Lokrakshanay
Wednesday, September 16, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

कोकणातील जादा बसेसमुळे जिल्ह्यांतर्गत बससेवा कोलमडली; गाड्या अर्धा तास उशिराने

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
September 16, 2026
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र
कोकणातील जादा बसेसमुळे जिल्ह्यांतर्गत बससेवा कोलमडली; गाड्या अर्धा तास उशिराने
Share on FacebookShare on Whatsapp

विरार : गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) विशेष बससेवा सुरू केली आहे. मुंबई महानगर क्षेत्रातून यंदा कोकणासाठी ५ हजारांहून अधिक विशेष बसेस सोडण्यात आल्या असून, वसई, नालासोपारा आणि अर्नाळा या तीन आगारांतून एकूण ५८४ बस रवाना करण्यात आल्या आहेत. एसटीच्या समूह नोंदणी सुविधेला प्रवाशांकडून मोठा प्रतिसाद मिळत असून हजारो कोकणवासीयांना याचा लाभ झाला आहे. मात्र, या विशेष बसांसाठी शहरांतर्गत मार्गांवरील अनेक बस वळवण्यात आल्याने वसई-विरार परिसरातील नियमित बससेवेवर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे शहरांतर्गत धावणाऱ्या एसटी बसेस अर्धा ते पाऊण तास उशिराने येत असून प्रवाशांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.

वसई-विरार परिसरातील औद्योगिक भाग, भिवंडी, ग्रामीण क्षेत्र तसेच विविध शैक्षणिक संस्थांकडे जाणारे हजारो नोकरदार, विद्यार्थी आणि नागरिक दररोज एसटी बसवर अवलंबून असतात. नवघर, वसई गाव, नालासोपारा आणि अर्नाळा आगारातून सुटणाऱ्या बसांच्या फेऱ्यांमध्ये उशीर होत असल्याने सकाळच्या वेळेत बसस्थानकांवर मोठी गर्दी होत आहे. अनेकांना कार्यालयात आणि महाविद्यालयात वेळेवर पोहोचणे कठीण जात असून प्रवाशांचा प्रवास विस्कळीत झाला आहे. गणेशोत्सवाच्या सुट्ट्यांमुळे स्थानिक नागरिक गणपती दर्शनासाठी आणि नातेवाईकांकडे जाण्यासाठीही एसटीचा वापर करत आहेत. मात्र, बससेवेतील विलंबामुळे त्यांच्या नियोजनावरही परिणाम होत आहे. कोकणातील विशेष बससेवा आणि शहरांतर्गत नियमित वाहतूक यामध्ये समतोल राखण्यासाठी अतिरिक्त बस उपलब्ध करून देण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे. गणेशोत्सवाच्या काळात वाढलेल्या प्रवासी संख्येचा विचार करून शहरांतर्गत बससेवा पूर्ववत करण्यासाठी एसटी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.

Previous Post

बाप्पाच्या स्वागताला ‘मोदक महोत्सव २०२६’ सज्ज; घरबसल्या मागवा स्वादिष्ट मोदक!

BreakingNews

कोकणातील जादा बसेसमुळे जिल्ह्यांतर्गत बससेवा कोलमडली; गाड्या अर्धा तास उशिराने

बाप्पाच्या स्वागताला ‘मोदक महोत्सव २०२६’ सज्ज; घरबसल्या मागवा स्वादिष्ट मोदक!

घरबसल्या खत बुकिंगला शेतकऱ्यांचा उत्तम प्रतिसाद; २० दिवसांत २९० मेट्रिक टन खतांची विक्री!

२ हजारांपेक्षा जास्तच्या UPI पेमेंटवर १५ ऑक्टोबरपासून ०.४% शुल्क!

ठाण्यात विसर्जनानंतर गणेशमूर्तींचे फोटो काढण्यास बंदी; आदेश मोडल्यास थेट पोलिसांची कारवाई!

₹२००० च्या पुढील UPI पेमेंटवर चार्ज लागणार? केंद्र सरकारच्या ‘त्या’ पत्राने सगळंच बदललं!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.