Lokrakshanay
Saturday, May 2, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

सूरज चव्हाण यांच्याविरोधात खिचडी गैरव्यवहाराप्रकरणी ‘ईडी’कडून आरोपपत्र दाखल

सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) खिचडी गैरव्यवहाराप्रकरणी ठाकरे गटाचे सचिव व आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
March 16, 2024
in ताज्या बातम्या, मुंबई
सूरज चव्हाण यांच्याविरोधात खिचडी गैरव्यवहाराप्रकरणी ‘ईडी’कडून आरोपपत्र दाखल
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) खिचडी गैरव्यवहाराप्रकरणी ठाकरे गटाचे सचिव व आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले. ईडीने विशेष सत्र न्यायालयात हे आरोपपत्र दाखल केले. या गैरव्यवहारातील सुमारे एक कोटी ३५ लाख रुपये चव्हाण यांच्याकडे गेल्याचा आरोप असून त्याबाबत ईडी तपास करीत आहे. सूरज चव्हाण यांना सक्तवसुली संचालनालयाने १७ जानेवारी रोजी अटक केली असून सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. न्यायाधीश एमजी देशपांडे यांच्यासमोर हे आरोपपत्र सादर करण्यात आले. या प्रकरणातील गैरव्यवहार रकमेतील सुमारे एक कोटी २५ लाख रुपये चव्हाण यांच्या वैयक्तिक बँक खात्यात आणि १० लाख रुपये त्यांची भागीदारी असलेली कंपनीच्या बँक खात्यात वळविण्यात आले. या रक्कमेचा वापर चव्हाण यांनी मालमत्ता खरेदी करण्यासाठी आणि दुग्ध व्यवसायात गुंतवणूक करण्यासाठी केला, असा आरोप आहे.

मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने सप्टेंबर २०२३ मध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. खिचडी वितरणात सहा कोटी ३७ लाख रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे. मुंबईतील आग्रीपाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी सप्टेंबर महिन्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यात फसवणूक, फौजदारी, विश्वासघात, कट रचणे आदी कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनील ऊर्फ बाळा कदम, सह्याद्री रिफ्रेशमेंटचे राजीव साळुंके, सुजीत पाटकर, फोर्सवन मल्टी सर्विसेसचे भागिदार व कर्मचारी, स्नेहा कॅटरर्स, तत्कालीन सहाय्यक आयुक्त (नियोजन), इतर पालिका अधिकारी व संबंधित खासगी व्यक्तींविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. आर्थिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गोपाळ लावणे यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या आधारावर ईडी तपास करीत आहे. याप्रकरणी १८ ऑक्टोबरला सूरज चव्हाण, तसेच खिचडीचे कंत्राटदार आदी एकूण आठ जणांवर छापे टाकण्यात आले होते.

Previous Post

विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्याच्या प्रक्रियेचा भाग व्हावे – मंत्री रवींद्र चव्हाण

Next Post

वाहतूकीच्या नियमांचे पालन करण्याच्या सूचना; शालेय विद्यार्थ्यांना रस्ते सुरक्षेचे धडे

Next Post
वाहतूकीच्या नियमांचे पालन करण्याच्या सूचना; शालेय विद्यार्थ्यांना रस्ते सुरक्षेचे धडे

वाहतूकीच्या नियमांचे पालन करण्याच्या सूचना; शालेय विद्यार्थ्यांना रस्ते सुरक्षेचे धडे

BreakingNews

लाडकी बहीण’ आता पडद्यावर! एकनाथ शिंदेंच्या हस्ते ‘लाडकी बहीण’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

अमेरिकेकडून भारताला ६५७ प्राचीन वस्तू परत; तस्करी जाळ्यावर मोठा आघात

रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी आता मराठीचे धडे! १ मेपासून ‘व्यवहारिक मराठी’ पुस्तिका हाती, १५ ऑगस्टपर्यंतची डेडलाईन

७६ व्या वर्षीही फिटनेसचा जलवा; नाना पाटेकर यांचा वर्कआऊट व्हिडिओ व्हायरल

शेतकऱ्यांनो, सज्ज व्हा! आधारकार्डप्रमाणेच आता डिजिटल आयडी अनिवार्य

प्रताप सरनाईकांचा दणका! १५ रुपयांत ‘नाथजल’ न विकल्यास थेट परवाना रद्द करण्याचा इशारा

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.