Lokrakshanay
Thursday, July 2, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

कामावरून काढून टाकल्याचा राग, कंपनीच्या व्यवस्थापकावर प्राणघातक हल्ला; चौघा हल्लेखोरांपैकी एकाला अटक

कामावरुन काढून टाकल्याच्या रागातून कंपनीच्या व्यवस्थापकावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणात चौघा हल्लेखोरांपैकी एकाला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
November 6, 2023
in ताज्या बातम्या, नवी मुंबई
कामावरून काढून टाकल्याचा राग, कंपनीच्या व्यवस्थापकावर प्राणघातक हल्ला; चौघा हल्लेखोरांपैकी एकाला अटक
Share on FacebookShare on Whatsapp

नवी मुंबई : कामावरुन काढून टाकल्याच्या रागातून एका टँकर चालकाने आपल्या तीन साथीदारांच्या मदतीने ट्रान्सपोर्ट कंपनीच्या व्यवस्थापकावर लोखंडी रॉड आणि चाकुच्या सहाय्याने प्राणघातक हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना तुर्भे एमआयडीसीतील एचपीसीएल कंपनीच्या बाहेर रात्री घडली आहे. तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी या घटनेतील चार हल्लेखोरांविरोधात प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. त्यापैकी रोहित यादव याला अटक केली आहे. पोलिसांनी आता या घटनेतील फरार असलेल्या इतर तीन हल्लेखोरांचा शोध सुरु केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेत गंभीर जखमी झालेला उदयराज सिंग (४२) हा चेंबुर येथे राहण्यास आहे. तो स्वास्तिक लॉजिस्टीक ट्रान्सपोर्ट या कंपनीत व्यवस्थापक म्हणून कामाला आहे. स्वास्तिक लॉजिस्टीक ट्रान्सपोर्ट कंपनीचे तुर्भे एमआयडीसीतील एचपीसीएल कंपनीत ८ टँकर लावण्यात आले आहेत. या टँकरवर सागर यादव हा चालक म्हणून काम करत होता. सागर यादव हा टँकरचे व्हीटीएस बंद करुन टँकर चालवत असल्यामुळे एचपीसीएल कंपनीने त्याला काळ्या यादीत टाकले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेत गंभीर जखमी झालेला उदयराज सिंग (४२) हा चेंबुर येथे राहण्यास आहे. तो स्वास्तिक लॉजिस्टीक ट्रान्सपोर्ट या कंपनीत व्यवस्थापक म्हणून कामाला आहे. स्वास्तिक लॉजिस्टीक ट्रान्सपोर्ट कंपनीचे तुर्भे एमआयडीसीतील एचपीसीएल कंपनीत ८ टँकर लावण्यात आले आहेत. या टँकरवर सागर यादव हा चालक म्हणून काम करत होता. सागर यादव हा टँकरचे व्हीटीएस बंद करुन टँकर चालवत असल्यामुळे एचपीसीएल कंपनीने त्याला काळ्या यादीत टाकले होते. त्यावेळी सागर यादव व त्याच्या तीन साथीदारांनी उदयराज याला शिवीगाळ केली. त्यानंतर सागर यादव, प्रदीप यादव आणि रोहित यादव या तिघांनी उदयराज यांच्यावर लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला केला. यावेळी भोलू यादव याने उदयराज याच्या दंडावर चाकुने वार केले. यावेळी त्याठिकाणी आलेल्या कुणाल यादव याने चौघा हल्लेखोरांच्या तावडीतून उदयराज याची सुटका केली. यानंतर चौघा हल्लेखोरांनी त्या दोघांना शिवीगाळ करुन त्यांना बघून घेण्याची धमकी देऊन तेथून पलायन केले. या हल्ल्यात उदयराज हा गंभीर जखमी झाल्याने त्याला वाशीतील महापालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी चौघा हल्लेखोरांविरोधात प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करुन रोहित यादव याला अटक केली आहे. तसेच पळून गेलेल्या इतर तिघांचा शोध सुरु केला आहे.

Previous Post

मुंबईत अखेर नववी मेट्रो गाडी दाखल

Next Post

सात दहशतवाद्यांविरुद्ध न्यायालयात एनआयएकडून आरोपपत्र दाखल

Next Post
सात दहशतवाद्यांविरुद्ध न्यायालयात एनआयएकडून आरोपपत्र दाखल

सात दहशतवाद्यांविरुद्ध न्यायालयात एनआयएकडून आरोपपत्र दाखल

BreakingNews

कोपरी-पाचपाखाडीत मतदार पुनरिक्षण मोहिमेला वेग; जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ‘Enumeration Form’चे वाटप

मुंबईत नवा सागरी मार्ग उभारणार; वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी १.८७ किमीचा प्रकल्प!

ठाण्यात FDAची मोठी कारवाई; गुजरातमधून आणला जाणारा २ ते ३ टन संशयित भेसळयुक्त मावा जप्त!

विसर्जित पीओपी गणेशमूर्तींपासून ७६० अभ्यास टेबल; नवी मुंबई महापालिकेचा पर्यावरणपूरक उपक्रम!

ज्येष्ठ रंगदिग्दर्शिका विजया मेहता यांचे निधन; मराठी रंगभूमीतील सुवर्णपर्वाचा अस्त!

१८ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी नियोजन करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.