Lokrakshanay
Monday, August 31, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

बाप्पाच्या विसर्जनसाठी ३५५ कृत्रिम तलावांचे लोकेशन ‘गुगल मॅप’वर उपलब्ध!

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
August 31, 2026
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
बाप्पाच्या विसर्जनसाठी ३५५ कृत्रिम तलावांचे लोकेशन ‘गुगल मॅप’वर उपलब्ध!
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : यंदाच्या गणेशोत्सवासाठी मुंबई महापालिकेने आगमन आणि विसर्जनाची व्यापक तयारी सुरू केली असून, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सहा फुटांपर्यंतच्या सर्व गणेशमूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावांमध्ये करणे यंदाही बंधनकारक राहणार आहे. गेल्या वर्षी कृत्रिम तलावांमध्ये विसर्जनाला गणेशभक्तांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याने यंदा त्यांची संख्या वाढवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यानुसार, यंदा मुंबईभरात ३५५ हून अधिक कृत्रिम तलाव उभारण्यात येणार आहेत. उच्च न्यायालयाने २४ जुलै २०२५ रोजी दिलेल्या आदेशानुसार सहा फुटांपर्यंतच्या प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी) तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (एमपीसीबी) मार्गदर्शक तत्त्वांनुसार पर्यावरणपूरक गणेशमूर्तींचे विसर्जनही कृत्रिम तलावांमध्येच करण्याचे बंधन कायम ठेवण्यात आले आहे. त्यामुळे यंदाही महापालिकेने त्याच आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या वर्षी मुंबईत २९८ कृत्रिम तलाव उभारण्यात आले होते. यंदा ही संख्या वाढवून ३५५ पेक्षा अधिक करण्यात येणार असून, समुद्रकिनाऱ्यांव्यतिरिक्त शहरातील २३ नैसर्गिक तलावही विसर्जनासाठी उपलब्ध असतील. गेल्या वर्षी सहा फुटांपर्यंतच्या ७२ हजार ३६१ पर्यावरणपूरक आणि १ लाख ११ हजार ६४१ पीओपी गणेशमूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावांमध्ये करण्यात आले होते. २०२४ मध्ये केवळ ४० टक्के मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावात झाले होते, तर २०२५ मध्ये हा आकडा तब्बल ९८ टक्क्यांपर्यंत पोहोचला. याशिवाय महापालिकेने १,१२७ मूर्तिकारांना ऑनलाइन ‘वन विंडो’ प्रणालीद्वारे मंडप परवानग्या दिल्या असून, ७६० टन शाडू माती आणि २५ हजार ४०० लिटर पर्यावरणपूरक रंग विनामूल्य वितरित करून पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन दिले आहे.

आगमन आणि विसर्जन मिरवणुका सुरळीत पार पडाव्यात यासाठी महापालिकेने शहरातील विविध ठिकाणी आवश्यक कामे पूर्ण केली आहेत. आगमन-विसर्जन मार्गावरील अडथळे दूर करण्यासाठी २८१ ठिकाणांवरील केबल्स हटविण्यात आल्या असून, ५०६ रस्त्यांवरील ४ हजार २७९ खड्डे आणि १७१ ड्रेनेज कव्हर्सची दुरुस्ती पूर्ण करण्यात आली आहे. तसेच ४९२ ठिकाणी वृक्षछाटणी करून मिरवणूक मार्ग मोकळे करण्यात आले आहेत. यंदा सोसायट्यांमध्ये तसेच चौपाट्यांलगतही कृत्रिम तलाव उभारले जाणार असून, काही ठिकाणी फिरते कृत्रिम तलाव वाहनांवरून उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. गणेशभक्तांची गैरसोय टाळण्यासाठी प्रभागनिहाय कृत्रिम विसर्जनस्थळांची माहिती गुगल मॅपद्वारे उपलब्ध करून दिली जाणार आहे. तसेच प्रत्येक विसर्जनस्थळासाठी उपलब्ध वेळेचे स्लॉट आणि संबंधित माहिती क्यूआर कोडच्या माध्यमातून सहज मिळू शकणार आहे. त्यामुळे भाविकांना योग्य विसर्जनस्थळ शोधणे अधिक सोपे होणार आहे. पर्यावरण संरक्षण, विसर्जन प्रक्रियेतील शिस्त आणि नागरिकांची सुविधा या तिन्ही बाबी लक्षात घेऊन महापालिकेने यंदाची संपूर्ण व्यवस्था उभारली असून, गणेशोत्सव अधिक सुरक्षित, पर्यावरणपूरक आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पडावा, यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.

Previous Post

विघ्नहर्त्याच्या मदतीला धावले मुंब्र्यातील मुस्लिम तरुण; भरपावसात ४ तास दिला २० फुटी मूर्तीला आधार

Next Post

ठाण्यात १६ वर्षीय मुलीचा बालविवाह रोखण्यात प्रशासनाला यश

Next Post
ठाण्यात १६ वर्षीय मुलीचा बालविवाह रोखण्यात प्रशासनाला यश

ठाण्यात १६ वर्षीय मुलीचा बालविवाह रोखण्यात प्रशासनाला यश

BreakingNews

ठाण्यात १६ वर्षीय मुलीचा बालविवाह रोखण्यात प्रशासनाला यश

बाप्पाच्या विसर्जनसाठी ३५५ कृत्रिम तलावांचे लोकेशन ‘गुगल मॅप’वर उपलब्ध!

विघ्नहर्त्याच्या मदतीला धावले मुंब्र्यातील मुस्लिम तरुण; भरपावसात ४ तास दिला २० फुटी मूर्तीला आधार

५ सप्टेंबरला दिल्लीत जंतरमंतरपेक्षाही मोठे आंदोलन होणार : अभिजीत दिपके

ठाण्यात रिंग मेट्रोला नागरिकांचा तीव्र विरोध; ३० ऑगस्टला स्वाक्षरी मोहीम!

ChatGPT घेऊन आले ‘शेड्यूल टास्क’ फीचर; रोजची कामे आता एका क्लिकवर ऑटोमॅटिक होणार

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.