Lokrakshanay
Friday, June 19, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

मतदानाच्या आदल्या दिवशी रात्री १० वाजेपर्यंत प्रचार करण्यास निवडणूक आयोगाची परवानगी

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
November 29, 2025
in ताज्या बातम्या, मुंबई
मतदानाच्या आदल्या दिवशी रात्री १० वाजेपर्यंत प्रचार करण्यास निवडणूक आयोगाची परवानगी
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची धामधूम शिगेला असताना राज्य निवडणूक आयोगाने उमेदवारांसाठी दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे. आगामी २ डिसेंबरला होणाऱ्या मतदानापूर्वी प्रचारासाठीची वेळ वाढवण्यात आली असून, आता उमेदवारांना १ डिसेंबरच्या रात्री १० वाजेपर्यंत प्रचार करण्याची परवानगी देण्यात आली आहे. आयोगाच्या या नव्या आदेशामुळे मतदानाच्या आधीच्या अंतिम दिवशी मतदारांपर्यंत पोहोचण्याचा उमेदवारांना अधिक अवधी मिळणार आहे.

आयोगाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार, यापूर्वी मतदानाच्या दिवसापूर्वीच्या २४ तासांपासून सर्व प्रकारचे प्रचारकार्य पूर्णतः बंद राहायचे. यात सभा, जाहीर मोर्चे, ध्वनिक्षेपकांचा वापर, तसेच वृत्तवाहिन्या आणि सोशल मीडियावरील निवडणूक जाहिरातींवरही प्रतिबंध होता. या मर्यादा उमेदवारांसाठी विशेषतः शेवटच्या क्षणी प्रचाराच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठरत होत्या. अपक्ष उमेदवारांना निवडणूक चिन्ह वाटप उशिराने करण्यात आले. त्यामुळे प्रचाराला अवधी मिळालाच नसल्याची तक्रार करण्यात आली होती. अखेर निवडणूक आयोगाने अपक्ष उमेदवारांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. निवडणूक आयोगाने नियमांमध्ये सशर्त शिथिलता देण्याचा निर्णय घेतला आहे. १ डिसेंबर रोजी रात्री १० वाजेपर्यंत प्रचार परवानगी मिळाल्याने उमेदवारांना अंतिम दिवशी सभा, पदयात्रा, घर-दार संपर्क मोहिमा आणि सोशल मीडियाद्वारे आपला संदेश पोहोचवण्याची अतिरिक्त संधी उपलब्ध झाली आहे.

Previous Post

नवीन वर्षापासून WhatsAppचे ‘हे’ फीचर होणार बंद!

Next Post

सिनेविश्वात शोककळा! कन्नड चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते उमेश यांचे निधन

Next Post
सिनेविश्वात शोककळा! कन्नड चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते उमेश यांचे निधन

सिनेविश्वात शोककळा! कन्नड चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते उमेश यांचे निधन

BreakingNews

पहिल्याच पावसात पोलखोल! नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पाणीच पाणी; टर्मिनलमधील गळतीचा व्हिडिओ व्हायरल

फिफा विश्वचषकात आज पाच रंगतदार सामने; नेदरलँड्स-स्वीडन लढतीकडे सर्वांचे लक्ष!

मराठा विद्यार्थ्यांची भरलेली फी परत मिळणार? सरकारकडून मोठे संकेत!

‘डॉन ३’ वादावर रणवीर सिंगचे मौन; पुढील १८ महिने मुलाखतींना नकार!

डोंबिवलीहून सुरू होणार ई-वॉटर टॅक्सी सेवा; ठाणे, मीरा-भाईंदर आणि नवी मुंबईला जलद जोडणी!

लोहगडावर फोटो काढताना तरुणाचा तोल गेला; ४५० फूट खोल दरीत पडून मृत्यू!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.