Lokrakshanay
Sunday, March 15, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ठाणे

डोंबिवली रेल्वे स्थानकातील प्लेटफॉर्मवर छत नसल्याने प्रवाशांना उन्हाचे चटके

डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांंक पाचवरील दिवा बाजूकडील विस्तारित फलाटावर गेल्या वर्षापासून छत नसल्याने प्रवाशांना आता उन्हाचे चटके सहन करत लोकल प्रवास करावा लागतो.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
April 15, 2024
in ठाणे, ताज्या बातम्या
डोंबिवली रेल्वे स्थानकातील प्लेटफॉर्मवर छत नसल्याने प्रवाशांना उन्हाचे चटके
Share on FacebookShare on Whatsapp

डोंंबिवली : डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांंक पाचवरील दिवा बाजूकडील विस्तारित फलाटावर गेल्या वर्षापासून छत नसल्याने प्रवाशांना आता उन्हाचे चटके सहन करत लोकल प्रवास करावा लागतो. मुंंबईला जाणारा बहुतांशी प्रवासी डोंबिवली रेल्वे स्थानकातून फलाट क्रमांक पाचवरील जलद लोकल पकडण्याला प्राधान्य देतो, या सर्व प्रवाशांना फलाटावरील छताअभावी आता उन्हाचे चटके सहन करावे लागतात. मागील तीन ते चार वर्षापूर्वी डोंबिवली रेल्वे स्थानकात १५ डब्याच्या लोकल उभ्या राहाव्यात अशा लांबीच्या फलाटांची बांधणी करण्यात आली आहे. फलाट क्रमांंक पाचवर पंधरा डब्याच्या फलाटामुळे छत्रपती शिवाजी टर्मिनसकडे धावणाऱ्या लोकल आता तीन डबे दिवा बाजूने जाऊन थांंबत आहेत. फलाटाच्या या विस्तारित भागात गेल्या दीड वर्षापासून छत नाही. त्यामुळे आता उन्हाचे चटके सहन करत प्रवाशांना लोकल पकडावी लागते. दुपारी एक ते चार वाजण्याच्या दरम्यानच्या लोकल पकडताना प्रवाशांची सर्वाधिक होरपळ होते. या तीन डब्यांमध्ये एक डबा महिलांचा असतो. त्यामुळे महिलांना उन्हाचे चटके सहन करत लोकल येईपर्यंत फलाटावर उभे राहावे लागते.

गेल्या वर्षी पावसाळ्यात छताअभावी प्रवाशांना पावसाचा त्रास सहन करावा लागला होता. या छताचे काम लवकर पूर्ण करावे म्हणून प्रवाशांनी, रेल्वे प्रवासी संघटनांनी मध्य रेल्वे प्रशासनाकडे मागणी केली आहे. त्याची दखल घेतली जात नसल्याचे प्रवाशांकडून सांगण्यात येते. डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक पाचवरून मुंबईला अति जलद लोकल धावतात. या लोकलने प्रवास करण्याला प्रवाशांचे अधिक प्राधान्य असते. त्यामुळे या फलाटावर प्रवाशांची सर्वाधिक गर्दी असते. फलाट पाचवर येणाऱ्या सर्वच लोकल विस्सारित भागात थांबतात. त्यामुळे लोकलचे तीन डबे छत नसलेल्या भागात थांबतात. अनेक प्रवासी छत्री घेऊन, महिला डोक्यावर ओढण्या घेऊन उन्हाचा त्रास टाळण्यासाठी फलाटावर लोकलची वाट पाहत उभे असतात.

रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले, डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक पाचवर विस्तारित भागात छत बसविण्याच्या कामाचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविला आहे. हा प्रस्ताव मंजूर झाला की तातडीने हे काम हाती घेण्यात येणार आहे. मागील वर्षभर डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक पाचवरील विस्तारित भागात छत नाही. प्रवासी उन, पावसात उभे राहून प्रवास करतात याविषयी वेळोवेळी रेल्वे प्रशासनाला कळविले आहे. डोंबिवली रेल्वे स्थानकातून प्रवासी उत्पन्नातून सर्वाधिक महसूल रेल्वेला मिळतो तरी प्रवाशांना सुविधा देण्यात टाळाटाळ का केली जाते. – लता अरगडे, अध्यक्षा, उपनगरी रेल्वे महिला प्रवासी महासंघ, डोंबिवली.

Previous Post

मुंबई मनपाची कारवाई; धोकादायक इमारतींना लवकरच नोटिसा

Next Post

राजकीय पक्षाचे संबंध पाहून कारवाई करू नका! उच्च न्यायालयाचे आदेश

Next Post
राजकीय पक्षाचे संबंध पाहून कारवाई करू नका! उच्च न्यायालयाचे आदेश

राजकीय पक्षाचे संबंध पाहून कारवाई करू नका! उच्च न्यायालयाचे आदेश

BreakingNews

वरळीत गॅस सिलिंडरचा काळाबाजार उघड! विशेष मोहिमेअंतर्गत १७२ एलपीजी सिलिंडर जप्त

दिसायला पिवळं, चवीला गोड! वसई-विरारच्या बाजारपेठेत नवीन फळाची एन्ट्री

मराठी नाही तर मान्यता नाही! शिक्षणमंत्र्यांचा शाळांना कठोर कारवाईचा इशारा

गॅस सिलिंडरची लूट थांबणार! तक्रारीसाठी ठाणे प्रशासनाकडून हेल्पलाईन नंबर जारी

संविधानिक मूल्यांचे रक्षण करणे ही काळाची गरज – डॉ. राम पुनियानी

युद्धभूमीतून प्रवास यशस्वी! होर्मुझ सामुद्रधुनी पार करून पहिले तेलवाहू जहाज मुंबईत दाखल

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.