Lokrakshanay
Wednesday, August 19, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

मॉल मधील दुकानांवरही आता मराठी पाट्या सक्तीच्या; मुंबई महापालिकेचा थेट इशारा!

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
August 19, 2026
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
मॉल मधील दुकानांवरही आता मराठी पाट्या सक्तीच्या; मुंबई महापालिकेचा थेट इशारा!
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : मुंबईतील सर्व दुकाने आणि व्यावसायिक आस्थापनांवर मराठी भाषेतील नामफलक सक्तीने लावण्याच्या मोहिमेला आता अधिक वेग मिळणार आहे. मुंबई महापालिकेने पहिल्या टप्प्यात सर्वसामान्य दुकाने, हॉटेल्स आणि व्यावसायिक आस्थापनांची तपासणी केल्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यात शहरातील प्रसिद्ध ब्रँडेड आस्थापना, शॉपिंग मॉल, शॉपिंग सेंटर आणि त्यामधील दुकाने व गाळ्यांची विशेष तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. मराठी नामफलकाबाबतच्या नियमांचे पालन होत आहे का, याची सखोल पडताळणी करण्यात येणार असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश पालिका प्रशासनाने दिले आहेत. गेल्या दोन-तीन वर्षांपासून मराठी नामफलकांचा विषय काहीसा मागे पडला होता. मात्र, यंदा पुन्हा हा मुद्दा महापालिकेत चर्चेचा विषय ठरला असून मराठी भाषेला प्राधान्य देण्यासाठी प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. मे महिन्यात शिवसेना (शिंदे) पक्षाने मराठीत नामफलक नसलेल्या दुकाने आणि हॉटेल्सना एक महिन्याची मुदत दिली होती. या कालावधीत नामफलक मराठीत न केल्यास संबंधित आस्थापनांवर कारवाई केली जाईल, असा इशारा उपमहापौर संजय घाडी यांनी दिला होता. त्यानंतर जून महिन्यापासून महापालिकेने शहरभर तपासणी मोहीम राबवत मराठी नामफलक नसलेल्या दुकानांविरोधात कारवाई सुरू केली. या कारवाईदरम्यान अनेक दुकानदारांना नोटिसा बजावण्यात आल्या, तर काहींना नियमांचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. आता या मोहिमेचा पुढील टप्पा अधिक व्यापक स्वरूपात राबविण्यात येणार असून मोठ्या व्यावसायिक संकुलांनाही त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे.

गेल्या काही महिन्यांत करण्यात आलेल्या कारवाईचा आढावा घेण्यासाठी विधी समितीच्या अध्यक्षा दीक्षा कारकर यांनी नुकतीच महापालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत शहरातील सर्व दुकाने आणि आस्थापनांवर मराठी अक्षरांतील नामफलक लावण्याच्या नियमाची अंमलबजावणी अधिक प्रभावी आणि कठोर करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार आता मुंबईतील प्रमुख शॉपिंग मॉल, शॉपिंग सेंटर, मल्टिनॅशनल ब्रँडची दुकाने तसेच मोठ्या व्यावसायिक आस्थापनांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात येणार आहे. तपासणीदरम्यान ज्या आस्थापनांवर मराठी भाषेतील नामफलक नसतील किंवा नियमांनुसार नामफलक लावलेले नसतील, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. महापालिकेने संबंधित विभागांना विशेष पथके तयार करून नियमित तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत. प्रशासनाच्या मते, महाराष्ट्रातील ग्राहक आणि नागरिकांना त्यांच्या मातृभाषेत माहिती उपलब्ध व्हावी, तसेच राज्य शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन व्हावे, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे दुकानदारांनी मराठी नामफलकाबाबतचे नियम वेळेत पाळावेत, अन्यथा दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशाराही देण्यात आला आहे. आगामी काळात ही मोहीम अधिक व्यापक स्वरूपात राबवून मुंबईतील सर्व व्यावसायिक आस्थापनांमध्ये मराठी नामफलक सक्तीने लागू करण्यासाठी महापालिका प्रशासनाने तयारी सुरू केली आहे.

Previous Post

घराजवळ आरोग्य सेवा! नवी मुंबईतील झोपडपट्ट्या आणि नागरी भागात मोबाईल कॅन्सर व्हॅनला उत्स्फूर्त प्रतिसाद

Next Post

McDonald’s ने आणला श्रावण स्पेशल उपवासवाला बर्गर!

Next Post
McDonald’s ने आणला श्रावण स्पेशल उपवासवाला बर्गर!

McDonald’s ने आणला श्रावण स्पेशल उपवासवाला बर्गर!

BreakingNews

राज्याच्या मतदार यादीतून तब्बल २.०७ कोटी मतदार बाद होणार? निवडणूक आयोगाची आकडेवारी जाहीर!

McDonald’s ने आणला श्रावण स्पेशल उपवासवाला बर्गर!

मॉल मधील दुकानांवरही आता मराठी पाट्या सक्तीच्या; मुंबई महापालिकेचा थेट इशारा!

घराजवळ आरोग्य सेवा! नवी मुंबईतील झोपडपट्ट्या आणि नागरी भागात मोबाईल कॅन्सर व्हॅनला उत्स्फूर्त प्रतिसाद

मुंबईकरांची कोंडी होण्याची शक्यता? ‘बेस्ट’ कर्मचाऱ्यांचे बेमुदत उपोषण सुरू

सातारा जिल्‍ह्यात येणार नवे ९७ उद्योग

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.