Lokrakshanay
Monday, August 17, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

पुण्यात ‘बर्गर किंग’सह १६ आस्थापनांना FDAचा दणका; किचनमधील अस्वच्छतेमुळे कारवाई

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
August 17, 2026
in ताज्या बातम्या, पुणे, महाराष्ट्र
पुण्यात ‘बर्गर किंग’सह १६ आस्थापनांना FDAचा दणका; किचनमधील अस्वच्छतेमुळे कारवाई
Share on FacebookShare on Whatsapp

पुणे : अन्नाची चव जितकी महत्त्वाची आहे, तितकीच त्याची गुणवत्ता आणि स्वच्छताही महत्त्वाची असल्याचा स्पष्ट संदेश देत अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) पुणे विभागात मोठी धडक कारवाई केली आहे. ‘सेफ फूड, सेफ ड्रग, सेफ महाराष्ट्र’ या विशेष मोहिमेअंतर्गत ११ ते १४ ऑगस्टदरम्यान करण्यात आलेल्या तपासणीत गंभीर अनियमितता आढळल्यानंतर पुणे विभागातील तब्बल १६ हॉटेल, रेस्टॉरंट, ई-कॉमर्स आणि डेअरी आस्थापनांचे परवाने अथवा नोंदणी तात्काळ निलंबित करण्यात आली आहे. या कारवाईत पुण्यातील कॅम्प परिसरातील ईस्ट स्ट्रीटवरील प्रसिद्ध बर्गर किंगचाही समावेश असून, या रेस्टॉरंटमधील अस्वच्छता आणि अन्नाच्या दर्जाबाबत प्राप्त झालेल्या तक्रारींची दखल घेत एफडीएच्या अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. तपासणीदरम्यान अन्न सुरक्षा व मानके कायद्यातील नियमांचे पालन न झाल्याचे तसेच काही गंभीर त्रुटी आढळल्याने संबंधित आस्थापनावर तातडीने कारवाई करण्यात आली. कॅम्प परिसरातील हे बर्गर किंग अनेक वर्षांपासून तरुणाईचे आकर्षण राहिले असून, शहरातील सर्वाधिक वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या या शाखेवर झालेल्या कारवाईची मोठी चर्चा सुरू आहे. तपासणी मोहिमेदरम्यान केवळ बर्गर किंगच नव्हे, तर इतर अनेक नामांकित हॉटेल्स आणि खाद्य व्यवसायिकांमध्येही स्वच्छतेचा अभाव, अन्न हाताळणीतील त्रुटी, आवश्यक परवान्यांतील कमतरता आणि अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन आढळून आले. त्यामुळे संबंधित आस्थापनांचे परवाने निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला. एफडीएने स्पष्ट केले आहे की, ग्राहकांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही आणि मोठ्या ब्रँडलाही नियमांचे पालन करणे बंधनकारक राहील. या कारवाईमुळे खाद्य व्यवसायिकांमध्ये खळबळ उडाली असून, अन्न सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करण्याबाबत प्रशासनाने पुन्हा एकदा स्पष्ट इशारा दिला आहे.

या मोहिमेत पुण्यासह लोणावळा, सातारा, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांतील विविध आस्थापनांवरही कारवाई करण्यात आली. लोणावळ्यातील हॉटेल सयाजीअंतर्गत फॉर्च्युन एंटरप्रायझेस, पुण्यातील लोहेगाव येथील हॉटेल चुल मटण, भोसरीतील सिम्पली साऊथ, कोल्हापुरातील हॉटेल पवन तसेच सांगलीतील राजेश चायनीज या हॉटेल-रेस्टॉरंटवरही एफडीएने कारवाईचा बडगा उगारला. याशिवाय पुण्यातील जेबीएम हॉस्पिटॅलिटीच्या कॅन्टीनकडे आवश्यक परवाना नसल्याचे आढळल्याने त्यांना व्यवसाय बंद करण्याचे निर्देश देण्यात आले. सातारा जिल्ह्यातील कराड येथील डॉमिनोज पिझ्झा आणि पिझ्झा हट यांचाही या कारवाईत समावेश असून, ई-कॉमर्स क्षेत्रातील झेप्टो लिमिटेड, स्विन्स्टा ईएनटी प्रायव्हेट लिमिटेड तसेच ब्लिंक कॉमर्सच्या दोन आस्थापनांवरही अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली. डेअरी क्षेत्रातील ओम साई राम मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स, धर्मनाथ दूध शीतकरण केंद्र आणि आर. के. मिल्क यांच्याविरुद्धही कठोर पावले उचलण्यात आली आहेत. एफडीएने यासोबतच शाळांपासून ५० मीटर परिसरात उच्च चरबी (High Fat), उच्च साखर (High Sugar) आणि उच्च मीठ (High Salt – HFSS) असलेल्या खाद्यपदार्थांच्या विक्रीवर लागू असलेल्या नियमांची आठवण करून दिली आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवरही कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. पालक किंवा नागरिकांना अशा प्रकारची विक्री अथवा अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन आढळल्यास त्यांनी एफडीएच्या टोल-फ्री क्रमांकावर तक्रार नोंदवावी, असे आवाहनही करण्यात आले आहे. ग्राहकांना सुरक्षित, दर्जेदार आणि स्वच्छ अन्न उपलब्ध करून देणे हे प्रशासनाचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे एफडीएने स्पष्ट केले असून, भविष्यातही अशा धडक तपासणी मोहिमा सातत्याने राबविल्या जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. या कारवाईमुळे मोठ्या ब्रँडसह सर्वच खाद्य व्यवसायिकांना अन्न सुरक्षा, स्वच्छता आणि कायदेशीर नियमांचे काटेकोर पालन करणे अपरिहार्य असल्याचा स्पष्ट संदेश मिळाला आहे.

Previous Post

ठाण्यातील शतकमहोत्सवी ‘ऑफिसर्स क्लब’ला आधुनिकतेची झळाळी; स्वातंत्र्यदिनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन!

Next Post

स्वयंपाकाच्या गॅसबाबत केंद्र सरकारचा नवा नियम; ग्राहकांना मोठा दिलासा! गॅस कंपन्यांना दणका

Next Post
स्वयंपाकाच्या गॅसबाबत केंद्र सरकारचा नवा नियम; ग्राहकांना मोठा दिलासा! गॅस कंपन्यांना दणका

स्वयंपाकाच्या गॅसबाबत केंद्र सरकारचा नवा नियम; ग्राहकांना मोठा दिलासा! गॅस कंपन्यांना दणका

BreakingNews

स्वयंपाकाच्या गॅसबाबत केंद्र सरकारचा नवा नियम; ग्राहकांना मोठा दिलासा! गॅस कंपन्यांना दणका

पुण्यात ‘बर्गर किंग’सह १६ आस्थापनांना FDAचा दणका; किचनमधील अस्वच्छतेमुळे कारवाई

ठाण्यातील शतकमहोत्सवी ‘ऑफिसर्स क्लब’ला आधुनिकतेची झळाळी; स्वातंत्र्यदिनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन!

रेल्वे प्रवाशांच्या जीवाशी खेळ! CSMT सह कल्याण, लोणावळा स्थानकांवरील पिण्याच्या पाण्यात ‘ई-कोलाय’ बॅक्टेरिया

तेजुकायाचा राजा यंदा ‘ज्योतिबा’ रूपात; २२ फुटी पर्यावरणपूरक मूर्तीचे खास आकर्षण!

शिर्डीत भिक्षेकऱ्यांविरोधात प्रशासनाची कडक पावले; ७० जणांवर कारवाई!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.