Lokrakshanay
Monday, July 27, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

लाडक्या बहिणींना मोठा दिलासा; मे महिन्याचा हप्ता १२ ते १५ जूनदरम्यान खात्यात जमा होणार!

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
June 11, 2026
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
लाडक्या बहिणींना मोठा दिलासा; मे महिन्याचा हप्ता १२ ते १५ जूनदरम्यान खात्यात जमा होणार!
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : राज्यातील ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. मे महिन्याच्या हप्त्याच्या प्रतीक्षेत असलेल्या पात्र महिलांच्या बँक खात्यात १२ ते १५ जूनदरम्यान १,५०० रुपयांचा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे. यासंदर्भातील माहिती भाजपच्या शेवगाव-पाथर्डी मतदारसंघाच्या आमदार मोनिका राजळे यांनी समाजमाध्यमांवरील पोस्टद्वारे दिली आहे. राज्यभरातील लाखो महिलांचे लक्ष मे महिन्याचा हप्ता कधी जमा होणार याकडे लागले असताना ही माहिती समोर आल्याने लाभार्थींमध्ये उत्सुकता वाढली आहे. सामाजिक न्याय विभागाने महिला व बालविकास विभागाला मे महिन्याचा हप्ता वितरित करण्यासाठी ३४४ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून यासंदर्भातील शासन निर्णय १० जून रोजी जारी करण्यात आला आहे. त्यामुळे निधी उपलब्ध झाल्यानंतर हप्त्याचे वितरण लवकरच सुरू होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.

मोनिका राजळे यांनी केलेल्या पोस्टनुसार, पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात १२ ते १५ जून या कालावधीत हप्त्याची रक्कम जमा केली जाऊ शकते. मागील काही दिवसांपासून हप्ता जमा होण्यास झालेल्या विलंबामुळे अनेक महिलांनी चिंता व्यक्त केली होती. मात्र आता निधी मंजूर झाल्याने आणि संभाव्य तारखा जाहीर झाल्याने महिलांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, शासनाने निश्चित केलेल्या निकषांनुसार पात्र ठरलेल्या महिलांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. अपात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात मे महिन्याचा हप्ता जमा होणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे लाभार्थी महिलांनी आपल्या बँक खात्याची माहिती अद्ययावत ठेवण्यासह शासनाकडून येणाऱ्या पुढील अधिकृत सूचनांकडे लक्ष ठेवावे, असे आवाहन करण्यात येत आहे. आता राज्यातील लाखो महिलांचे लक्ष हप्त्याची रक्कम प्रत्यक्ष खात्यात जमा होण्याकडे लागले असून, पुढील काही दिवसांत याबाबतची प्रक्रिया पूर्ण होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Previous Post

पुण्यात भाडे नाकारणाऱ्या ४८४ रिक्षाचालकांना आरटीओचा दणका; ९ जण निलंबित!

Next Post

पेट्रोल-डिझेल खरेदीवर केंद्र सरकारचे नवे निर्बंध; ९० दिवसांसाठी नियम कडक!

Next Post
पेट्रोल-डिझेल खरेदीवर केंद्र सरकारचे नवे निर्बंध; ९० दिवसांसाठी नियम कडक!

पेट्रोल-डिझेल खरेदीवर केंद्र सरकारचे नवे निर्बंध; ९० दिवसांसाठी नियम कडक!

BreakingNews

‘एसआयआर’च्या कामाचा अकरावीच्या शिक्षणावर परिणाम; संस्थाचालकांमध्ये चिंतेचे वातावरण

वारीच्या इतिहासात पहिल्यांदाच एअर ॲम्ब्युलन्स; गंभीर भाविकाला सोलापूरला विमानाने हलवले

थलपथी विजयच्या ‘जन नायकन’ची दमदार सुरुवात; पहिल्याच दिवशी ७८.२७ कोटींची जागतिक कमाई

धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा द्या, नाहीतर आंदोलन सुरूच राहणार! वांगचुक यांच्या उपोषणानंतर अभिजीत दिपकेंचा इशारा

आता बाहेरून औषधं घेता येणार; खासगी रुग्णालयांची मेडिकल सक्ती संपणार!

ठाणे-पालघरमधील माजी सैनिक व गुणवंत पाल्यांसाठी ‘विशेष गौरव पुरस्कार’; १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.