Lokrakshanay
Monday, August 17, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

दहावी, बारावीच्या परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही नसल्यास होणार सर्व शिक्षक-कर्मचाऱ्यांची अदलाबदल! – शिक्षण राज्य मंडळाचा निर्णय

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
February 3, 2026
in ताज्या बातम्या, पुणे
दहावी, बारावीच्या परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही नसल्यास होणार सर्व शिक्षक-कर्मचाऱ्यांची अदलाबदल! – शिक्षण राज्य मंडळाचा निर्णय
Share on FacebookShare on Whatsapp

पुणे : फेब्रुवारी-मार्चमध्ये घेतल्या जाणाऱ्या दहावी, बारावीच्या ज्या परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही यंत्रणा उपलब्ध नसेल, तेथील सर्व शिक्षक-कर्मचाऱ्यांची अदलाबदल होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (राज्य मंडळ) हा निर्णय घेतला आहे. राज्य मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी याबाबत विभागीय मंडळांना आदेश दिले आहेत. दहावी, बारावीच्या परीक्षेवेळी कॉपीमुक्त अभियान राबवण्याबाबत शालेय शिक्षणमंत्री यांच्या उपस्थितीत बैठक झाली होती. बैठकीत दिलेल्या सूचनांनुसार, परीक्षेसाठी निश्चित केलेल्या सर्व परीक्षा केंद्रांवर परीक्षा पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी ज्या माध्यमिक विद्यालय, उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी ज्या परीक्षा केंद्रांवर परीक्षा देणार आहेत, त्या परीक्षा केंद्रांसाठी केंद्र संचालक, पर्यवेक्षक, परीक्षेशी संबंधित व्यक्तींची नियुक्ती त्या केंद्राव्यतिरिक्त अन्य माध्यमिक विद्यालय, उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक, कर्मचाऱ्यांतून करण्याच्या सूचना राज्य मंडळाने विभागीय मंडळांना पत्राद्वारे दिल्या होत्या. मात्र, सरसकट सर्व कर्मचारी बदलण्यास विरोध करण्यात आला होता.

या पार्श्वभूमीवर, दहावी-बारावीच्या परीक्षांबाबत राज्य मंडळ, शिक्षक, मुख्याध्यापक संघटना यांच्या सहविचार सभेत परीक्षा केंद्रावरील कर्मचाऱ्यांच्या अदलाबदलीबाबत चर्चा करण्यात आली. कर्मचाऱ्यांची अदलाबदल केल्यास शाळा, कनिष्ठ महाविद्यालयातील पाचवी ते नववी या वर्गांचे कामकाज करणे कठीण होईल, प्रत्येक पेपरसाठी अन्य परीक्षा केंद्रावर जाणे सुरक्षिततेच्या दृष्टीने अडचणीचे होईल, त्यावर होणारा खर्च आणि इतर बाबी विचारात घेऊन सरसकट सर्व परीक्षा केंद्रांवरील कर्मचाऱ्यांची अदलाबदली न करता सीसीटीव्ही कॅमेरे उपलब्ध होणार नाहीत, त्या केंद्रांवरील सर्व कर्मचाऱ्यांची अदलाबदल करण्याचा प्रस्ताव राज्य मंडळाने शालेय शिक्षण विभागाला दिला होता. या प्रस्तावाला शिक्षण विभागाकडून मान्यता देण्यात आली आहे.

Previous Post

मुंबईकरांनो सावधान! आता सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास, कचरा टाकल्यास थेट ₹२५,००० पर्यंत दंड

Next Post

मल्याळम चित्रपटसृष्टीत पसरली शोककळा! प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक एसपी वेंकटेश यांच निधन

Next Post
मल्याळम चित्रपटसृष्टीत पसरली शोककळा! प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक एसपी वेंकटेश यांच निधन

मल्याळम चित्रपटसृष्टीत पसरली शोककळा! प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक एसपी वेंकटेश यांच निधन

BreakingNews

सातारा जिल्‍ह्यात येणार नवे ९७ उद्योग

महसुली प्रकरणांच्या तडजोडीसाठी १ सप्टेंबरपासून ‘महात्मा फुले महसूल लोक अदालत’ अभियान

स्वयंपाकाच्या गॅसबाबत केंद्र सरकारचा नवा नियम; ग्राहकांना मोठा दिलासा! गॅस कंपन्यांना दणका

पुण्यात ‘बर्गर किंग’सह १६ आस्थापनांना FDAचा दणका; किचनमधील अस्वच्छतेमुळे कारवाई

ठाण्यातील शतकमहोत्सवी ‘ऑफिसर्स क्लब’ला आधुनिकतेची झळाळी; स्वातंत्र्यदिनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन!

रेल्वे प्रवाशांच्या जीवाशी खेळ! CSMT सह कल्याण, लोणावळा स्थानकांवरील पिण्याच्या पाण्यात ‘ई-कोलाय’ बॅक्टेरिया

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.