Lokrakshanay
Wednesday, April 29, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

पुण्यात गौतमी पाटीलच्या कारची रिक्षाला जोरदार धडक, रिक्षाचालक गंभीर जखमी

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
October 1, 2025
in ताज्या बातम्या, पुणे
पुण्यात गौतमी पाटीलच्या कारची रिक्षाला जोरदार धडक, रिक्षाचालक गंभीर जखमी
Share on FacebookShare on Whatsapp

पुणे : पुण्यामध्ये मंगळवारी मुंबई-बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावरील वडगाव बुद्रुक परिसरात एक विचित्र अपघात झाला. हॉटेल विश्वाससमोरील सर्व्हिस रोडवर झालेल्या अपघातात प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलच्या कारने रिक्षाला जोरदार धडक दिली. गौतमी पाटीलच्या मालकीची एमएच १२ डब्ल्यू झेड ६५८९ या क्रमांकाच्या कारने एका रिक्षाला जोरदार धडक दिली. या धडकेत धायरीमधील गारमळा येथील उझ्वल दीप सोसायटीत राहणारा ४४ वर्षीय रिक्षाचालक सामाजी विठ्ठल मरगळे गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात मंगळवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास घडला.

रिक्षाचालक प्रवासी घेण्यासाठी वडगाव बुद्रुक येथील हॉटेल विश्वाससमोरील सर्व्हिस रोडवर थांबले असताना, भरधाव वेगाने आलेल्या कारने त्यांच्या रिक्षाला पाठीमागून जोरदार धडक दिली. याप्रकरणी रिक्षाचालक सामाजी मरगळे यांचे मित्र युवराज ज्ञानोबा साळवे (वय ३२) यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात चारचाकी चालकाविरुद्ध फिर्याद दिली आहे. सिंहगड रोड पोलिसांनी कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, गौतमी पाटील यांच्या मालकीच्या कारची रिक्षाला मागून एवढ्या जोरदार धडक बसली की रिक्षाचे मोठे नुकसान झाले आहे. रिक्षाचालक मरगळे गंभीररित्या जखमी झाला आहे. तसेच अपघात झाला तेव्हा या रिक्षामध्ये दोन प्रवासी असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी दिली आहे. धडक दिल्यानंतर कार चालक घटनास्थळी न थांबता पळून गेला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी तातडीने धाव घेतली आणि मदतकार्य केले. ​अपघातातील जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. रिक्षाचालकाची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच सिंहगड रोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आणि पुढील तपास सुरू केला आहे. पोलीस या अपघाताच्या नेमक्या कारणांचा अधिक तपास करत आहेत. पोलिसांना या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी अवघ्या काही तासात कारसह चालकाला ताब्यात घेतले आहे. कारचालकाने दिलेल्या माहितीनुसार, अपघात झाला तेव्हा गौतमी पाटील गाडीत नव्हती.

Previous Post

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला ‘डीजीसीए’ कडून परवाना मंजूर

Next Post

कल्याणमधील प्रसिद्ध शाळेच्या विद्यार्थ्यांना कपाळावर टिळा, हाताला धागा-बांगड्या घालण्यास बंदी; पालकांमध्ये नाराजी व्यक्त

Next Post
कल्याणमधील प्रसिद्ध शाळेच्या विद्यार्थ्यांना कपाळावर टिळा, हाताला धागा-बांगड्या घालण्यास बंदी; पालकांमध्ये नाराजी व्यक्त

कल्याणमधील प्रसिद्ध शाळेच्या विद्यार्थ्यांना कपाळावर टिळा, हाताला धागा-बांगड्या घालण्यास बंदी; पालकांमध्ये नाराजी व्यक्त

BreakingNews

पुण्यात ‘बाल पुस्तक जत्रे’चे आयोजन; ३० एप्रिलपासून मुलांसाठी ज्ञान-मनोरंजनाची मेजवानी

स्मार्टफोनला पर्याय ठरतोय ‘टिन कॅन’; मुलांना स्क्रीनपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न

भूमाफियांना सिडकोची चपराक; खांदा कॉलनीतील दिडशे कोटींचा भूखंड पुन्हा ताब्यात

पुणे ग्रामीण पोलिसांचा दणका: दोन सराईत टोळ्या जेरबंद, २३ गुन्ह्यांची उकल!

रेबीज लसीकरणात ‘शताब्दी’ हॉस्पिटल नंबर १; एका वर्षात २३,७३६ इंजेक्शनचा टप्पा पार

पुण्यात जाहिरात फलकांवर ‘क्यूआर कोड’ बंधनकारक; बेकायदा फलकांवर कारवाई

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.