पुणे : एकतर्फी प्रेमातून महाविद्यालयीन तरुणीच्या चेहऱ्यावर ॲसिड फेकण्याची धमकी देणाऱ्या एकास सिंहगड रस्ता पोलिसांनी अटक केली.वैभव तुकाराम कर्णिक (वय २०) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत एका तरुणीने सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
तक्रारदार तरुणी कात्रज भागातील दत्तनगर परिसरात राहायला आहे. गेल्या काही महिन्यांपासून कर्णिक तिला त्रास देत होता. माझे तुझ्यावर प्रेम आहे. प्रेमास नकार दिल्यास चेहऱ्यावर ॲसिड फेकण्याची धमकी त्याने तिला दिली होती. तरुणी महाविद्यालयात निघाल्यानंतर तो तिचा पाठलाग करायचा. समाजमाध्यमात तरुणीचे छायाचित्र वापरुन त्याने तिची बदनामी केली. कर्णिकच्या त्रासामुळे घाबरलेल्या तरुणीने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक शिवाजी बुनगे तपास करत आहेत.