Lokrakshanay
Monday, March 16, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ठाणे

नव्याने विस्तारित केलेल्या ठाणे रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्मवर तुंबले पाणी

ठाणे रेल्वे स्थानकातील नव्याने विस्तारित करण्यात आलेल्या फलाट क्रमांक पाचच्या रेल्वे रुळाजवळ मुसळधार पावसाचे पाणी तुंबले आहे.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
July 15, 2024
in ठाणे, ताज्या बातम्या
नव्याने विस्तारित केलेल्या ठाणे रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्मवर तुंबले पाणी
Share on FacebookShare on Whatsapp

ठाणे : ठाणे रेल्वे स्थानकातील नव्याने विस्तारित करण्यात आलेल्या फलाट क्रमांक पाचच्या रेल्वे रुळाजवळ मुसळधार पावसाचे पाणी तुंबले आहे. हे पाणी वाहून जाण्यासाठी मार्गिका नसल्याने मुसळधार पावसाचे प्रमाण वाढले की हे पाणी फलाट क्रमांक पाचच्या रूळांवर येत आहे. ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक पाचचे रुंदीकरण आणि विस्तारिकरण करण्याचे काम दोन महिन्यापूर्वी मध्य रेल्वे प्रशासनाने विक्रमी वेळेत पूर्ण केले. पावसाळ्यापूर्वी घाईघाईत ही कामे पूर्ण करण्यात आली. ही कामे करताना विस्तारित फलाटावर कायमस्वरुपी निवारा न उभारण्यात आल्याने पावसाचे पाणी थेट फलाटावर पडून प्रवासी भिजत होते. फलाटावर पाण्याची तळी साचत होती. याविषयी ‘लोकसत्ता’ने प्रवाशांच्या तक्रारीवरून आवाज उठविताच रेल्वे प्रशासनाने निवारा नसलेल्या फलाटाच्या भागात बांबूचा आधार देऊन त्यावर हिरवी जाळी टाकून प्रवासी भिजू नयेत म्हणून आडोसा उभा केला आहे. फलाट क्रमांक पाच लगत पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी गटार नाही. अनेक कामे याठिकाणी रेल्वे प्रशासनाला करायची आहेत. त्यामुळे या भागातील गटारे, या भागात लोखंडी रोधक टाकणे ही कामे शिल्लक आहेत. या शिल्लक कामांचा फटका आता मुसळधार पावसाच्या माध्यमातून प्रवाशांना बसण्यास सुरूवात झाली आहे.

Previous Post

लोकल पकडण्यासाठी डोंबिवली रेल्वे स्थानकातील प्रवाशांचा धोकादायक प्रवास

Next Post

३०० घड्याळांची चोरी, अखेर ‘काळू’ पकडला गेला; सीसीटीव्ही फुटेजमधून खुलासा झाला

Next Post
३०० घड्याळांची चोरी, अखेर ‘काळू’ पकडला गेला; सीसीटीव्ही फुटेजमधून खुलासा झाला

३०० घड्याळांची चोरी, अखेर 'काळू' पकडला गेला; सीसीटीव्ही फुटेजमधून खुलासा झाला

BreakingNews

माहिती अधिकाराचा गैरवापर करत गौरव स्वीट्सला लुटण्याचा प्रयत्न; पोलिसांकडून दोघांना बेड्या

बुलाती है मगर जाने का नहीं… ‘टिंडर’चा भयानक कांड

वरळीत गॅस सिलिंडरचा काळाबाजार उघड! विशेष मोहिमेअंतर्गत १७२ एलपीजी सिलिंडर जप्त

दिसायला पिवळं, चवीला गोड! वसई-विरारच्या बाजारपेठेत नवीन फळाची एन्ट्री

मराठी नाही तर मान्यता नाही! शिक्षणमंत्र्यांचा शाळांना कठोर कारवाईचा इशारा

गॅस सिलिंडरची लूट थांबणार! तक्रारीसाठी ठाणे प्रशासनाकडून हेल्पलाईन नंबर जारी

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.