Lokrakshanay
Sunday, April 12, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home गुन्हेगारी

माहिती अधिकाराचा गैरवापर करत गौरव स्वीट्सला लुटण्याचा प्रयत्न; पोलिसांकडून दोघांना बेड्या

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
March 16, 2026
in गुन्हेगारी, ठाणे
माहिती अधिकाराचा गैरवापर करत गौरव स्वीट्सला लुटण्याचा प्रयत्न; पोलिसांकडून दोघांना बेड्या
Share on FacebookShare on Whatsapp

ठाणे : ठाण्यातील प्रसिद्ध गौरव स्विटस या मिठाई दुकानाबाहेरील जागेत लावलेल्या स्टाॅलवर महापालिकेमार्फत कारवाई करण्याची भिती दाखवून या दुकान मालकाकडून दोन लाख रुपयांची खंडणी घेणाऱ्या दोन माहिती अधिकार कार्यकर्त्यांना ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या वागळे युनिटने शुक्रवारी अटक केले आहे. न्यायालयाने दोघांना १६ मार्चपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. अक्षय करंजवकर आणि सुशांत सुर्वे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. सुशांत हा मानपाडा भागात तर, अक्षय हा कोलबाड भागात राहतो. विरल भानजी पटेल (५८) यांच्या तक्रारीवरून दोघांविरोधात चितळसर पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विरल पटेस हे गौरव स्विट्स ॲण्ड नमकीन या दुकानाचे मालक असून त्यांच्या दुकानाच्या ठाणे शहरात सुमारे १२ शाखा आहेत. नोव्हेंबर २०२५ मध्ये मानपाडा येथील कॉसमॉस हेरिटेज कॉम्प्लेक्समधील दुकानात असताना अक्षय करंजवकर हा त्यांच्या दुकानात आला. त्याने स्वतःला माहीती अधिकार कार्यकर्ता असल्याचे सांगितले. त्यानंतर दुकानाबाहेर स्टॉल लावल्यामुळे नागरिकांना त्रास होत असल्याचे सांगून फोटो काढण्यास सुरुवात केली. तसेच महापालिकेत तक्रार करून दुकानांवर कारवाई करवून घेण्याची धमकी दिली. त्यानंतर ‘महिन्याला काही रक्कम द्या, नाहीतर तक्रारी करून कारवाई करायला लावू’ असे सांगत खंडणीची मागणी केली. पटेल यांनी पैसे देण्यास नकार दिल्यानंतरही त्याने ठाणे महापालिकेत तक्रार अर्ज करून पाठपुरावा सुरू ठेवला. याच दरम्यान, १८ फेब्रुवारी रोजी सुशांत सुर्वे याने पटेल यांना व्हॉट्सअ कॉल करून अक्षय करंजवकरसोबत तडजोड (सेटलमेंट) करून देण्याचे सांगितले. सुरुवातीला पाच लाख रुपयांची मागणी करण्यात आली. या प्रकरणी पटेल यांनी ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या वागळे युनिटकडे तक्रार केली. यानंतर अपर पोलिस आयुक्त डॉ. पंजाबराव उगले, पोलिस उपायुक्त पराग मणेरे, सहायक पोलिस आयुक्त शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या वागळे युनिटचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक सलील भोसले, सहायक पोलिस निरिक्षक पल्लवी ढगे पाटील यांच्या पथकाने शुक्रवारी वसंत विहार परिसरात सापळा रचला. याच दरम्यान, दोघांनी तडजोडीअंती दोन लाख रुपये स्वीकारण्याचे मान्य करत ते पैसे घेण्यासाठी वसंत विहार चौकात आले. त्यावेळी पटेल यांच्याकडून दोन लाखांची खंडणी घेताना पोलिसांनी रंगेहात ताब्यात घेतले.

Previous Post

बुलाती है मगर जाने का नहीं… ‘टिंडर’चा भयानक कांड

Next Post

पेट्रोल पंपांवर केरोसीन विक्रीला हिरवा कंदील; गॅस दरवाढीच्या पार्श्वभूमीवर सरकारचा दिलासा

Next Post
पेट्रोल पंपांवर केरोसीन विक्रीला हिरवा कंदील; गॅस दरवाढीच्या पार्श्वभूमीवर सरकारचा दिलासा

पेट्रोल पंपांवर केरोसीन विक्रीला हिरवा कंदील; गॅस दरवाढीच्या पार्श्वभूमीवर सरकारचा दिलासा

BreakingNews

कॉलेजमधील ‘ती’ भेट अन् १५ वर्षांचा विरह; ईशा-अभिषेकच्या फिल्मी लव्हस्टोरीचा गोड शेवट!

जिल्ह्यातील तरुणाईला बजेटचे धडे! ‘माय भारत’ उपक्रमांतर्गत थेट पंतप्रधानांशी संवाद साधण्याची संधी

शाळेतच भरली ‘विद्यार्थी बँक’! महापालिकेच्या उपक्रमातून चिमुरडे गिरवतायत बचतीचे धडे

बोरिवलीतील बीएसएनएल, एमटीएनएलच्या आरक्षित जागेवर आता परवडणाऱ्या ८००० घरांची गृहयोजना; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निर्णय

“इराण असो वा नसो, होर्मुझची सामुद्रधुनी खुली करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा

राज्यात आता लग्नपत्रिकेवर वधू-वराची जन्मतारीख अनिवार्य!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.