Lokrakshanay
Friday, April 3, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

शालेय विद्यार्थ्यांना दुपारच्या भोजनासोबत सकाळचा नाश्ता देण्यार – केंद्र सरकारचा निर्णय

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
December 27, 2025
in ताज्या बातम्या, देश -विदेश
शालेय विद्यार्थ्यांना दुपारच्या भोजनासोबत सकाळचा नाश्ता देण्यार – केंद्र सरकारचा निर्णय
Share on FacebookShare on Whatsapp

नवी दिल्ली : शालेय विद्यार्थ्यांना संतुलित व पुरेसे पोषण मिळावे, या उद्देशाने केंद्र सरकारने दुपारच्या भोजनासोबत सकाळचा सकस नाश्ता देण्याचा निर्णय घेतला आहे. गुजरात आणि कर्नाटक या राज्यांत यशस्वीपणे राबविलेल्या या उपक्रमानंतर आता देशातील इतर राज्यांनाही ही योजना अमलात आणण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रोत्साहन दिले जात आहे. यासाठी दोन्ही राज्यांचे नियोजन व अंमलबजावणीचे मॉडेल सर्व राज्यांशी शेअर करण्यात आले असून, पीएम-पोषण योजनेच्या बैठकीत यासंदर्भातील स्वतंत्र कृतीआराखडा मांडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

सकाळचा नाश्ता देण्याची ही संकल्पना नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणातील (एनईपी) शिफारशींनंतर पुढे आली आहे. विविध अभ्यासांचा दाखला देत एनईपीमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे की, सकस नाश्ता मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांची एकाग्रता वाढते आणि काही तासांपर्यंत अवघड विषय आत्मसात करण्याची क्षमता सुधारते. देशातील अनेक विद्यार्थी सकाळी उपाशीपोटीच शाळेत येतात, ही बाब लक्षात घेऊन ही शिफारस करण्यात आली होती. त्यानंतर गुजरात व कर्नाटक या राज्यांनी सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) मॉडेलवर सामाजिक संस्थांच्या सहकार्याने हा उपक्रम सुरू केला आहे. गुजरातमध्ये ‘सीएम-पौष्टिक अल्पाहार योजना’अंतर्गत विद्यार्थ्यांना दररोज सुमारे २०० किलो कॅलरी ऊर्जा व ६ ग्रॅम प्रथिने मिळतील, असा नाश्ता दिला जातो. यात दूध व बाजरीसारख्या भरड धान्यांपासून तयार केलेल्या पदार्थांचा समावेश आहे. कर्नाटकमध्ये विद्यार्थ्यांना रागी हेल्थ मिक्स व दूध देण्यात येते, तसेच आठवड्यातून चार ते पाच दिवस अंडी व केळीही दिली जातात. मंत्रालयाशी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, या दोन्ही राज्यांतील नाश्त्याच्या पद्धतींचा अभ्यास करण्यात आला असून, इतर राज्येही हा उपक्रम सहज राबवू शकतील. सध्या देशात सुमारे २५ कोटी शालेय विद्यार्थी असून, सकाळच्या नाश्त्याच्या योजनेमुळे त्यांच्या आरोग्याबरोबरच शैक्षणिक गुणवत्तेतही सकारात्मक बदल अपेक्षित आहे.

 

Previous Post

विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! जानेवारी महिन्यात शाळांना १० दिवस सुट्ट्या

Next Post

अगरबत्ती निर्मितीत घातक रसायनांच्या वापरावर बंदी! – केंद्र सरकारचे मोठे पाऊल

Next Post
अगरबत्ती निर्मितीत घातक रसायनांच्या वापरावर बंदी! – केंद्र सरकारचे मोठे पाऊल

अगरबत्ती निर्मितीत घातक रसायनांच्या वापरावर बंदी! – केंद्र सरकारचे मोठे पाऊल

BreakingNews

पाळीच्या दिवसातही विद्यार्थिनींना मिळणार हक्काचा आराम; शाळांमध्ये सॅनिटरी नॅपकिनसह ‘पिंक रूम’ सज्ज

ना पाकिस्तान, ना लियारी! धुरंधरचं शूट पाकिस्तानात नाही तर चक्क बँकॉकला?

स्टंटमॅनच्या मुलानं इतिहास रचला; अजय देवगणचा थक्क करणारा प्रवास!

महिलांना महिना ₹२५०० सह २ गॅस सिलिंडर मोफत मिळणार – भाजपची मोठी घोषणा!

“तुम्ही लढा, स्वतःचे रक्षण स्वतःच करा!” – इंधन टंचाईवरून डोनाल्ड ट्रम्प यांचा मित्रदेशांना इशारा

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ऐतिहासिक निर्णय! आता गुणपत्रक आणि प्रमाणपत्र मिळणार एकत्रित; नावाचा घोळही मिटणार

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.