Lokrakshanay
Tuesday, October 27, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

दिवाळीपूर्वी FDA ची राज्यभर ‘फेस्टिव्ह क्रॅकडाउन’ धडक मोहीम

९.११ कोटींचा अन्नसाठा जप्त, ६८ आस्थापनांचे परवाने निलंबित, २० आरोपींना अटक

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
October 26, 2026
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
दिवाळीपूर्वी FDA ची राज्यभर ‘फेस्टिव्ह क्रॅकडाउन’ धडक मोहीम
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : राज्यात अन्न व औषध प्रशासन विभागाकडून (FDA) भेसळयुक्त आणि निकृष्ट अन्नपदार्थांविरोधात कारवाईचे सत्र सुरूच आहे. FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार, अनियमितता आढळणाऱ्या आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यासह कठोर कारवाई केली जात आहे. आगामी दिवाळी आणि इतर सणांच्या पार्श्वभूमीवर विभागाने ‘फेस्टिव्ह क्रॅकडाउन’ मोहीम राबवली आहे. नवरात्रोत्सवादरम्यान राज्यभरात केलेल्या कारवाईत ९.११ कोटी रुपयांचा निकृष्ट आणि भेसळयुक्त अन्नसाठा जप्त करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगरमध्ये ४.१९ कोटी रुपयांचा अन्नसाठा जप्त करण्यात आला. याशिवाय, राज्यभरात ३.१५ कोटी रुपयांचा गुटखा, पानमसाला आणि तंबाखू जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत 68 आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले असून, सात आस्थापने बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच, २२ गुन्हे दाखल करण्यात आले असून, २० आरोपींना अटक करण्यात आली आहे. यावेळी ८३९२ किलो मुदतबाह्य, खराब आणि नाकारलेला अन्नसाठाही जप्त करण्यात आला. तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई, कोकण, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर या सहाही विभागांत ही मोहीम राबवण्यात आली. नष्ट करणे आवश्यक असलेले अन्नपदार्थ पुन्हा बाजारात आणून ग्राहकांच्या आरोग्याला धोका निर्माण करणाऱ्यांवर प्रशासनाने कारवाई केली आहे. दरम्यान, दिवाळीच्या काळात मिठाई, खवा, खाद्यतेल, सुकामेवा आणि फराळाच्या पदार्थांची मागणी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे FDA कडून तपासणी आणि कारवाईची मोहीम अधिक तीव्र केली जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर FDA च्या सोलापूर विभागातील झोन-२ ने माळशिरस येथे कारवाई केली. पुणे-पंढरपूर मार्गावर खवा वाहतूक करणाऱ्या MH २५ AJ ४०२३ क्रमांकाच्या वाहनावर छापा टाकून १३३७ किलो खवा जप्त करण्यात आला. हा खवा धाराशिव जिल्ह्यातील तीन उत्पादकांनी तयार केला होता. तो सातारा शहरातील घाऊक आणि किरकोळ विक्रेत्यांना विक्रीसाठी नेला जात होता. नियमांचे पालन न करता उघड्यावर वाहतूक होत असल्याचे आढळल्यानंतर तपासणी करण्यात आली. नाशवंत असल्याने जप्त केलेला खवा तपासणीनंतर खड्ड्यात टाकून नष्ट करण्यात आला.

Previous Post

विदा गळती झाल्यास कंपन्यांना २५० कोटींहून अधिक दंडाची तरतूद

Next Post

जुहू गोळीबाराच्या घटनेनंतर टायगर श्रॉफचा मोठा निर्णय; हल्ल्यानंतर अवघ्या ४ दिवसांत विकला खारमधील आलिशान फ्लॅट

Next Post
जुहू गोळीबाराच्या घटनेनंतर टायगर श्रॉफचा मोठा निर्णय; हल्ल्यानंतर अवघ्या ४ दिवसांत विकला खारमधील आलिशान फ्लॅट

जुहू गोळीबाराच्या घटनेनंतर टायगर श्रॉफचा मोठा निर्णय; हल्ल्यानंतर अवघ्या ४ दिवसांत विकला खारमधील आलिशान फ्लॅट

BreakingNews

कोल्हापूरकरांची दिवाळी गोड! बाजारपेठेत हापूस आंब्याची दिमाखात एंट्री

जे. जे. उड्डाणपुलाखाली पुन्हा सुरू होणार डबल डेकर बस उपहारगृह; एका बसमध्ये वाचनालयाचीही सुविधा

मतदार वगळल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस

जुहू गोळीबाराच्या घटनेनंतर टायगर श्रॉफचा मोठा निर्णय; हल्ल्यानंतर अवघ्या ४ दिवसांत विकला खारमधील आलिशान फ्लॅट

दिवाळीपूर्वी FDA ची राज्यभर ‘फेस्टिव्ह क्रॅकडाउन’ धडक मोहीम

विदा गळती झाल्यास कंपन्यांना २५० कोटींहून अधिक दंडाची तरतूद

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.