Lokrakshanay
Thursday, June 18, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home मनोरंजन

लाडकी बहीण योजनेनंतर आता निर्मिती सावंत यांची ‘लाडकी विहीण योजना’!

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
February 18, 2026
in मनोरंजन
लाडकी बहीण योजनेनंतर आता निर्मिती सावंत यांची ‘लाडकी विहीण योजना’!
Share on FacebookShare on Whatsapp

वृत्तसंस्था : सध्या राज्यात सर्वत्र ‘लाडकी बहीण’ योजनेची जोरदार चर्चा सुरू आहे. या योजनेमुळे राज्यातील राजकारण देखील चर्चेत आलं आहे. लाडकी बहिण योजना सुरू असताना आता लाडकी विहीण योजना समोर आली आहे. पण या योजनेचा लाभ अभिनेत्री निर्मिती सावंत यांच्या लाडक्या प्रेक्षकांनाच मिळणार आहे. नेमकं हे प्रकरण काय आहे? निर्मिती सावंत यांनी सगळ्या डिटेल्स सांगितल्या.

‘लाडकी विहीण योजना’ या नावाचं नवं मराठी नाटक लवकरच रंगभूमीवर येत आहे. या नाटकात अभिनेत्री निर्मिती सावंत प्रमुख भूमिकेत आहेत. त्यामुळे अनेक वर्षांनी त्यांचा दमदार विनोदी अवतार रंगभूमीवर पाहायला मिळणार आहे. ‘कुमारी गंगूबाई मॅट्रिक’ या नाटकाने रंगभूमीवर तुफान लोकप्रियता मिळवली होती. त्या नाटकातील ‘गंगूबाई’मुळे निर्मिती सावंत घराघरात पोहोचल्या. त्यानंतर याच नावाने मालिका देखील खूप गाजली. त्याच नाटकाचे दिग्दर्शक राजेश देशपांडे आणि निर्माते दिलीप जाधव यांच्यासोबत निर्मिती सावंत पुन्हा एकत्र येत आहेत. ‘लाडकी विहीण योजना’ या नाटकाचं लेखन प्रथमेश शिवलकरनं केलं आहे. तर दिग्दर्शन राजेश देशपांडे यांनी केलं आहे.  या नाटकाची निर्मिती अष्टविनायक नाट्यसंस्था आणि पंचशील एंटरटेन्मेंट तर्फे केली जात आहे. निर्मितीमध्ये अभिनेता-दिग्दर्शक प्रसाद ओक यांच्यासह मंजिरी ओक, संजय मेमाणे आणि स्वप्नील जोशी यांची आहे. प्रसाद ओक निर्माता म्हणून रंगभूमीवर पदार्पण करतोय. हे नाटक विहिणींमधील नातेसंबंधांवर आधारित आहे. कोकण परिसराच्या पार्श्वभूमीवर फुलणारी कथा नाटकात पाहायला मिलणार आहे.  कौटुंबिक नात्यांमधील गमती-जमती आणि हलकाफुलका विनोद नाटकात पाहायला मिळणार आहे.

Previous Post

रायगड प्रेमींनो लक्ष द्या! ६ दिवस रोप-वे सेवा खंडीत; पायथ्यापासूनच करावी लागणार चढाई

Next Post

रोज एक ग्लास ऊसाचा रस पिल्यास शरीरात कोणते बदल होतात?

Next Post
रोज एक ग्लास ऊसाचा रस पिल्यास शरीरात कोणते बदल होतात?

रोज एक ग्लास ऊसाचा रस पिल्यास शरीरात कोणते बदल होतात?

BreakingNews

व्हॉट्सअ‍ॅप वेबवर लवकरच येणार ग्रुप कॉलिंग फीचर; ३२ जणांना एकत्र जोडता येणार!

खाद्यपदार्थांच्या प्लास्टिक वेष्टनांवर बंदीची मागणी; महापालिकेची जबाबदारी राज्य सरकारकडे!

जोगेश्वरी रेल्वे टर्मिनसचे काम अंतिम टप्प्यात; लवकरच प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज!

लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात; लाभार्थी महिलांना दिलासा!

कल्याणमध्ये अधिक मासानिमित्त अनोखा उपक्रम; ३३ कष्टकरी महिला विक्रेत्यांचा साडी व मिठाई देऊन सन्मान!

पुण्यात नाट्यगृहांच्या आरक्षणातील मक्तेदारी संपणार; ऑनलाइन बुकिंग प्रणालीला गती!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.