Lokrakshanay
Thursday, August 13, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

१ सप्टेंबरपासून एसटीच्या सवलतीच्या प्रवासासाठी NCMC कार्ड अनिवार्य!

१५ ऑगस्टपासून विद्यार्थ्यांच्या नोंदणीला सुरूवात

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
August 13, 2026
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
१ सप्टेंबरपासून एसटीच्या सवलतीच्या प्रवासासाठी NCMC कार्ड अनिवार्य!
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : राज्य परिवहन महामंडळाच्या सवलतीच्या प्रवासाला डिजिटल स्वरूप देण्याच्या प्रयत्नांना चांगला प्रतिसाद मिळत असून, राज्यभरात आतापर्यंत १ कोटी १ लाख ७३ हजार ८३८ प्रवाशांनी एनसीएमसी स्मार्ट कार्डसाठी नोंदणी केली आहे. यापैकी ६४ लाख ९१ हजार ६५ कार्डे कार्यान्वित झाली आहेत. दरम्यान, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिकांसाठी सवलतीच्या प्रवासाकरिता १ सप्टेंबर २०२६ पासून एनसीएमसी कार्डचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे. त्यामुळे अद्याप कार्डसाठी नोंदणी न केलेल्या पात्र प्रवाशांनी तातडीने नोंदणी करण्याचे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे. एसटी महामंडळाने महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिकांसाठी एनसीएमसी कार्डची नोंदणी व वितरण प्रक्रिया १६ फेब्रुवारी २०२६ पासून सुरू केली होती. २६ जुलैपर्यंत नोंदणी केलेल्या पात्र प्रवाशांची कार्डे त्यांनी नोंदणी केलेल्या ठिकाणी वितरणासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. कार्ड मिळाल्यानंतर संबंधित प्रवाशांनी ते कार्यान्वित करून त्यामध्ये आवश्यक रक्कम टॉप-अप करावी आणि त्यानंतर एसटी बस प्रवासात कार्डचा वापर करावा, असे महामंडळाने स्पष्ट केले आहे. एनसीएमसी कार्डच्या माध्यमातून एसटीतील तिकीट व्यवहार अधिक सुलभ आणि कॅशलेस करण्याचा प्रयत्न केला जात आहे. सवलतीच्या प्रवासासाठी कार्ड बंधनकारक झाल्यानंतर पात्र प्रवाशांना प्रवास करताना कार्ड सोबत ठेवणे आवश्यक राहणार आहे. त्यामुळे ज्यांनी अद्याप नोंदणी केलेली नाही, त्यांनी विलंब न करता प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नोंदणीसाठी होणारी गर्दी आणि प्रवाशांचा वेळ वाचावा यासाठी एसटीच्या वेब पोर्टलवरून पूर्वनियुक्ती घेण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांसाठीही १५ ऑगस्टपासून नोंदणी : राज्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठीही १५ ऑगस्ट २०२६ पासून एनसीएमसी कार्डची नोंदणी सुरू करण्यात येणार आहे. प्रत्येक शाळेत जाऊन एसटीचे अधिकृत परवानाधारक प्रतिनिधी विद्यार्थ्यांची नोंदणी करणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी एनसीएमसी कार्डसाठी इतर कोणत्याही ठिकाणी किंवा अनधिकृत व्यक्तीकडे नोंदणी करू नये, असे एसटी महामंडळाने स्पष्ट केले आहे. एनसीएमसी कार्ड अधिकृत एसटी आगार, बसस्थानक तसेच अधिकृत एजंटकडे उपलब्ध करून देण्यात आले आहे. कार्डमध्ये रिचार्ज किंवा टॉप-अप करण्याची सुविधाही उपलब्ध आहे. एसटीच्या वाहकांकडील ईटीआयएम मशीनद्वारे कार्डमध्ये रक्कम भरता येणार आहे. याशिवाय एसटी महामंडळाचे संकेतस्थळ, मोबाईल ॲप्लिकेशन आणि अधिकृत एजंट यांच्या माध्यमातूनही कार्ड रिचार्ज करता येणार आहे. एनसीएमसी कार्डमुळे तिकीट व्यवहार अधिक सुलभ होण्याबरोबरच रोख पैशांचा वापर कमी होण्यास मदत होणार आहे. सवलतीच्या प्रवासाचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांसाठी डिजिटल पद्धतीने तिकीट व्यवहार करण्याची सुविधा उपलब्ध होणार असल्याने एसटीच्या प्रवास व्यवस्थेतही बदल होणार आहे. दरम्यान, वसईसह काही आगारांमध्ये एनसीएमसी कार्ड नोंदणीसाठी नागरिकांना गर्दीचा सामना करावा लागत असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. त्यामुळे १ सप्टेंबरची अंतिम मुदत लक्षात घेता नोंदणी केंद्रांवरील व्यवस्था अधिक सक्षम करण्याची गरज आहे. ज्येष्ठ नागरिक, महिला आणि इतर पात्र सवलतधारकांची गैरसोय होऊ नये, यासाठी एसटी प्रशासनाने पुरेसे कर्मचारी आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे अपेक्षित आहे. १ सप्टेंबरपासून सवलतीच्या प्रवासासाठी एनसीएमसी कार्ड अनिवार्य होणार असल्याने पात्र प्रवाशांनी वेळेत नोंदणी करून कार्ड कार्यान्वित करून घ्यावे, असे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे. कार्डमध्ये आवश्यक टॉप-अप करून प्रवासाच्या वेळी ते वापरण्याचीही सूचना करण्यात आली आहे.

Previous Post

२०२९ पर्यंत सगळ्या लोकल मेट्रोसारख्या वातानुकूलित होणार, मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा

Next Post

डी-मार्टमधून १४,९४९ रुपयांचे किराणा सामान चोरण्याचा प्रयत्न; ग्राहकाविरोधात गुन्हा दाखल

Next Post
डी-मार्टमधून १४,९४९ रुपयांचे किराणा सामान चोरण्याचा प्रयत्न; ग्राहकाविरोधात गुन्हा दाखल

डी-मार्टमधून १४,९४९ रुपयांचे किराणा सामान चोरण्याचा प्रयत्न; ग्राहकाविरोधात गुन्हा दाखल

BreakingNews

गुटख्याचे पाऊच होणार इतिहासजमा; आता छोट्या डब्यातच मिळणार पान मसाला – केंद्र सरकारचा निर्णय

डी-मार्टमधून १४,९४९ रुपयांचे किराणा सामान चोरण्याचा प्रयत्न; ग्राहकाविरोधात गुन्हा दाखल

१ सप्टेंबरपासून एसटीच्या सवलतीच्या प्रवासासाठी NCMC कार्ड अनिवार्य!

२०२९ पर्यंत सगळ्या लोकल मेट्रोसारख्या वातानुकूलित होणार, मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा

खतांसाठी आता रांगेत उभे राहण्याची गरज नाही; ठाण्यात १५ ऑगस्टपासून ‘ऑनलाइन बुकिंग’ सुविधा

सातबारावर नाव नसलेल्या शेतकऱ्यांची नोंद होणार; ‘फार्मर आयडी’चा मार्ग मोकळा – महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.