Lokrakshanay
Thursday, April 23, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home मनोरंजन

मालवणी बोलीभाषेतील ‘वस्त्रहरण’ नाटकाचे लेखक गंगाराम गवाणकर यांचे निधन

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
October 28, 2025
in मनोरंजन, मुंबई
मालवणी बोलीभाषेतील ‘वस्त्रहरण’ नाटकाचे लेखक गंगाराम गवाणकर यांचे निधन
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : मालवणी बोलीभाषेतील ‘वस्त्रहरण’ या पाच हजारांहून अधिक प्रयोग करणाऱ्या लोकप्रिय नाटकाचे लेखक गंगाराम गवाणकर यांचे सोमवारी रात्री प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. वयोपरत्वे आलेल्या आजारांशी झुंजणाऱ्या गवाणकर यांच्यावर दहिसर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी मंगळवारी, २८ ऑक्टोबर रोजी सकाळी ९.३० वाजता बोरिवली येथील प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर दहिसर येथील अंबावाडी, दौलतनगर स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात मुले आणि नातवंडे असा परिवार आहे.

‘वस्त्रहरण’ या एकाच नाटकाने गंगाराम गवाणकर यांना मराठी नाट्यसृष्टीच्या इतिहासात अजरामर केले. पहिल्यांदाच मालवणी भाषेतील नाटक मुख्य व्यावसायिक नाटकांच्या प्रवाहात आणून लोकप्रिय करण्याचे श्रेय गवाणकर यांच्याकडे जाते. ‘महाभारता’तील व्यक्तिरेखा आणि कथेचा सुंदर उपयोग करून वास्तव घटनांवरील भाष्य करणारे ‘वस्त्रहरण’ सारखे फार्सिकल नाटक आजही तितकेच लोकप्रिय आहे. ‘वस्त्रहरण’सारखे कालातीत नाटक देणाऱ्या गवाणकर यांनी व्यंगात्मक मांडणी असलेली नाटके लिहिली. ‘वस्त्रहरण’ ही त्यांची अखेरपर्यंत खरी ओळख ठरली. या नाटकाच्या निमित्ताने आलेल्या आठवणी आणि त्या अनुषंगाने आपल्या आयुष्यातील वाटचाल त्यांनी ‘व्हाया वस्त्रहरण’ या पुस्तकातून शब्दबध्द केली. याशिवाय, त्यांनी ‘ऐसपैस’ ही कादंबरी लिहिली होती. तसेच, रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेल्या कथासंग्रहाचा त्यांनी केलेला अनुवाद ‘चित्रांगदा’ या नावाने प्रकाशित झाला आहे. विविधांगी विषयावर लेखन करणारा, वैयक्तिक संघर्षाचे भांडवल न करता साहित्याच्या माध्यमातून व्यक्त होणारा त्यांच्यासारखा मनस्वी लेखक आज हरपला. मालवणी बोलीभाषेला सातासमुद्रापार नेणारा नाटककार हा गंगाराम गवाणकर यांचा लौकिक कायम राहिल.

Previous Post

बावधनमध्ये परदेशी इ-सिगारेटचा साठा जप्त

Next Post

धक्कादायक! रजनीकांत यांच्या घरी बॉम्ब ठेवल्याची धमकी

Next Post
धक्कादायक! रजनीकांत यांच्या घरी बॉम्ब ठेवल्याची धमकी

धक्कादायक! रजनीकांत यांच्या घरी बॉम्ब ठेवल्याची धमकी

BreakingNews

BESTची डिजिटल झेप; Google Pay, PhonePe सह २८ ॲप्सवरून तिकीट खरेदीची सुविधा

ठाणे पोलिसांचा ‘खाकी’ला शिस्तीचा डोस; विनाहेल्मेट दुचाकी चालवणे पोलिसांना पडणार महागात

१ मेपासून रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी अनिवार्य; निर्णयाविरोधात आंदोलनाचा इशारा

पनवेलच्या खाडीशेजारी बांधणार ‘खारघर कोस्टल रोड’, ४५ मिनिटांचा प्रवास १० मिनिटांत

फॉरेन्सिक ऑडिटमध्ये २० कोटींचा घोटाळा उघड; वरिष्ठ अधिकारी गोत्यात

कळंबोलीतील कॉन्सर्टला सिडकोची ‘नकारघंटा; स्थानिकांच्या विरोधामुळे प्रशासन नमले

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.