्रतिसाद देणे बंद केले. आपले पैसे परत देण्याचा तगादा तरूणांनी लावला तर त्यालाही भामट्यांनी दाद दिली नाही. आपली फसवणूक झाल्याचे कळल्यावर ज्ञानेश्वर भिलारे यांच्या पुढाकाराने तरूणांनी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पोलीस उपनिरीक्षक भारत ढेंबरे या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Previous Post

डोंबिवलीतील रहिवाशांसह जमावावर गुन्हा; बेकायदा राधाई गृहसंकुल तोडण्यास विरोध

Next Post

‘आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी’ उपक्रमातून १३ लाखांहून अधिक वारकऱ्यांना आरोग्य सेवा

Next Post
‘आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी’ उपक्रमातून १३ लाखांहून अधिक वारकऱ्यांना आरोग्य सेवा

‘आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी’ उपक्रमातून १३ लाखांहून अधिक वारकऱ्यांना आरोग्य सेवा

BreakingNews

माहिती अधिकाराचा गैरवापर करत गौरव स्वीट्सला लुटण्याचा प्रयत्न; पोलिसांकडून दोघांना बेड्या

बुलाती है मगर जाने का नहीं… ‘टिंडर’चा भयानक कांड

वरळीत गॅस सिलिंडरचा काळाबाजार उघड! विशेष मोहिमेअंतर्गत १७२ एलपीजी सिलिंडर जप्त

दिसायला पिवळं, चवीला गोड! वसई-विरारच्या बाजारपेठेत नवीन फळाची एन्ट्री

मराठी नाही तर मान्यता नाही! शिक्षणमंत्र्यांचा शाळांना कठोर कारवाईचा इशारा

गॅस सिलिंडरची लूट थांबणार! तक्रारीसाठी ठाणे प्रशासनाकडून हेल्पलाईन नंबर जारी

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.