Lokrakshanay
Thursday, June 18, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

बोळींज पोलिसांकडून अमली पदार्थ तस्करीचे रॅकेट उघड; १२ जणांना अटक

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
July 14, 2025
in ताज्या बातम्या, मुंबई
बोळींज पोलिसांकडून अमली पदार्थ तस्करीचे रॅकेट उघड; १२ जणांना अटक
Share on FacebookShare on Whatsapp

विरार : अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात विरारच्या बोळींज पोलिसांना यश आले आहे. एकाच गुन्ह्यात पोलिसांनी १२ अमली तस्कर आरोपींना अटक केली आहे. यात एका नायजेरियन महिलेचा ही सहभाग आहे. यात अटक करून त्यांच्याकडून ७१ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. विरारच्या बोळींज पोलीस ठाण्याच्या हद्दीत १७ मे रोजी विरारच्या म्हाडा परीसरात अमली पदार्थ विक्री करण्यासाठी आलेल्या एका आरोपीला अटक करण्यात आली होती. मात्र यात अन्य ही तस्कर सहभागी असण्याची शक्यता असल्याने बोळींज पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश कावळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण विभागाचे पोलीस निरीक्षक प्रकाश सावंत व त्यांच्या पथकाने तपास सुरू केला होता.

या गुन्ह्यात मिरारोड येथून ३, नालासोपारा ३, विरार २, ठाणे १, काशीमिरा १, नायगाव १ आणि मुंबई दिंडोशी १ असे एकूण १२ आरोपींना अटक करण्यात आली आहे. यात दोन महिलांचा समावेश असून यातील एक महिला नायजेरियन आहे तिच्यावर यापूर्वी तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या अटक आरोपींकडून ३३ लाख ७६ हजार किंमतीचे १७० ग्रॅम वजनाचा एमडी, १५ लाख ५२ हजार रोख रक्कम, एक चारचाकी व २६ मोबाईल असा एकूण ७१ लाख ८८ हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. सध्या अबेको व्होक्टरी ही नायजेरियन आरोपी महिला बोळींज पोलिसांच्या ताब्यात आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. १७ मे पासून या प्रकरणाचा तपास सुरू केला होता. यात खरेदी विक्री करणाऱ्यांची मोठी साखळी असल्याचे दिसून आले आहे आतापर्यंत १२ आरोपींना आम्ही ताब्यात घेतले असल्याचे तपासअधिकारी पोलीस निरीक्षक प्रकाश सावंत यांनी सांगितले आहे. याशिवाय पुढील तपास सुरुच आहे असेही त्यांनी सांगितले.

Previous Post

विठुरायाच्या दर्शनासाठी सोडल्या तब्बल ५ हजार बसेस; एसटी महामंडळाचा ‘इतक्या’ कोटींचा फायदा

Next Post

१० पट पैसे देण्याच्या आमिषाने महिलेची फसवणूक, खेळण्याचे पैसे देऊन आरोपी फरार

Next Post
१० पट पैसे देण्याच्या आमिषाने महिलेची फसवणूक, खेळण्याचे पैसे देऊन आरोपी फरार

१० पट पैसे देण्याच्या आमिषाने महिलेची फसवणूक, खेळण्याचे पैसे देऊन आरोपी फरार

BreakingNews

चाहत्यांची प्रतीक्षा संपली! तब्बल ६ वर्षांनंतर दया, अभिजीत आणि एसीपी प्रद्युम्न पुन्हा एकत्र

साईभक्तांच्या श्रद्धेचा महापूर; शिर्डी साई संस्थानला वर्षभरात ६६० कोटींचे योगदान!

जी-७ परिषदेत मोदी-ट्रम्प भेट; भारताच्या सुरक्षेसाठी अमेरिकेच्या पाठिंब्याची ग्वाही!

साकीनाक्यात एफडीएची धडक कारवाई; २,५१० लिटर संशयित चिली व सोया सॉस जप्त!

व्हॉट्सअ‍ॅप वेबवर लवकरच येणार ग्रुप कॉलिंग फीचर; ३२ जणांना एकत्र जोडता येणार!

खाद्यपदार्थांच्या प्लास्टिक वेष्टनांवर बंदीची मागणी; महापालिकेची जबाबदारी राज्य सरकारकडे!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.