Lokrakshanay
Friday, July 24, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

पुण्यात जुलैचा विक्रमी पाऊस; २२ दिवसांत १२ वर्षांचा विक्रम मोडला, घाटमाथ्यावर ‘रेड अलर्ट’

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
July 23, 2026
in ताज्या बातम्या, पुणे, महाराष्ट्र
पुण्यात जुलैचा विक्रमी पाऊस; २२ दिवसांत १२ वर्षांचा विक्रम मोडला, घाटमाथ्यावर ‘रेड अलर्ट’
Share on FacebookShare on Whatsapp

पुणे : जून महिन्यात पावसाने दडी मारल्याने चातकासारखी प्रतीक्षा करणाऱ्या पुणेकरांना जुलैमध्ये मात्र मान्सूनने जोरदार हजेरी लावली असून, गेल्या १२ वर्षांतील सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. जुलै महिन्याच्या अवघ्या २२ दिवसांत पुण्यात तब्बल ४५२.६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, हा पाऊस जुलै महिन्याच्या सरासरीपेक्षा दुपटीहून अधिक आहे. भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, पुण्यात जुलै महिन्याचा सरासरी पाऊस १८१.१ मिलिमीटर इतका असतो. मात्र, यंदा १ ते २२ जुलैदरम्यानच या सरासरीपेक्षा खूप अधिक पाऊस झाला आहे. यापूर्वी २०१४ मध्ये जुलै महिन्यात २८२.४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. यंदाच्या पावसाने तो विक्रमही मागे टाकला आहे. विशेष म्हणजे, जुलै महिना संपण्यासाठी अद्याप आठ दिवस शिल्लक असतानाच हा ऐतिहासिक विक्रम नोंदविला गेला आहे. चालू पावसाळी हंगामाचा विचार केला असता, १ जूनपासून आतापर्यंत पुण्यात एकूण ५१६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. यापैकी जून महिन्यात केवळ ६४ मिलिमीटर पाऊस झाला होता, तर जुलैमध्ये पावसाने अक्षरशः जोरदार पुनरागमन करत शहराला झोडपून काढले आहे. त्यामुळे अनेक सखल भागांत पाणी साचण्याच्या घटना घडल्या असून, शहरातील दैनंदिन जनजीवनावरही त्याचा परिणाम जाणवत आहे. हवामान विभागाच्या मते, बंगालच्या उपसागरालगत आणि आंध्र प्रदेशच्या वरच्या भागात निर्माण झालेल्या तीव्र चक्राकार वाऱ्यांच्या स्थितीमुळे तेथून अरबी समुद्रापर्यंत द्रोणीय रेषा सक्रिय झाली आहे. या वातावरणीय परिस्थितीमुळे संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून, त्याचा सर्वाधिक परिणाम कोकण आणि मध्य महाराष्ट्रावर होत आहे. रविवारपासून पुण्यात पावसाचा जोर अधिक वाढल्याचे हवामान तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.

शहरासह पुणे जिल्ह्यातील घाटमाथा आणि धरणक्षेत्रातही मुसळधार पावसामुळे परिस्थिती गंभीर बनली आहे. गेल्या २४ तासांत ताम्हिणी घाटात २७५ मिलिमीटर, भिरा येथे ३०९ मिलिमीटर, लोणावळ्यात १४२ मिलिमीटर, तर मुळशी येथे १५१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. या जोरदार पावसामुळे धरणांमध्ये पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढत असून, जलसाठ्यात समाधानकारक वाढ होत आहे. हवामान विभागाने गुरुवारी घाटमाथा परिसरात जोरदार ते अतिजोरदार पावसाचा इशारा देत ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. त्यामुळे घाट परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी तसेच पर्यटकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, पुणे शहरात पुढील दोन दिवस दुपारनंतर आकाश ढगाळ राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. हवामानातील पोषक स्थिती कायम असल्याने पुण्यात पुढील चार दिवस पावसाचा मुक्काम राहील, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवला आहे. यासोबतच पुढील दोन दिवस कमाल आणि किमान तापमानात घट होण्याची शक्यता असून, वातावरणात गारवा कायम राहणार आहे. सतत सुरू असलेल्या पावसामुळे नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, तसेच घाटमाथा आणि धरण परिसरात अनावश्यक प्रवास टाळावा, असे आवाहन प्रशासन आणि हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.

 

Previous Post

पालघरला अतिमुसळधार पावसाचा तडाखा; पूरस्थिती, वीजपुरवठा खंडित, रेल्वे-रस्ते वाहतुकीवर मोठा परिणाम

Next Post

नवी मुंबई महापालिका पदभरती परीक्षा संपन्न; ३६ पदांसाठी कडेकोट सुरक्षेत ऑनलाइन भरती

Next Post
नवी मुंबई  महापालिका पदभरती परीक्षा संपन्न; ३६ पदांसाठी कडेकोट सुरक्षेत ऑनलाइन भरती

नवी मुंबई महापालिका पदभरती परीक्षा संपन्न; ३६ पदांसाठी कडेकोट सुरक्षेत ऑनलाइन भरती

BreakingNews

गोदरेज ब्लॉकचा देशव्यापी शुभारंभ; महाराष्ट्रातील ५०० महिलांना पिंक ई-रिक्षा देणार

मिरारोडमध्ये पंचरच्या बहाण्याने चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; १०० टक्के मुद्देमाल जप्त!

मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त चिपळूणमध्ये रक्तदान शिबिर; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

अतिवृष्टीपूर्वीच गरोदर मातांना रुग्णालयात हलवणार; नाशिकमध्ये ‘माहेरघर’ उपक्रमाची घोषणा!

नवी मुंबई महापालिका पदभरती परीक्षा संपन्न; ३६ पदांसाठी कडेकोट सुरक्षेत ऑनलाइन भरती

पुण्यात जुलैचा विक्रमी पाऊस; २२ दिवसांत १२ वर्षांचा विक्रम मोडला, घाटमाथ्यावर ‘रेड अलर्ट’

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.