वृत्तसंस्था : सध्या सर्वत्र बिग बॉसची (Bigg Boss) चर्चा पाहायला मिळत आहे. बिग बॉस हा प्रेक्षकांचा आवडता शो आहे. अशात मनोरंजन क्षेत्रातून एक मोठी बातमी समोर आली आहे. ‘बिग बॉस कन्नड’ बंद करण्यात आले आहे. ‘बिग बॉस कन्नड’ या शोचे शूटिंग ज्या स्टुडिओमध्ये सुरू आहे, तो स्टुडिओ बंद करण्यात आला आहे. याचे आदेश कर्नाटक राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने (केएसपीसीबी) दिले आहेत.
सध्या ‘बिग बॉस कन्नड १२’ सुरू आहे.’बिग बॉस कन्नड १२’ चा स्टुडिओ बंगळुरू दक्षिणमध्ये बिदाडी याठिकाणी आहे. पर्यावरणा संदर्भात नियमांचे उल्लंघन होत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. ‘बिग बॉस कन्नड १२’ चा स्टुडिओ बंद करण्याचा आदेश ६ ऑक्टोबर रोजी देण्यात आला. KSPCB जारी केलेल्या अधिकृत आदेशानुसार, वेल्स स्टुडिओज अँड एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड येथे सुरू असलेले प्रोजेक्ट तात्काळ बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहे. तसेच परिसराला सील करायला सांगितले आहे. ‘बिग बॉस कन्नड १२’ चे होस्टिंग किच्चा सुदीप करत होते. या परिसरातील वीजपुरवठा खंडित करण्याची सूचना देखील बंगळुरू इलेक्ट्रिसिटी कंपनीला देण्यात आली आहे. त्यामुळे ‘बिग बॉस कन्नड’ सहभागी झालेल्या सर्व सदस्यांना बाहेर काढण्यात आले आहे. कर्नाटक राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने सोमवारी एक नोटिस प्रसिद्ध करत वेल्स स्टुडियोज अँड एंटरटेन्मेंट प्रायव्हेट लिमिटेडला या ठिकाणचं सर्व कामकाज थांबवण्याची सूचना दिली आहे.