Lokrakshanay
Thursday, October 1, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

‘कफ सिरप’मुळे लहान बालकांचा मृत्यू, ‘या’ कंपनीच्या औषधांवर बंदी

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
October 6, 2025
in ताज्या बातम्या, पुणे
‘कफ सिरप’मुळे लहान बालकांचा मृत्यू, ‘या’ कंपनीच्या औषधांवर बंदी
Share on FacebookShare on Whatsapp

पुणे : जयपूरमधील केसन फार्मा कंपनीच्या खोकल्याच्या औषधांमुळे (कफ सिरप) मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये बालकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर केसन कंपनीच्या खोकल्याच्या औषधांचा वापर तत्काळ बंद करण्याचे निर्देश अन्न व औषध प्रशासनाने दिले आहेत. तसेच, औषध विक्रेते आणि वितरकांकडून या कंपनीच्या औषधांच्या साठ्याबाबत माहिती घेण्यात येत आहे. अन्न व औषध प्रशासनाचे पुणे विभागाचे सहआयुक्त गिरीश हुकरे यांनी याबाबत आदेश दिले आहेत. त्यांनी पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील औषध विक्रेते संघटनांना पत्र लिहिले आहे. त्यात म्हटले आहे की, औषधे व सौंदर्यप्रसाधने कायदा १९४० व त्याअंतर्गत नियम १९४५ नुसार हे पत्र पाठविण्यात येत आहे. जयपूरमधील केसन फार्मा कंपनीच्या कोल्डरीप, नेक्स्ट्रो-डीएस सिरप या खोकल्याच्या औषधांमुळे राजस्थान आणि मध्य प्रदेशात बालकांचा मृत्यू झाल्याची बातमी आहे. यामुळे या कंपनीच्या औषधांचा साठा असल्यास त्याचा वापर तत्काळ बंद करावा. या साठ्याबाबतची माहिती अन्न व औषध प्रशासनाला कळवावी.

लहान मुलांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेसाठी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी खोकल्यावरील औषधे आणि सर्दीवरील औषधांच्या वापराबाबत नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. त्यानुसार बालरोग तज्ज्ञ आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना लहान मुलांना ही औषधे देताना विशेष काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मंत्रालयाने म्हटले आहे की, दोन वर्षांखालील मुलांना कफ आणि सर्दीवरील कोणतीही औषधे देऊ नयेत. तसेच, पाच वर्षांखालील मुलांसाठी ही औषधे सामान्यतः शिफारस केलेली नाहीत. कारण, लहान मुलांमधील तीव्र कफ आणि सर्दीचे बहुतांश आजार स्वतःहून बरे होतात आणि त्यासाठी औषधांची गरज पडत नाही.

Previous Post

०७ ऑक्टोबरला ठाण्यात ‘अभिजात मराठी भाषा गौरव सोहळ्याचे’ आयोजन

Next Post

मुख्याध्यापिकेकडून भर शाळेत अपमान; विद्यार्थिनीने उचलले टोकाचे पाऊल

Next Post
मुख्याध्यापिकेकडून भर शाळेत अपमान; विद्यार्थिनीने उचलले टोकाचे पाऊल

मुख्याध्यापिकेकडून भर शाळेत अपमान; विद्यार्थिनीने उचलले टोकाचे पाऊल

BreakingNews

२६/११च्या दहशतवादी हल्ल्याच्या न्यायलढ्याची कहाणी आता चित्रपटातून; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ‘प्रहार’चा ट्रेलर प्रदर्शित

दुबईहून इस्रायलला जाणाऱ्या विमानाचे अपहरण? ‘त्या’ कोडने अख्खे जग हादरले!

१ ऑक्टोबरला ठाणे जिल्ह्यात ‘एक दिवस, एक तास, एक साथ’ स्वच्छता अभियान; श्रमदानातून स्वच्छ, सुंदर आणि निरोगी गावांचा संकल्प

रायगडमध्ये पहिले ‘स्टार गेजिंग सेंटर’ मारळ येथे होणार; हरिहरेश्वर पर्यटन विकासाचा मास्टरप्लॅन निश्चित!

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचा सुवर्णधडाका; महिला कंपाउंड तिरंदाजी संघाने चीनला हरवत पटकावले सातवे सुवर्ण

दुष्काळावर मात करण्यासाठी रोजगार हमी योजनेतून ६,७२८ कोटींचा निधी; मंत्री भरत गोगावले यांची माहिती

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.