Lokrakshanay
Monday, March 16, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

धरण क्षेत्रातील पावसामुळे सिडकोने वसाहतींमधील २० टक्के पाणीकपात घेतली मागे

जून महिन्याच्या अखेरीस सिडको महामंडळाने हेटवणे धरण क्षेत्रातील जलसाठा कमी असल्याने २० टक्क्यांची पाणी कपात सिडको वसाहतींमध्ये अंमलात आणली.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
July 22, 2024
in ताज्या बातम्या, नवी मुंबई
धरण क्षेत्रातील पावसामुळे सिडकोने वसाहतींमधील २० टक्के पाणीकपात घेतली मागे
Share on FacebookShare on Whatsapp

पनवेल : जून महिन्याच्या अखेरीस सिडको महामंडळाने हेटवणे धरण क्षेत्रातील जलसाठा कमी असल्याने २० टक्क्यांची पाणी कपात सिडको वसाहतींमध्ये अंमलात आणली. यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी रहिवाशांना विकतचा बाटला खरेदी करावा लागला. परंतू सोमवारी हेटवणे धरण क्षेत्रात मागील चार दिवसात बरसलेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील जलसाठा ७० टक्यांवर पोहचला आहे. त्यामुळे लवकरच सिडको वसाहतींमधील पाणी कपात रद्द करण्याचे संकेत सिडको मंडळातील उच्चपदस्थांकडून मिळत आहे. जून ते जुलै महिन्यात घराबाहेर धो धो पाऊस आणि घरातील नळांना काही मिनिटेच पाणी पुरवठा होत असल्याने खारघर, उलवे आणि द्रोणागिरी या वसाहतींमधील नागरिकांना पाण्याविना जगावे कसा असा प्रश्न पडला होता.

मागील अनेक वर्षात जुलै महिन्यात पाण्याचे दुर्भिक्ष पहिल्यांदा सिडकोवासियांनी अनुभवले. हेटवणे धरण पेण परिसरात आहे. मागील चार दिवसात पेण तालुक्यात ५०० मीलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. हेटवणे धरणाची क्षेत्राची क्षमता १४४ दशलक्ष घनमीटर एवढी असून चार दिवसांपूर्वी ४९ टक्के जलसाठा उपलब्ध होता. सोमवारी सकाळी हेटवणे धरणात ७० टक्के पाणी साठा असल्याची नोंद धरण व्यवस्थापनाकडे नोंदविली गेल्याने सिडकोवासियांची पाणी कपात लवकरच रद्द होईल, अशी चिन्हे आहेत. मागील महिनाभर उलवे, द्रोणागिरी आणि खारघरमधील वसाहतींना झालेल्या २० टक्के कपात आणि कमी दाबाने झालेल्या पाणी पुरवठ्यामुळे टँकरने पाणी खरेदी करावे लागले. शेकडो रहिवाशांना पिण्याच्या पाण्यासाठी किराणा मालाच्या दुकानातून पाण्याचा बाटला खरेदी करुन पाण्याची तहान भागवावी लागली. धरणात असाच पाऊस बरसल्यास ऑगस्ट महिन्यात धरण इशारा पातळी गाठण्याची शक्यता आहे.

Previous Post

बेकायदा बांधकामांचे डोंबिवली ‘एमआयडीसी’त सुळसुळाट

Next Post

३२ वर्षीय विवाहित महिलेवर दोन भावांचा अनैसर्गिक लैंगिक अत्याचार

Next Post
३२ वर्षीय विवाहित महिलेवर दोन भावांचा अनैसर्गिक लैंगिक अत्याचार

३२ वर्षीय विवाहित महिलेवर दोन भावांचा अनैसर्गिक लैंगिक अत्याचार

BreakingNews

माहिती अधिकाराचा गैरवापर करत गौरव स्वीट्सला लुटण्याचा प्रयत्न; पोलिसांकडून दोघांना बेड्या

बुलाती है मगर जाने का नहीं… ‘टिंडर’चा भयानक कांड

वरळीत गॅस सिलिंडरचा काळाबाजार उघड! विशेष मोहिमेअंतर्गत १७२ एलपीजी सिलिंडर जप्त

दिसायला पिवळं, चवीला गोड! वसई-विरारच्या बाजारपेठेत नवीन फळाची एन्ट्री

मराठी नाही तर मान्यता नाही! शिक्षणमंत्र्यांचा शाळांना कठोर कारवाईचा इशारा

गॅस सिलिंडरची लूट थांबणार! तक्रारीसाठी ठाणे प्रशासनाकडून हेल्पलाईन नंबर जारी

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.