Lokrakshanay
Wednesday, April 8, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ठाणे

रुग्णांच्या दारी पोहचले आरोग्यदूत! ठाणे जिल्ह्यात घरपोच उपशामक उपचार मोहिमेला यश

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
April 3, 2026
in ठाणे, ताज्या बातम्या
रुग्णांच्या दारी पोहचले आरोग्यदूत! ठाणे जिल्ह्यात घरपोच उपशामक उपचार मोहिमेला यश
Share on FacebookShare on Whatsapp

ठाणे : गंभीर व दीर्घकालीन आजारांनी त्रस्त रुग्णांना वेदनामुक्त आणि सन्मानाने जीवन जगता यावे, यासाठी राज्य शासनाच्या उपशामक काळजी (पॅलिएटिव्ह केअर) योजनेची ठाणे जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी होत असून, हजारो रुग्णांना थेट घरपोच आरोग्य सेवांचा दिलासा मिळत आहे. जिल्ह्यात या योजनेअंतर्गत आतापर्यंत एकूण १ हजार ३३२ रुग्णांची नोंद झाली असून, आरोग्य पथकांकडून १ हजार ३१८ घरभेटी देण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, रुग्णांच्या प्रकृतीनुसार नियमित तपासणी, औषधोपचार आणि समुपदेशनावर भर देण्यात येत आहे. जिल्हा आरोग्य विभागाकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे.

उपशामक काळजी म्हणजे गंभीर, दीर्घकालीन किंवा जीवघेण्या आजारांनी ग्रस्त रुग्णांना पूर्णपणे बरे करण्यावर नाही, तर त्यांच्या वेदना कमी करून जीवनमान सुधारण्यावर केंद्रित केलेली वैद्यकीय सेवा. या काळजीत वेदनाशमन, शारीरिक त्रास कमी करणे, मानसिक आधार देणे, समुपदेशन तसेच रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांना भावनिक व सामाजिक पाठबळ देणे यांचा समावेश असतो. कर्करोग, पक्षाघात, वृद्धापकाळातील आजार किंवा इतर दीर्घकालीन आजारांमध्ये रुग्णाला सन्मानाने आणि शक्य तितक्या आरामदायी पद्धतीने जीवन जगता यावे, हा उपशामक काळजीचा मुख्य उद्देश असतो. याच अंतर्गत आतापर्यंत एकूण १ हजार ३३२ रुग्णांची नोंद झाली असून, आरोग्य पथकांकडून १ हजार ३१८ घरभेटी देण्यात आल्या आहेत. मध्यम ते तीव्र वेदना असलेल्या ३४७ रुग्णांवर उपचार सुरू असून, कर्करोगग्रस्त १२७ रुग्णांना विशेष सेवा पुरविण्यात आली आहे. तसेच इतर आजारांनी ग्रस्त ४९७ रुग्णांनाही या योजनेचा लाभ मिळत आहे. तालुकानिहाय पाहता, अंबरनाथ (५४२), भिवंडी (२८६), मुरबाड (१९६), शाहापूर (२०६) आणि कल्याण (१०२) या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात सेवा देण्यात आल्या आहेत. घरभेटींच्या माध्यमातून रुग्णांपर्यंत पोहोचून उपचार देण्यावर आरोग्य विभागाने विशेष लक्ष केंद्रित केले आहे.

Previous Post

पाळीच्या दिवसातही विद्यार्थिनींना मिळणार हक्काचा आराम; शाळांमध्ये सॅनिटरी नॅपकिनसह ‘पिंक रूम’ सज्ज

Next Post

पुण्यात ‘पोर्टर’ डिलिव्हरी ॲपवरून ड्रग्ज विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ४ आरोपींना बेड्या

Next Post
पुण्यात ‘पोर्टर’ डिलिव्हरी ॲपवरून ड्रग्ज विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ४ आरोपींना बेड्या

पुण्यात 'पोर्टर' डिलिव्हरी ॲपवरून ड्रग्ज विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ४ आरोपींना बेड्या

BreakingNews

खासगी बसवर सरकारचा डिजिटल ‘वॉच’; आता फिटनेसपासून ड्रायव्हरपर्यंत सर्वकाही ट्रॅक होणार!

गरीब महिलांच्या नशिबी पुन्हा धुराचे लोट; सिलिंडर उपलब्ध नसल्याने चुलीचाच आधार

मुंबई-पुणे एक्सप्रेस वे १० पदरी होणार

पॅन कार्ड प्रक्रियेत आता आधारसोबत मतदान कार्ड किंवा जन्म दाखला बंधनकारक – आयकर विभागाचा इशारा

ठाणेकरांच्या खिशाला कात्री! मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांनी ओलांडला शंभरीचा टप्पा

राज्यातील प्रत्येक शाळेत मासिक पाळीच्या काळात विश्रांतीसाठी ‘पिंक रूम’! विद्यार्थिनींच्या आरोग्य आणि सुरक्षिततेसाठी शिक्षणमंत्र्यांचा मोठा निर्णय

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.