Lokrakshanay
Monday, May 19, 2025
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home Uncategorized

१२ हजार नावे समाविष्ट नसल्याचा आरोप; मुंबई पदवीधरमध्ये मतदार यादीचा घोळ

कोणत्याही कारणाशिवाय निवडणूक आयोगाने मुंबई पदवीधर मतदारसंघाच्या पुरवणी यादीत १२ हजार नावे समाविष्ट केली नाहीत, असा गंभीर आरोप शिवसेनेचे (ठाकरे गट) उमेदवार ॲड. अनिल परब यांनी केला.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
June 21, 2024
in Uncategorized
१२ हजार नावे समाविष्ट नसल्याचा आरोप; मुंबई पदवीधरमध्ये मतदार यादीचा घोळ
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : कोणत्याही कारणाशिवाय निवडणूक आयोगाने मुंबई पदवीधर मतदारसंघाच्या पुरवणी यादीत १२ हजार नावे समाविष्ट केली नाहीत, असा गंभीर आरोप शिवसेनेचे (ठाकरे गट) उमेदवार ॲड. अनिल परब यांनी केला. शिवसेनेने नोंदविलेली नावे यादीत समाविष्ट करण्यात आलेली नाहीत, पण सत्ताधारी पक्षाची नावे पुरवणी यादीत आली आहेत. निवडणूक आयोग सत्ताधारी पक्षाच्या दबावाखाली काम करीत असल्याचा आरोपही परब यांनी केला. पुरवणी मतदार यादीमध्ये शिवसेनेने जी नावे नोंदवली होती त्यातील बरीचशी नावे आलेली नाहीत. या मतदारांचे अर्ज स्वीकारल्याच्या पोचपावत्या आमच्याकडे आहेत. ज्यावेळेस अर्ज सादर केला जातो त्यावेळेस तो तपासूनच त्याची पोच पावती दिली जाते. ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर पोच पावती येते. पोच पावती दिली जात नाही त्यावेळेस तो अर्ज नाकारला जातो आणि त्याची कारणे दिली जातात. अर्ज नाकारण्याची कारणे समजणे हा अधिकार आहे. यंदा अर्ज स्वीकारूनही नावे आलेली नाहीत आणि त्याची कोणतीही कारणे आम्हाला दिलेली नाहीत. यात खूप मोठी गडबड असल्याचा आरोप परब यांनी केला. या संदर्भात अनिल परब आणि खासदार अनिल देसाई यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या शिष्टमंडळाने राज्य मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयाला यासंदर्भात तक्रार केली तसेच निवेदन दिले. निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी भेट देण्यास वेळ दिला नाही, असा आरोप परब यांनी केला.

पुरवणी मतदार यादीमध्ये शिवसेनेने नोंदवलेली बहुतांश नावे वगळली आहेत. मुसळधार पावसात पाणी भरणाऱ्या ठिकाणी मतदान केंद्रे उभारली आहेत. गैरसोयीची मतदान केंद्रे बदलून द्यावीत अशी आमची मागणी आहे. निवडणूक कर्तव्यावर असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना मतदान करण्यासंदर्भात काही व्यवस्था केलेली नाही, असा आरोप परब यांनी केला. मतदान केंद्र निश्चित करताना राजकीय पक्षांना विश्वासात घेतले नाही. एका घरात वास्तव्यास असलेल्या पतीस पश्चिमेकडील केंद्र तर पत्नीस पूर्वकडील मतदान केंद्रात मतदानासाठी देण्यात आल्याचे परब यांनी निदर्शनास आणून दिले. खासगी आस्थापनातील कर्मचाऱ्यांना मतदानासाठी दोन तासांची सूट देण्यासंदर्भातले निर्देश आयागाने जारी करावेत, अशी मागणी परब यांनी केली. मुक्त आणि पारदर्शक पद्धतीने निवडणुका घेण्याच्या तत्त्वाला यामुळे हरताळ फासला गेला आहे, अशी टीका परब यांनी केली.

निवडणूक आयोगाने नावे वगळण्याचे काम सत्ताधारी पक्षाच्या दबावामुळे केलेले आहे. शिवसेनेने नोंदवलेले मतदार वगळले असले तरी सत्ताधारी पक्षाने नोंदवलेले मतदार पुरवणीत यादीत कायम आहेत. निवडणूक आयोग हा सत्ताधारी पक्षाच्या कलाने काम करत असल्याचे वातावरण निर्माण झाले आहे. – ॲड. अनिल परब, आमदार (शिवसेना-ठाकरे गट)

Previous Post

मानपाडा पोलिसांची कारवाई; देशी बनावटीचे पिस्तूल व ६ काडतुसासह एकजण ताब्यात

Next Post

रोहित पवारांचा पालकमंत्री अजित पवारांना टोला; पुणे जिल्ह्याकडे पालकमंत्र्यांचे लक्षच नाही

Next Post
रोहित पवारांचा पालकमंत्री अजित पवारांना टोला; पुणे जिल्ह्याकडे पालकमंत्र्यांचे लक्षच नाही

रोहित पवारांचा पालकमंत्री अजित पवारांना टोला; पुणे जिल्ह्याकडे पालकमंत्र्यांचे लक्षच नाही

BreakingNews

विधानसभा प्रचारात एकही शब्द नाही, पण शिर्डीत मात्र काढलं सर्व काही : अमित शाह यांचा ठाकरे – पवारांवर जोरदार हल्लाबोल

मोठ्या जनक्षोभानंतर खेलरत्न पुरस्काराच्या अंतिम यादीत मनु भाकरचे नाव समाविष्ट होणार का ?

सुमतीताईंनी संघर्षातून निर्माण केलेल्या विश्वासार्हतेच्या पायावर यशाचा कळस – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शाहपूरमधील भयानक घटना, ज्वेलर्सच्या सेल्समनवर गोळीबार; हल्ल्यात एकाचा मृत्यू

हिवाळी अधिवेशनात १७ विधेयके मंजूर

बोट दुर्घटनेमध्ये नौदलाच्या स्पीडबोट चालकाविरोधात गुन्हा दाखल, नौदलाने चौकशीचे दिले आदेश

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.