ठाणे : मुसळधार पावसानं मुंबईसह ठाण्यात पावसानं धुमाकूळ घातला. त्याचा परिणाम रेल्वे, रस्ते वाहतुकीवर झाला. रात्रभर झालेल्या पावसामुळे सोमवारी सकाळी लोकल वाहतूक विस्कळीत झाली. त्याचवेळी भाईंदर रेल्वे स्थानकात एक धक्कादायक घटना घडली. बापलेकानं लोकलसमोर झोकून देत आयुष्य संपवलं. वडील ६० वर्षांचे होते, तर मुलगा ३० वर्षांचा होता. या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. बापलेकांच्या आत्महत्येचा तपास पोलीस करत आहेत. ‘आम्हाला वडिलांच्या खिशात सुसाईड नोट सापडली आहे. आम्ही आमच्या कृतीसाठी कोणालाही जबाबदार धरत नाही. आम्ही स्वेच्छेनं हे पाऊल उचलत आहोत,’ असा मजकूर चिठ्ठीत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. सोमवारी सकाळी नऊच्या सुमारास बापलेकांनी आत्महत्या केली. ही घटना भाईंदर रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक सहावर असलेल्या सीसीटीव्हीत रेकॉर्ड केली. यामध्ये फलाटावर चालणारे बापलेक दिसत आहेत. काही वेळात ते फलाटावरुन खाली उतरतात आणि मग रुळांच्या दिशेनं चालू लागतात. यानंतर पुढच्या काही क्षणांमध्ये ते चर्चगेटच्या दिशेनं जात असलेल्या लोकलखाली स्वत:ला झोकून देतात. लोको पायलट लोकलचा वेग कमी करण्याचा प्रयत्न करतो.
पण त्याला दोघांचा जीव वाचवण्यात यश येत नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हरीश मेहता (६०) आणि जय मेहता (३०) अशी बापलेकांची नावं आहेत. ते दोघे वसईचे राहणार होते. आर्थिक अडचणींमुळे दोघांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. हरीश पूर्वी शेअर मार्केटचं काम करायचे. तर जय एका शीतपेयाच्या कंपनीत सेल्समन म्हणून कार्यरत होता. हरीश यांच्या पत्नीचं निधन झालेलं आहे. तर जयचा विवाह वर्षभरापूर्वीच झाला होता. हरीश आणि जय रेल्वे रुळावर डोकं ठेवून झोपलं. त्यांच्या डोक्यावरुन लोकल गेल्यानं डोकं छिन्नविच्छन्न झालं. दोघांचे मृतदेह पंडित भीमसेह जोशी सरकारी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. त्यावेळी मृतदेहांची ओळख पटली नसल्यानं सोमवारी रात्री शवविच्छेजन करण्यात आलं. आधारे कार्डाच्या आधारे हरीश आणि जय मेहतांची ओळख पटली.