Lokrakshanay
Saturday, May 2, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home Uncategorized

मुंबई मनपाची कारवाई; धोकादायक इमारतींना लवकरच नोटिसा

महापालिकेच्या 'डी' विभागातील ग्रॅन्ट रोड व चर्नी रोड स्थानक परिसरातील धोकादायक इमारतींच्या मालकांना नोटिसा बजावण्यात येणार आहेत.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
April 15, 2024
in Uncategorized, ताज्या बातम्या, मुंबई
मुंबई मनपाची कारवाई; धोकादायक इमारतींना लवकरच नोटिसा
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : महापालिकेच्या ‘डी’ विभागातील ग्रॅन्ट रोड व चर्नी रोड स्थानक परिसरातील धोकादायक इमारतींच्या मालकांना नोटिसा बजावण्यात येणार आहेत. याद्वारे योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना इमारत आणि कारखाने विभागाला उपायुक्त डॉ. संगीता हसनाळे यांनी दिल्या आहेत. रेल्वे रूळांलगत असलेल्या सांडपाणी वाहिन्यांची स्वच्छता करून परिसरातील कचरा, राडारोडा उचलावा जेणेकरून पाणी वाहण्यास अडथळा होणार नाही, अशाही सूचना त्यांनी पालिका अधिकाऱ्यांना रविवारी दिल्या. पावसाळ्यात गैरसोय होऊ नये म्हणून पालिका प्रशासन विविध उपाययोजना करत असून, यंदा देखील पावसाळापूर्व कामांचा निपटारा करण्यासाठी पालिका प्रशासन कामे करत आहे. पावसाळापूर्व बैठकीत आयुक्त भूषण गगराणी यांनी पश्चिम रेल्वे मार्गावरील मुंबई सेंट्रल, चर्नी रोड व ग्रँटरोड तसेच मध्य रेल्वे मार्गावरील सँडहर्स्ट रोड रेल्वे स्थानकाबाबत काही मुद्दे रेल्वे प्रशासनाने या बैठकीत उपस्थित केले होते.

या पार्श्वभूमीवर उपायुक्त डॉ. संगीता हसनाळे यांनी रेल्वे स्थानकांची पाहणी केली. या पाहणी दौऱ्यादरम्यान ३१ मे २०२४ पूर्वी पावसाळापूर्व कामे पूर्ण करण्यास प्राधान्य द्यावे, अशा सूचना संबंधित खात्यांना डॉ. हसनाळे यांनी दिल्या. पालिकेतर्फे दरवर्षी पावसाळ्यापूर्वी जुन्या आणि मोडकळीस आलेल्या इमारतींची पाहणी करण्यात येते. इमारतींचे अतिधोकादायक, धोकादायक व दुरुस्ती योग्य असे वर्गीकरण केले जाते. धोकादायक म्हणून जाहीर झालेल्या इमारतींचे रहिवासी आणि पालिका स्ट्रक्चरल ऑडिट करतात. अनेकदा पालिकेने केलेल्या स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये इमारत तातडीने रिकामी करण्याची सूचना केली जाते; त्यामुळे या परिसरातून धोकादायक इमारतींना नोटिसा देण्यात येणार आहेत.

Previous Post

घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्यावर गुन्हे शाखेची कारवाई, सव्वा तीन लाखांचा मुद्देमाल जप्त

Next Post

डोंबिवली रेल्वे स्थानकातील प्लेटफॉर्मवर छत नसल्याने प्रवाशांना उन्हाचे चटके

Next Post
डोंबिवली रेल्वे स्थानकातील प्लेटफॉर्मवर छत नसल्याने प्रवाशांना उन्हाचे चटके

डोंबिवली रेल्वे स्थानकातील प्लेटफॉर्मवर छत नसल्याने प्रवाशांना उन्हाचे चटके

BreakingNews

लाडकी बहीण’ आता पडद्यावर! एकनाथ शिंदेंच्या हस्ते ‘लाडकी बहीण’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

अमेरिकेकडून भारताला ६५७ प्राचीन वस्तू परत; तस्करी जाळ्यावर मोठा आघात

रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी आता मराठीचे धडे! १ मेपासून ‘व्यवहारिक मराठी’ पुस्तिका हाती, १५ ऑगस्टपर्यंतची डेडलाईन

७६ व्या वर्षीही फिटनेसचा जलवा; नाना पाटेकर यांचा वर्कआऊट व्हिडिओ व्हायरल

शेतकऱ्यांनो, सज्ज व्हा! आधारकार्डप्रमाणेच आता डिजिटल आयडी अनिवार्य

प्रताप सरनाईकांचा दणका! १५ रुपयांत ‘नाथजल’ न विकल्यास थेट परवाना रद्द करण्याचा इशारा

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.