मुंबई : केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) रचलेल्या सापळ्यात रेल्वे सुरक्षा दलाच्या(आरपीएफ) उपनिरीक्षकाला ७० हजारांची लाच घेताना अटक केली. बबलू कुमार असे अटक करण्यात आलेल्या उपनिरीक्षकाचे नाव असून तो नवी मंबईतील उरण येथे कार्यरत होता.
तक्रारदाराचा जप्त करण्यात आलेला ट्रेलर सोडण्यासाठी आरोपी उपनिरीक्षकाने ७० हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. तक्रारदाराने जप्त केलेला ट्रेलर सोडण्यासाठी रेल्वे न्यायालयात अर्ज दाखल केला होता, त्यावर २० जुलैला सुनावणी होणार होती. आरोपीने न्यायालयाच्या आदेशानंतर ट्रेलर सोडणार नसल्याची धमकी तक्रारदाराला दिली होती. त्यावेळी तक्रारीनंतर सीबीआयने मंगळवारी रचलेल्या सापळ्यात ७० हजार रुपयांची लाच घेतल्याचा आरोपाखाली बबलू कुमार याला अटक केली. आरोपीला न्यायालयाने १९ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी आरोपीच्या कल्याण येथील घरी सीबीआयने शोध मोहिम राबवली.