Lokrakshanay
Monday, May 4, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

एपीएमसी मार्केट शौचालय घोटाळा प्रकरणी माजी संचालक संजय पानसरेंना अटक

७ कोटींच्या या शौचालय घोटाळा प्रकरणात यापूर्वी तिघांना अटक करण्यात आली आहे. तर याप्रकरणातील ७ अधिकारी फरार आहेत. संजय पानसरे यांच्यासह ७ अधिकाऱ्यांचा मुंबई हायकोर्टाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
April 25, 2024
in ताज्या बातम्या, नवी मुंबई
एपीएमसी मार्केट शौचालय घोटाळा प्रकरणी माजी संचालक संजय पानसरेंना अटक
Share on FacebookShare on Whatsapp

नवी मुंबई : नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणजेच एपीएमसी मार्केटमधील शौचालय घोटाळा प्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या घोटाळा प्रकरणात फळ मार्केटचे माजी संचालक संजय पानसरे यांना गुन्हे शाखेने अटक केली आहे. ७ कोटींच्या या शौचालय घोटाळा प्रकरणात यापूर्वी तिघांना अटक करण्यात आली आहे. तर याप्रकरणातील ७ अधिकारी फरार आहेत. संजय पानसरे यांच्यासह ७ अधिकाऱ्यांचा मुंबई हायकोर्टाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने एपीएमसी मार्केटचे माजी संचालक संजय पानसरे यांना अटक केली. तर कांदा बटाटा बाजार समितीचे माजी संचालक अशोक वाळुंज यांची पोलिसांनी चौकशी केली. तर या प्रकरणात अन्य संचालकांवर अटकेची टांगती तलवार आहे. याप्रकरणात साताऱ्याचे शरद पवार गटाचे नेते आणि लोकसभेचे उमेदवार शशिकांत शिंदे यांना अंतरिम जामीन मिळाला आहे.

एपीएमसी मार्केट परिसरातील शौचालय चालवण्यासाठी देण्यात येणाऱ्या कंत्राटामध्ये कमी दरामध्ये कंत्राट देत शासनाचे ७ कोटींपेक्षा जास्त रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप करण्यात आला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल करत नवी मुंबईच्या गु्न्हे शाखेने तपासाला सुरुवात केली होती. याप्रकरणी गुन्हे शाखेने आतापर्यंत तीन जणांना अटक केली होती. आणखी एकाला म्हणजे संजय पानसरे यांना अटक केली. याप्रकरणात आतापर्यंत ४ जण अटकेत आहेत. तर पोलिसांनी अशोक वाळुंज यांची देखील चौकशी केली. अटक करण्यात आलेले संजय पानसरे हे एपीएमसी मार्केटमधील संचालकांपैकी सर्वात मोठे संचालक आहेत. त्यांच्या अटकेनंतर आता इतर संचालक देखील घाबरले आहेत. दरम्यान, नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट हे आशियातील सर्वात मोठे आणि प्रसिद्ध मार्कट म्हणून ओळखले जाते. एपीएमसी मार्केट परिसरात असलेल्या शौचालयाच्या कंत्राटामध्ये घोटाळा झाल्याची बाब समोर आली होती. शौचालयाच्या कंत्राटामध्ये सरकारचे ७ कोटी ६१ लाख ४९ हजार ६८९ रुपयांचे नुकसान झाल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. याप्रकरणी आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह आठ जणांवर आरोप करण्यात आला आहे. २०२३ मध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी नवी मुंबई पोलिस तपास करत आहेत. याप्रकरणात आतापर्यंत ४ जणांना अटक केली आहे.

Previous Post

वन विभागाकडे २०११ हेक्टर खारफुटी जंगल हस्तांतरित करण्यास प्राधिकरणांकडून होतोय विलंब

Next Post

पीएमपीच्या ऑनलाईन तिकीट विक्री मशीन्सचा बट्ट्याबोळ; प्रवाशांसोबत सातत्याने वाद

Next Post
पीएमपीच्या ऑनलाईन तिकीट विक्री मशीन्सचा बट्ट्याबोळ; प्रवाशांसोबत सातत्याने वाद

पीएमपीच्या ऑनलाईन तिकीट विक्री मशीन्सचा बट्ट्याबोळ; प्रवाशांसोबत सातत्याने वाद

BreakingNews

‘राजा शिवाजी’चा बॉक्स ऑफिसवर विक्रमी जलवा; पहिल्याच दिवशी १२.४० कोटींची कमाई

महाराष्ट्र पोलिस दलात मोठ्या पदोन्नती; ३६४ सहाय्यक पोलिस निरीक्षकांना बढतीचा मार्ग मोकळा

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानासाठी ऑनलाइन तिकीट बुकिंग सुरू; घरबसल्या करता येणार आरक्षण

महाराष्ट्रात ‘डिजिटल जनगणना २०२७’चा शुभारंभ; राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांकडून स्व-गणना पूर्ण

प्रामाणिकपणा, सेवा आणि समर्पण जपण्याची गरज; पुरस्कार विजेतेच जिवंत आदर्श – राज्यपाल जिष्णू देव वर्मा

HSC निकाल LIVE: दुपारी १ वाजल्यापासून रिझल्ट ऑनलाईन उपलब्ध

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.