Lokrakshanay
Thursday, October 16, 2025
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

भारतात लवकरच सुरू होणार ‘हवाई टॅक्सी’, १ तासाचा प्रवास १० मिनिटांत

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
September 25, 2025
in ताज्या बातम्या, देश -विदेश, नवी दिल्ली
भारतात लवकरच सुरू होणार ‘हवाई टॅक्सी’, १ तासाचा प्रवास १० मिनिटांत
Share on FacebookShare on Whatsapp

नवी दिल्ली : देशाच्या प्रमुख शहरांमधील वाढत्या ट्रॅफिक जाममुळं त्रस्त प्रवाशांना लवकरच दिलासा मिळण्याची शक्यता आहे. चित्रपटांमध्ये दिसणारी हवाई टॅक्सी आता वास्तवात उतरणार आहे. पुढील दोन ते तीन वर्षांत मुंबई, बेंगलुरूंसह अनेक महानगरांमध्ये ही सेवा सुरू होऊ शकते. सरकारच्या सहकार्यानं कंपन्या आणि स्टार्टअप्स यावर कार्यरत आहेत. मुंबईतील ‘चलो’ मोबिलिटी प्रा. लि. कंपनी हवाई टॅक्सी प्रकल्पावर सखोल काम करत आहे. कंपनीच्या डायरेक्टर प्रिया सिंह यांनी ईटीव्ही भारताशी बोलताना सांगितलं की, विदेशी तंत्रज्ञान आणि भारतीय गरजांना एकत्र करून हवाई टॅक्सीला प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यांचं मत आहे की, ही सेवा प्रवाशांना केवळ वेगवान प्रवास देईलच, तर मोठ्या शहरांमधील जामला एक उत्तम पर्यायही ठरेल. प्रिया सिंह यांनी सांगितलं की, हवाई टॅक्सी ही छोट्या विमान किंवा हेलिकॉप्टरसारखी असेल, ज्यात २ ते ६ प्रवासी बसू शकतील. ही हेलिकॉप्टरपेक्षा लहान आणि ड्रोनसारखी चालेल. ती कुठेही सहज उतरू शकेल आणि उडू शकेल, त्यासाठी हेलिपॅड किंवा धावपट्टीची गरज नाही. ही टॅक्सी वेळेनुसार नसून मागणीनुसार उड्डाण भरेल. कार किंवा इतर वाहनानं एक तास लागणारा प्रवास हवाई टॅक्सीत फक्त १० मिनिटांत पूर्ण होईल. सुरुवातीला पायलट उड्डाण करेल, पण भविष्यात ती पायलटशिवाय चालेल. ध्येय आहे की, ही पूर्णपणे इलेक्ट्रिक असेल. यामुळं वेळ वाचेलच, पण प्रदूषण कमी होण्यासही मदत होईल.

प्रिया सिंह यांनी सांगितलं की, हवाई टॅक्सी ही छोट्या विमान किंवा हेलिकॉप्टरसारखी असेल, ज्यात २ ते ६ प्रवासी बसू शकतील. ही हेलिकॉप्टरपेक्षा लहान आणि ड्रोनसारखी चालेल. ती कुठेही सहज उतरू शकेल आणि उडू शकेल, त्यासाठी हेलिपॅड किंवा धावपट्टीची गरज नाही. ही टॅक्सी वेळेनुसार नसून मागणीनुसार उड्डाण भरेल. कार किंवा इतर वाहनानं एक तास लागणारा प्रवास हवाई टॅक्सीत फक्त १० मिनिटांत पूर्ण होईल. सुरुवातीला पायलट उड्डाण करेल, पण भविष्यात ती पायलटशिवाय चालेल. ध्येय आहे की, ही पूर्णपणे इलेक्ट्रिक असेल. यामुळं वेळ वाचेलच, पण प्रदूषण कमी होण्यासही मदत होईल. जगातील अनेक देश भारतापेक्षा आधी ही तंत्रज्ञान स्वीकारत आहेत. पण भारतही मागं नाही. सरकारच्या सहकार्यानं हे काम सुरू आहे. दुबई आणि अबू धाबीमध्ये २०२६ पर्यंत हवाई टॅक्सी सेवा सुरू करण्याची तयारी आहे. सौदी अरेबियात चाचण्या सुरू आहेत. ब्राझील, चीन, दक्षिण कोरिया आणि सिंगापूरमध्येही ही सेवा सुरू करण्याच्या तयारी आहेत. लॉस एंजेलिस २०२८ ऑलिंपिकमध्ये हवाई टॅक्सी सेवा सुरू करणार आहे. भारतही २०२८ पर्यंत ही सेवा सुरू करू शकतो. हवाई टॅक्सी आता भविष्याची कल्पना नसून लवकरच वास्तव ठरेल. देशात दिल्ली-एनसीआर, मुंबई, बेंगलुरू आणि इतर निवडक शहरांमध्ये ही सेवा पुढील काही वर्षांत उपलब्ध होईल. यामुळं प्रवाशांना ट्रॅफिक जामपासून सुटका मिळेल. प्रवास आकाशातून वेगवान, सोपा आणि पर्यावरणस्नेही होईल.

Previous Post

महाराष्ट्रातील प्रथम ‘क्रिप्टोकरंसी अन्वेषण कक्षा’ची स्थापना ठाण्यात

Next Post

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा.पाटील यांचे नाव मिळण्यासाठी ठाणेकरांची ‘दि.बा. जागर यात्रा’

Next Post
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा.पाटील यांचे नाव मिळण्यासाठी ठाणेकरांची ‘दि.बा. जागर यात्रा’

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा.पाटील यांचे नाव मिळण्यासाठी ठाणेकरांची ‘दि.बा. जागर यात्रा’

BreakingNews

‘महाभारत’मध्ये कर्णाची भूमिका साकारणारे अभिनेते पंकज धीर यांचे निधन

सिग्नलवर गजरे, वस्तू विकणाऱ्या मुलांसाठी ठाण्यात पहिली सिग्नल शाळा!

शेतकऱ्यांनी आंबा, काजू व केळी या फळपिकांचा विमा उतरवावा – विभागीय कृषी सहसंचालक शिवाजी आमले

पुणेकरांची दिवाळी धूमधडाक्यात! २४ तास खुली राहणार फटाक्यांची दुकानं

चित्रपटसृष्टीत शोककळा; प्रसिद्ध कॉमेडी अभिनेता राजू तालिकोटे यांचे निधन

फुकट्या रेल्वेप्रवाशांच्या संख्येत वाढ, कारवाईसाठी भरारी पथके स्थापन

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.