Lokrakshanay
Wednesday, August 19, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

घराजवळ आरोग्य सेवा! नवी मुंबईतील झोपडपट्ट्या आणि नागरी भागात मोबाईल कॅन्सर व्हॅनला उत्स्फूर्त प्रतिसाद

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
August 19, 2026
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
घराजवळ आरोग्य सेवा! नवी मुंबईतील झोपडपट्ट्या आणि नागरी भागात मोबाईल कॅन्सर व्हॅनला उत्स्फूर्त प्रतिसाद
Share on FacebookShare on Whatsapp

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेने नागरिकांच्या आरोग्य सुरक्षेला प्राधान्य देत कर्करोगाच्या लवकर निदानासाठी विशेष मोबाईल कॅन्सर तपासणी मोहीम यशस्वीपणे राबवली. राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग तपासणी कार्यक्रमांतर्गत ३० वर्षांवरील महिला आणि पुरुषांची नियमित आरोग्य तपासणी महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये आणि नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये केली जाते. या कार्यक्रमात उच्च रक्तदाब, मधुमेह, मुखाचा कर्करोग, स्तनाचा कर्करोग आणि गर्भाशय मुखाच्या कर्करोगाची तपासणी करून त्याची नोंद राष्ट्रीय पोर्टलवर करण्यात येते. तपासणीत संशयित रुग्ण आढळल्यास त्यांना पुढील उपचारांसाठी नेरूळ येथील सार्वजनिक रुग्णालयात संदर्भित केले जाते. या उपक्रमाला अधिक प्रभावी बनवण्यासाठी राज्य शासनाने ३ ऑगस्ट ते ११ ऑगस्ट २०२६ या कालावधीत विशेष कॅन्सर तपासणी व्हॅन नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात उपलब्ध करून दिली. या व्हॅनच्या माध्यमातून शहरातील विविध भागांमध्ये नागरिकांच्या घराजवळ जाऊन कर्करोग तपासणी करण्यात आली. या विशेष मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून तब्बल १,२९२ नागरिकांनी तपासणी करून घेतली. मोबाईल व्हॅनमध्ये मुखाचा कर्करोग, स्तनाचा कर्करोग आणि गर्भाशय मुखाच्या कर्करोगाच्या तपासण्या व आवश्यक चाचण्या करण्यात आल्या. या मोहिमेचे नियोजन नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून करण्यात आले होते. चिंचपाडा, कातकरी पाडा, रबाळे, तुर्भे, इंदिरा नगर, शिरवणे, करावे आणि सीबीडी या भागांमध्ये मोबाईल व्हॅन तैनात करण्यात आली होती. सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत नागरिकांना मोफत तपासणीची सुविधा देण्यात आली. इलठणपाडा, ऐरोली, तुर्भे, नेरूळ, करावे आणि बेलापूर येथील विविध आरोग्य केंद्रांच्या सहकार्याने ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यात आली. प्रत्येक ठिकाणी संबंधित नोडल अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपासणीचे नियोजन करण्यात आले. विविध नागरी आरोग्य केंद्रांमधून नागरिकांना या तपासणीसाठी मोबाईल व्हॅनपर्यंत आणण्याची व्यवस्था करण्यात आली होती.

या मोहिमेदरम्यान विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर तपासण्या करण्यात आल्या. चिंचपाडा येथे १५०, कातकरी पाडा येथे १८२, रबाळे येथे १५४, तुर्भे येथे २८०, इंदिरा नगर येथे २६०, शिरवणे येथे ४२९, करावे येथे ३०४ आणि सीबीडी येथे ३१० नागरिकांची तपासणी करण्यात आली. यामध्ये मुखाच्या कर्करोगासाठी शेकडो नागरिकांची तपासणी झाली, तर स्तनाच्या कर्करोगासाठी आणि गर्भाशय मुखाच्या कर्करोगासाठीही महिलांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवला. आरोग्य विभागाने नागरिकांना कर्करोगाचे लवकर निदान किती महत्त्वाचे आहे, याबाबतही जनजागृती केली. कर्करोग वेळेत ओळखल्यास तो पूर्णपणे बरा होऊ शकतो आणि वेळेवर केलेली तपासणी भविष्यातील गंभीर धोका टाळू शकते, असा संदेश या मोहिमेद्वारे देण्यात आला. तंबाखू, सुपारी आणि इतर व्यसनांपासून दूर राहण्याचे तसेच शरीरात कोणताही असामान्य बदल जाणवल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे आवाहनही करण्यात आले. जे नागरिक या विशेष मोहिमेत सहभागी होऊ शकले नाहीत, त्यांनी नवी मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये आणि नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये उपलब्ध असलेल्या मोफत कर्करोग तपासणी सेवांचा लाभ घ्यावा, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. महानगरपालिका कार्यक्षेत्रातील ३० वर्षांवरील सर्व महिला आणि पुरुषांनी असंसर्गजन्य रोग तपासणी कार्यक्रमांतर्गत आपल्या जवळच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन नियमित तपासणी करून घ्यावी, असे आवाहन महापौर सुजाता पाटील आणि आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी केले आहे. नागरिकांनी वेळेवर तपासणी करून स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी आणि कर्करोगासारख्या गंभीर आजाराचे लवकर निदान करून उपचार सुरू करावेत, असा संदेशही त्यांनी दिला.

Previous Post

मुंबईकरांची कोंडी होण्याची शक्यता? ‘बेस्ट’ कर्मचाऱ्यांचे बेमुदत उपोषण सुरू

Next Post

मॉल मधील दुकानांवरही आता मराठी पाट्या सक्तीच्या; मुंबई महापालिकेचा थेट इशारा!

Next Post
मॉल मधील दुकानांवरही आता मराठी पाट्या सक्तीच्या; मुंबई महापालिकेचा थेट इशारा!

मॉल मधील दुकानांवरही आता मराठी पाट्या सक्तीच्या; मुंबई महापालिकेचा थेट इशारा!

BreakingNews

राज्याच्या मतदार यादीतून तब्बल २.०७ कोटी मतदार बाद होणार? निवडणूक आयोगाची आकडेवारी जाहीर!

McDonald’s ने आणला श्रावण स्पेशल उपवासवाला बर्गर!

मॉल मधील दुकानांवरही आता मराठी पाट्या सक्तीच्या; मुंबई महापालिकेचा थेट इशारा!

घराजवळ आरोग्य सेवा! नवी मुंबईतील झोपडपट्ट्या आणि नागरी भागात मोबाईल कॅन्सर व्हॅनला उत्स्फूर्त प्रतिसाद

मुंबईकरांची कोंडी होण्याची शक्यता? ‘बेस्ट’ कर्मचाऱ्यांचे बेमुदत उपोषण सुरू

सातारा जिल्‍ह्यात येणार नवे ९७ उद्योग

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.